Shivraj Singh Chouhan : नवीन वर्षानिमित्त मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री साईदरबारी, विखे पाटलांसह शिवराज सिंह चौहानांनी घेतलं साईदर्शन
Shivraj Singh Chouhan : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Madhya Pradesh CM Shivraj Singh Chouhan) यांनी नवीन वर्षानिमित्त शिर्डीत साई दरबारी (Shirdi Sai Baba) हजेरी लावली.
![Shivraj Singh Chouhan : नवीन वर्षानिमित्त मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री साईदरबारी, विखे पाटलांसह शिवराज सिंह चौहानांनी घेतलं साईदर्शन Madhya Pradesh Chief Minister Shivraj Singh Chouhan took darshan of Shirdi Sai Baba Shivraj Singh Chouhan : नवीन वर्षानिमित्त मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री साईदरबारी, विखे पाटलांसह शिवराज सिंह चौहानांनी घेतलं साईदर्शन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/01/6854b73592ed6d7851a7d139a13b080e1672540302877339_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Shivraj Singh Chouhan : आज सर्वत्र नवीन वर्षाचं (New Year) जल्लोषात स्वागत केलं जात आहे. नवीन वर्षानिमित्त राज्यातील प्रसिद्ध देवस्थानच्या ठिकाणी दर्शनासाठी नागरिकांनी मोठ गर्दी केली आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Madhya Pradesh CM Shivraj Singh Chouhan) यांनी नवीन वर्षानिमित्त शिर्डीत साई दरबारी (Shirdi Sai Baba) हजेरी लावत दर्शन घेतलं. यावेळी राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) हे देखील उपस्थित होते.
कोरोना संकटानंतर तब्बल दोन वर्षांनी साई दरबारी नवीन वर्षाची सुरुवात करताना साईभक्तांचा आनंद ओसंडून वाहत आहे. मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. साई संस्थानकडून भाविकांच्या सुविधेसाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी देखील साईबाबाचे दर्शन घेतलं.
मध्यरात्री 12 वाजता फटाक्यांची आतिषबाजी
नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी साई दरबारी दरवर्षी लाखो भाविक येत असतात. यावर्षी देखील लाखो साईभक्त शिर्डीत दाखल झाले आहेत. देश विदेशातून आलेल्या साईभक्तांच्या गर्दीने मंदिर परिसर फुलून गेला होता. मध्यरात्री 12 वाजता फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. तसेच वाद्यांच्या तालावर नृत्य करत साईभक्तांनी मोठ्या जल्लोषात नवीन वर्षाचे स्वागत केलं.
मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी समृद्ध महाराष्ट्राचा संकल्प केलाय : राधाकृष्ण विखे पाटील
नवीन वर्षानिमित्त महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील सप्तनीक साईबाबाचे दर्शन घेतलं. त्यांनतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समृद्ध महाराष्ट्राचा संकल्प केला असल्याचे राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले. देशाच्या विकासासाठी, राज्याच्या विकासासाठी सर्वजण काम करुयात असेही विखे पाटील यावेळी म्हणाले.
महाविकास आघाडीच्या नेत्यांचं मानसिक संतुलन बिघडले, विखे पाटलांचा निशाणा
विरोधकांची मानसिक कोंडी झाली आहे. अधिवेशनात त्यांनी परस्परविरोधी वक्तव्य केली आहेत. विरोधक ..
बेताल वक्तव्य करत असल्याचे राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले. हिंदु धर्म, स्वधर्म यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी बलिदान दिलं आहे. अजित पवार यांना कळायला हवं की छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर आहेत. अजित पवार यांनी केलेल्या वक्त्याबद्दल माफी मागावी, आत्मक्लेष करावा असे विखे पाटील म्हणाले. मधल्या काळात शरद पवार यांनी देखील आक्षपार्ह वक्तव्य केलं होतं. महाविकास आघाडीच्या नेत्यांचं मानसिक संतुलन बिघडल्याचे विखे पाटील म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या:
Shirdi News : साईभक्तांनी मास्क वापरा आणि सोशल डिस्टन्सचं पालन करा, शिर्डीच्या साईबाबा संस्थानचे आवाहन
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)