एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

सत्यजित तांबेंनी घेतली अजित पवारांची भेट, बाळासाहेब थोरातांच्या पराभवावर अजितदादांनी व्यक्त केलं दुःख 

Satyajit Tambe Meets Ajit Pawar : माजी आमदार बाळासाहेब थोरात यांचं भाचे आमदार सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची मुंबईत भेट घेतली.

Satyajit Tambe Meets Ajit Pawar : विधानसभेच्या निवडणुकीत राज्यात महायुतीला मोठं यश मिळालं आहे. त्यामुळं महायुतीचा सत्तास्थापनेचा मार्ग आता मोकळा झाला आहे. सध्या महाराष्ट्राला नवीन मुख्यमंत्री कोण मिळणार, मंत्रीपदाची लॉटरी कोणा कोणाला लागणार याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.  अशातच राजकीय नेत्यांच्या गाठीभेटी देखील वाढल्या आहेत. दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार बाळासाहेब थोरात यांचं भाचे आमदार सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची मुंबईत भेट घेतली. बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या पराभवावर अजित पवार यांनी दुःख व्यक्त केल्याचे सत्यजित तांबे म्हणाले. 


सत्यजित तांबेंनी घेतली अजित पवारांची भेट, बाळासाहेब थोरातांच्या पराभवावर अजितदादांनी व्यक्त केलं दुःख 

संगमनेरचा निकाल धक्कादायक 

आमदार सत्यजित तांबे यांनी आद उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. संगमनेरचा निकाल धक्कादायक लागला आहे. 40 वर्ष बाळासाहेब थोरात यांनी सर्वांना सोबत घेऊन काम केलं. ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं असेल ते का केलं असेल? असा सवाल देखील सत्यजित तांबे यांनी उपस्थित केलाआहे. अजित पवारांनी बाळासाहेब थोरात यांच्या पराभवामुळे दुःख व्यक्त केल्याची माहिती सत्यजित तांबे यांनी दिली. जे टिंगल करत आहेत त्यांनी वरिष्ठांनी केलेलं काम दुर्लक्षित करु शकत नाहीत. खुनशी विचार कुणाच्या मनात असू नयेत. जर अशोक चव्हाण असा विचार करत असतील तर चुकीच आहे. राजकारणी माणूस विसराळू असायला हवा. खुनशी विचार मनात ठेऊन उपयोग नाही असेही सत्यजीत तांबे म्हणाले. अशोक चव्हाण यांनी केलेल्या टीकेला तांबे यांनी प्रत्युत्तर दिलं. 

बाळासाहेब थोरातांना संगमनेरमधूमन पराभवचा धक्का

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना देखील पराभवाचा सामना करावा लागला आहे. संगमनेर विधानसभा मतदारसंघातून बाळासाहेब थोरात हे सलग 8 वेळा निवडून आले होते. मात्र, यावेली थोरातांना पराभवचा धक्का बसला आहे. यावेळी मतदारांनी त्यांचा आमदार बदलला आहे. बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात शिंदेंच्या शिवसेनेकडून अमोल खटाळ यांना उमेदवारी देण्यात आली होती. अमोल खटाळ यांनी थोरातांचा 10 हजार 560 मतांनी पराभव केलाय.जिल्ह्याच्या राजकारणातील महत्वाचा मतदार संघ म्हणजे संगमनेर विधानसभा. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे संगमनेर मतदार संघात एकहाती वर्चस्व राहिले होते. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्यानंतर बाळासाहेब थोरात हे 1985 पासून संगमनेर विधानसभेचे नेतृत्व करत आहेत, त्यामुळे याठिकाणी थोरात म्हणतील तीच पूर्व दिशा असे राजकारण रंगते. पण यंदाच्या निवडणुकीत त्यांना पराभवाचा धक्का बसला आहे.

