एक्स्प्लोर

Nilesh Lanke : 'शाहांना म्हणालो तुमच्या या नेत्यांना पाडून आलोय', निलेश लंकेंनी सांगितला संसदेतील 'तो' रंजक किस्सा, जयंत पाटलांनाही हसू आवरेना!

Nilesh Lanke : खासदार निलेश लंके यांनी संसदेत केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या सोबत फोटो काढण्याचा रंजक किस्सा सांगितला. यानंतर सभेत एकच हशा पिकल्याचे दिसून आले.

अहमदनगर : लोकसभा निवडणुकीनंतर (Lok Sabha Election) आता विधानसभा निवडणुकीचे (Maharashtra Assembly Election 2024) वारे वाहू लागले आहे. या पार्श्वभूमीवर महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) जोरदार तयारी केली जात आहे. नेत्यांकडून राज्य पिंजून काढले जात असून ठिकठिकाणी सभा आणि मेळावे घेतले जात आहेत. या सभांच्या माध्यमातून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरु आहेत. त्यातच आता अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे (Ahmednagar Lok Sabha Constituency) खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी संसदेत केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या सोबतचा रंजक किस्सा पारनेरच्या सभेत सांगितला आहे.   

अहमदनगरमधून सुजय विखे पाटील यांचा पराभव केल्यानंतर निलेश लंके खासदार झाले. यानंतर त्यांनी पहिल्यांदाच संसदेत पाऊल ठेवले. यावेळी अमित शाह यांच्या सोबत फोटो काढण्याचा किस्सा निलेश लंके यांनी सांगितल्याने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह  कार्यकर्त्यांमध्ये एकच हशा पिकला. निलेश लंके यांच्या या वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. 

नेमकं काय म्हणाले निलेश लंके?

निलेश लंके म्हणाले की, मला विधानसभेचा अनुभव होता. मी लोकसभेत पहिल्यांदाच पोहोचल्याने मी बिनधास्त होतो.  माझ्यासोबत बीडचे बजरंग सोनवणे, दिंडोरीचे भास्कर भगरे आणि कल्याण काळे होते. तेवढ्यात संसदेच्या लॉबीत अमित शाह आले, असे त्यांनी म्हटले. यावेळी निलेश लंके यांच्या सोबत असणाऱ्या काही मंडळींनी अमित शाह यांच्यासोबत फोटो काढण्याचा आग्रह धरला होता. त्यानंतर निलेश लंके यांनी पुढाकार घेतला आणि अमित शाह यांना आवाज दिला. 'साहेब तुमच्यासोबत फोटो काढायचा आहे, असे निलेश लंके यांनी म्हटले. अमित शाह यांनी निलेश लंकेंना तत्काळ प्रतिसाद दिला आणि फोटो काढण्यासाठी बोलावले. यावेळी निलेश लंके यांनी त्यांच्या सहकाऱ्यांची ओळख करून देताना हे आपले बजरंग आप्पा, पंकजा मुंडे यांना पाडून आले. हे भास्कर भगरे, भारती पवार यांना पाडून आले, तर हे कल्याण काळे रावसाहेब दानवे यांना पाडून आले आणि मी निलेश लंके विखेंना पाडून आलो, असे म्हटले. निलेश लंके यांच्या या वक्तव्यानंतर सभेत एकच हशा पिकला होता.   

अमित शाहांकडून कौतुक 

यावर निलेश लंके यांनी अमित शाह त्यांना काय बोलले हे देखील सांगितले. 'खूपच डेअरिंग आहे', असे म्हणत अमित शाहांनी कौतुक केल्याचं निलेश लंकेंनी सांगितलं. यानंतर 21 लाख मतदारांमधून आलो आहोत, थोडी मागच्या दारानं आलो आहोत, असेही निलेश लंकेंनी म्हटलं. त्यांच्या या वक्तव्याची आता जोरदार चर्चा रंगली आहे. 

