एकिकडं सत्तेचा मोह तर दुसरीकडं संघर्षाचा मार्ग, रोहितनं निवडला संघर्षाचा मार्ग; नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे
एककिडं सत्तेचा मोह होता, तर दुसरीकडे संघर्षाचा मार्ग होता. पण रोहितने संघर्षाचा मार्ग निवडला. याचा मला अभिमान असल्याचे म्हणत खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी रोहित पवारांचे कौतुक केले.
Supriya Sule : एककिडं सत्तेचा मोह होता, तर दुसरीकडे संघर्षाचा मार्ग होता. पण रोहितने संघर्षाचा मार्ग निवडला. याचा मला अभिमान असल्याचे म्हणत खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांचं कौतुक केलं. त्या अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील चौंडी इथं बोलत होत्या. राज्य सरकार ईडी, सीबीआय ,इन्कम टॅक्स यात व्यस्त आहे. त्यांचे शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडं लक्ष नाही. राज्य सरकार पक्ष फोडण्यात आणि कुटुंब फोडण्यात व्यस्त असल्याचे सुळे म्हणाल्या.
कर्जत जामखेडचे काही पाहुणे (राम शिंदे) आमच्या मतदारसंघात आले तेव्हा आम्ही अतिथी देवो भवो म्हणत त्यांचे स्वागत करतो. पण आम्ही इथे आलो तर इथले लोक लाईट घालवतात. आम्ही काही लाईट घालवली नाही असं म्हणत सुप्रिया सुळेंनी नाव न घेता राम शिंदेंना टोला लगावला. एखाद्या माणसानं किती संघर्ष करावा आणि तरीही ताठ मानेने उभे राहावं हे आम्ही अनिल देशमुख यांच्याकडे पाहून शिकतो असेही सुळे म्हणाल्या.
सुषमा अंधारेंची शिंदे गटावर जोरदार टीका
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळावर जाण्याची नौटंकी करण्यापेक्षा वंदनीय बाळासाहेबांचा विचार काय होता ते जपण्याची गरज आहे. वारंवार तुम्ही उघडे पडता यावरून तुम्ही बाळासाहेबांचा विचार जपू शकणार नाही हे स्पष्ट होते असे म्हणत शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली. बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे मी कमळाबाईची पालखी वाहण्यासाठी शिवसेना उभारली नाही अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली.
महत्त्वाच्या बातम्या: