Ahmednagar News : अहमदनगरमध्ये औरंगजेबाचा फोटो घेऊन तरुणाचा डान्स, व्हिडीओ व्हायरल; पोलिसांकडून चौघांविरोधात गुन्हा दाखल
Ahmednagar News : अहमदनगर (Ahmednagar) शहरातील 'त्या' प्रकरणी संबधित तरुणांवर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.
Ahmednagar News : अहमदनगर (Ahmednagar) शहरातील फकीरवाडा परिसरात दमबारा हजारी दर्गाचा सदंल उरुसदरम्यान (sandal Urus) डीजे लावण्यात आला होता. यावेळी काही तरुण डीजेच्या तालावर नाचत असताना औरंगजेबाचे (Aurangajeb) फोटो हातात घेऊन घोषणा देत असल्याचे समोर आले. दोन समाजात तेढ निर्माण प्रयत्न केल्याच्या आरोपावरून तरुणांवर भिंगार पोलीस स्टेशनमध्ये (Bhingar Police) गुन्हा दाखल केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून तणावाचे वातावरण निर्माण केले जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. राज्यातील अनेक भागात अशा प्रकारचे वादग्रस्त प्रकरणे समोर येत आहेत. अशातच अहमदनगर शहरातून वादग्रस्त घटना समोर आली आहे. अहमदनगर शहरातील फकीरवाडा भागातील आहे. फकीरवाड्यात संदल उरूस उत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं होत. या उत्साहादरम्यान काही युवक औरंगजेबाचे फोटो घेऊन नाचत होते. याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावरही (viral video) व्हायरल होत आहे. संबंधित प्रकार हा रविवारी रात्रीचा असल्याची माहिती समोर येत आहे. तरुण औरंगजेबाचा फोटो हातात घेऊन नाचले असल्यामुळे यावरुन वाद होण्याची शक्यता आहे.
अहमदनगर शहरातील फकीरवाडा परिसरात रविवारी रात्री उरूसाच्या संदल मिरवणुकीत औरंगजेबाचे फोटो घेऊन काही युवक नाचत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यासंदर्भात नगर शहरात विविध संघटनांकडून निषेध व्यक्त होत आहे. शिवसेनेचे प्रवक्ते संजीव भोर यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. ते म्हणाले, हे पोस्टर झळकावणारे देशद्रोही, शिवद्रोही आहेत. यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल होणे आवश्यक असून हा दंगली घडवण्याचा कट आहे, ज्यांना कोणाला जुलमी, अत्याचारी औरंगजेबाचा पुळका असेल, अशा औरंगजेबाच्या वारसदारांनी पाकिस्तानात जाऊन रहावे, असा इशारा दिला आहे.
हिंदुत्ववादी संघटना आक्रमक
दरम्यान या प्रकरणी स्वतः पोलीस फिर्यादी झाले असून भिंगार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहमंद सर्फराज इब्राहिम सय्य्द उर्फ सर्फराज जहागिरदार, अफनान आदिल शेख उर्फ खडा, शेख सरवर, जावेद शेख उर्फ गब्बर यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर संशयितांच्या शोधासाठी पोलिसांनी शोध मोहीम हाती घेतली आहे. या प्रकारामुळे शहरामधील हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. तर या प्रकारावरून हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या असून तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात येत आहे. यावर बजरंग दलाचे शहराध्यक्ष कुणाल भंडारी म्हणाले कि, अशा पद्धतीने धुडगूस घालून तणावाची परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. मात्र एक महिन्याच्या आत औरंगजेबाच्या समाधी महाराष्ट्रातून एक महिन्याच्या आत हटवाव्यात, अन्यथा आम्ही तेथे घुसून ते उध्वस्त करू, असा इशारा भंडारी यांनी दिलाय...ऐकूनच या घटनेनंतर तीव्र संताप व्यक्त होत आहे.