आणखी वाचा 

Sharad Pawar : पारनेरचा प्रतिनिधी लोकसभेत गेला अन् इंग्रजीत कसं काय बोलला? शरद पवारांनी पडद्यामागचा इतिहास जसाच्या तसा सांगितला!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी ! बारामती अन् राहुरीची पोटनिवडणूक एकत्रच; सुजय विखेंनी सांगितलं राहुरीतील उमेदवाराचं नाव
मोठी बातमी ! बारामती अन् राहुरीची पोटनिवडणूक एकत्रच; सुजय विखेंनी सांगितलं राहुरीतील उमेदवाराचं नाव
ZP च्या शाळेप्रती आपुलकी, मुलाच्या लग्नाचा मुहूर्त साधत सुरू केलं ‘कुसुमाग्रज ग्रंथालय’; माजी विद्यार्थ्याचा 'आदर्श'वत उपक्रम
ZP च्या शाळेप्रती आपुलकी, मुलाच्या लग्नाचा मुहूर्त साधत सुरू केलं ‘कुसुमाग्रज ग्रंथालय’; माजी विद्यार्थ्याचा 'आदर्श'वत उपक्रम
Gadchiroli : गडचिरोलीत बिबट्यापासून बचावासाठी व्हिडीओ दाखवत असतानाच बिबट्याचा हल्ला, तर अहिल्यानगरमध्ये बैलगाडी भरून पत्रं
गडचिरोलीत बिबट्यापासून बचावासाठी व्हिडीओ दाखवत असतानाच बिबट्याचा हल्ला, तर अहिल्यानगरमध्ये बैलगाडी भरून पत्रं
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये कार आणि मालवाहू ट्रकचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये कार आणि मालवाहू ट्रकचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

व्हिडीओ

Special Report Iran vs America : ब्रिटनच्या वेगळ्या भूमिकेवरुनही ट्रम्प यांचा संताप
Special Report Raj Thackeray - Uddhav Thackeray : मनसे-ठाकरेसेनेतील नाराजीवर तोडगा निघाला?
Special Report Rajya Sabha : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची घोषणा
Jalgaon Banana : केळीचे दर 2.500 रुपयांवरुन 1500 रुपयांवर, युद्धाचा उत्पादकांना फटका
Ajit Pawar plane crash spot Baramati : AIB च्या अहवालात विमान झाडाला धडकल्याचा उल्लेख, फॅक्ट काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात उपांत्य फेरीचा सामना,वानखेडेवर कसं पोहोचायचं? मुंबई पोलिसांकडून प्रेक्षकांसाठी महत्त्वाच्या सूचना जारी 
भारत- इंग्लंड सामना पाहण्यासाठी वानखेडे स्टेडियमवर कसं पोहोचायचं? मुंबई पोलिसांकडून सूचना जारी
तामिळनाडूत द्रमुक आणि काँग्रेसचं जमलं, राज्यसभेची एक जागा काँग्रेसला मिळणार, विधानसभेसाठी द्रमुकनं किती जागा सोडल्या?
तामिळनाडूमध्ये काँग्रेस-द्रमुकमधील जागा वाटपाचा तिढा सुटला, काँग्रेसला विधानसभेच्या किती जागा?
Iran vs America : भारतातून परतणाऱ्या इराणच्या युद्धनौकेवर अमेरिकेचा हल्ला, पाणबुडीद्वारे क्षेपणास्त्राचा मारा, 80 जणांचा मृत्यू, व्हिडीओ जारी  
भारतातून परतणाऱ्या इराणच्या युद्धनौकेवर अमेरिकेचा हल्ला, पाणबुडीद्वारे क्षेपणास्त्राचा मारा, 80 जणांचा मृत्यू
Rajya Sabha Election : राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 7 जागांसाठी 6 उमेदवार जाहीर, एकनाथ शिंदे कोणाला संधी देणार? 
राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 7 जागांसाठी 6 उमेदवार जाहीर, एकनाथ शिंदे कोणाला संधी देणार? 
Iran Israel Conflict : पाकिस्तानातून बाहेर पडा, अमेरिकेचे नागरिकांना निर्देश; इराणने हल्ला न करण्याची पाकिस्तानची विनंती फेटाळली
पाकिस्तानातून बाहेर पडा, अमेरिकेचे नागरिकांना निर्देश; इराणने हल्ला न करण्याची पाकिस्तानची विनंती फेटाळली
धक्कादायक!  सासरच्या त्रासाला कंटाळून तरुणानं संपवलं जीवन, सासूसह तीन जणांवर जळगावमध्ये गुन्हा दाखल 
धक्कादायक!  सासरच्या त्रासाला कंटाळून तरुणानं संपवलं जीवन, सासूसह तीन जणांवर जळगावमध्ये गुन्हा दाखल 
ह्रदयद्रावक... वडिलांना आणायला जाताना कारचा अपघात, दुर्घटनेत बहिणीचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
ह्रदयद्रावक... वडिलांना आणायला जाताना कारचा अपघात, दुर्घटनेत बहिणीचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
नागपूर महापालिकेच्या आयुक्तांना हलवलं; राज्यातील दोन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुण्यात कुठं जबाबदारी?
नागपूर महापालिकेच्या आयुक्तांना हलवलं; राज्यातील दोन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुण्यात कुठं जबाबदारी?
Embed widget