महत्वाच्या बातम्या:

Sangamner Assembly Constituency Balasaheb Thorat : मोठी बातमी! काँग्रेसचा मुख्यमंत्रिपदाचा दावेदार पडला, बाळासाहेब थोरात संगमनेरमधून पराभूत

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana : सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 
सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 
Uddhav Thackeray: शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरेंची खबरदारी; नव्या आमदारांकडून शपथपत्र लिहून घेणार
शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरेंची खबरदारी; नव्या आमदारांकडून शपथपत्र लिहून घेणार
मोठी बातमी : मतदानानंतरही EVM बॅटरी 99 टक्के कशी, निवडणूक आयोगाचं पहिल्यांदाच उत्तर
मोठी बातमी : मतदानानंतरही EVM बॅटरी 99 टक्के कशी, निवडणूक आयोगाचं पहिल्यांदाच उत्तर
Parliament Winter Session : मर्यादा पाळा ते मला शिकवू नका! हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभा सभापती आणि मल्लिकार्जुन खरगेंची खडाजंगी
मर्यादा पाळा ते मला शिकवू नका! हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभा सभापती आणि मल्लिकार्जुन खरगेंची खडाजंगी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2 PM : 25 नोव्हेंबर  2024 :  ABP MajhaMaharashtra Vidhan Sabha Giant Killers : दिग्गजांना हरवणारे जायंट किलर कोण? Special ReportRam Shinde on Ajit Pawar : निवडणुकीत आलेल्या अपयशापेक्षा  कट रचून पराभव केला गेला याचं दु:खBharat Gogawale : मंत्रिमंडळात यावेळी हमखास नंबर लागण्याचा गोगावलेंना विश्वास

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yojana : सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 
सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 
Uddhav Thackeray: शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरेंची खबरदारी; नव्या आमदारांकडून शपथपत्र लिहून घेणार
शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरेंची खबरदारी; नव्या आमदारांकडून शपथपत्र लिहून घेणार
मोठी बातमी : मतदानानंतरही EVM बॅटरी 99 टक्के कशी, निवडणूक आयोगाचं पहिल्यांदाच उत्तर
मोठी बातमी : मतदानानंतरही EVM बॅटरी 99 टक्के कशी, निवडणूक आयोगाचं पहिल्यांदाच उत्तर
Parliament Winter Session : मर्यादा पाळा ते मला शिकवू नका! हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभा सभापती आणि मल्लिकार्जुन खरगेंची खडाजंगी
मर्यादा पाळा ते मला शिकवू नका! हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभा सभापती आणि मल्लिकार्जुन खरगेंची खडाजंगी
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : जळगावात बंडखोरांना जनतेने सपशेल नाकारलं, 'या' बड्या नेत्यांची केली हवा टाईट
जळगावात बंडखोरांना जनतेने सपशेल नाकारलं, 'या' बड्या नेत्यांची केली हवा टाईट
5 वर्ष आमदारकीचा थाट, आता मात्र मतदारांनी फिरवली पाठ, राज्यात 65 आमदारांचा दारूण पराभव, कोण-कोण पडलं?
5 वर्षे आमदारकीचा थाट, आता मात्र मतदारांनी फिरवली पाठ, राज्यात 65 आमदारांचा दारूण पराभव, कोण-कोण पडलं?
कोल्हापूर जिल्ह्यात समरजित घाटगे, प्रकाश आबिटकर आणि ऋतुराज पाटलांना सर्वाधिक पोस्टल मतदान! 10 पैकी 6 मतदारसंघात मविआ उमेदवारांना सर्वाधिक पोस्टल मते
कोल्हापूर जिल्ह्यात समरजित घाटगे, प्रकाश आबिटकर आणि ऋतुराज पाटलांना सर्वाधिक पोस्टल मतदान! 10 पैकी 6 मतदारसंघात मविआ उमेदवारांना सर्वाधिक पोस्टल मते
Maharashtra Assembly Election Result 2024: लाडक्या बहिणींच्या महाराष्ट्रात विजयी ठरलेल्या महिला आमदार किती? पहा संपूर्ण विजयी महिला उमेदवारांची यादी
लाडक्या बहिणींच्या महाराष्ट्रात विजयी ठरलेल्या महिला आमदार किती? पहा संपूर्ण विजयी महिला उमेदवारांची यादी
Embed widget