Ahmednagar : ज्यांच्यावर आरोप झालेत त्यांना आता क्लिनचीट मिळणार; जयंत पाटलांचा भाजपला टोला
Ahmednagar News Update : लॉन्ड्रीत कापड टाकल्यावर जसं स्वच्छ होवून येतं तसाच प्रकार सद्या महाराष्ट्रात सुरू आहे, असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ( jayant patil) यांनी भाजपला लगावला आहे.
अमहदनगर : लॉन्ड्रीत कापड टाकल्यावर जसं स्वच्छ होवून येतं तसाच प्रकार सद्या सुरू आहे. ज्यांच्यावर आधी वेगवेगळे आरोप झालेत त्यांना आता क्लिनचीट मिळेल, असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ( jayant patil) यांनी भाजपला लगावला आहे. शिंदे-फडणवीस सरकार मधील नेत्यांना मिळणाऱ्या क्लिनचीटवरून जयंत पाटील यांनी असा टोला लगावलाय.
अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी मतदार संघातील निंभेरे येथे निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्याच्या दोन किलोमीटर लांबीच्या बोगद्याचे उद्घाटन माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रीपदाच्या दोन वर्षांच्या कार्यकाळात जयंत पाटील यांनी या कामासाठी एक हजार कोटींची निधी उपलब्ध करून दिला होता. त्यामुळे माजी राज्यमंत्री राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या माध्यमातून जयंत पाटील यांचा भव्य नागरी सत्कार समारंभ संपन्न झाला. यावेळी जयंत पाटील बोलत होते.
जयंत पाटील म्हणाले, "महाराष्ट्रात जी उलथापालथ झाली त्यात भाजपाचा पुढाकार असून महाराष्ट्रातील जनतेच्या मनात मत तयार झालंय, त्याचा परिणाम सर्व्हेत दिसून आलाय. जे सरकार आता स्थापन झालय त्या विरोधात जनतेचा सूर आहे. हे सरकार ओढून ताणून तयार झालेलं सरकार आहे. कोणालाच अपेक्षा नव्हती ते सरकार झालंय."
"कॉग्रेस , राष्ट्रवादी आणि शिवसेनेची संख्या पाहता सेनेकडे जास्त संख्याबळ होतं, त्यामुळे विधानपरिषदेत शिवसेनेचा विरोधीपक्षनेता निवडला गेला. याबाबत चर्चा व्हावी असं कॉग्रेसचं मत होतं, त्यांचंही चुकीचं नव्हतं, मात्र आता निर्णय झालाय. यापुढे महाविकास आघाडी दोन्ही सभागृहात संघटीत काम करेल असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
"मंत्रिमंडळाची वाट बघत महाराष्ट्र 40 दिवस थांबला. आता खातेवाटपाची वाट बघत 8 - 15 दिवस थांबलं तर काय बिघडणार आहे असं त्यांना वाटतं, असा टोला देखील जयंत पाटील यांनी खातेवाटपाला होणाऱ्या वेळेवरून लगावला. ते म्हणाले, ज्यांना मुख्यमंत्र्यांनी नेमलंय त्यांना मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार काम करावं लागणार. कोणी मंत्री आपल्या पायावर धोंडा पाडून घेणार नाही. दम देण्याची परीस्थिती निर्माण होतेय यावरून आपणच निष्कर्ष काढू शकतो काय चाललंय."
महत्वाच्या बातम्या