Ahmednagar News : सहाय्यक अभियंत्याने फोडलं महावितरणचं कार्यालय; निलंबन केल्याच्या रागातून तोडफोड केल्याची चर्चा
Ahmednagar News : महावितरणच्या उपकार्यकारी अभियंता कार्यालयाच्या केबीनची सहाय्यक अभियंत्याने तोडफोड केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
![Ahmednagar News : सहाय्यक अभियंत्याने फोडलं महावितरणचं कार्यालय; निलंबन केल्याच्या रागातून तोडफोड केल्याची चर्चा Assistant Engineer vandalized Mahavitaran office in Jamkhed ahmednagar maharashtra marathi news Ahmednagar News : सहाय्यक अभियंत्याने फोडलं महावितरणचं कार्यालय; निलंबन केल्याच्या रागातून तोडफोड केल्याची चर्चा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/06/cab2bbda94dfb08c5b3cafe19b945d061704521553564923_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Ahmednagar News अहमदनगर : येथे महावितरणच्या (Mahavitaran) कार्यालयात महावितरणच्याच कर्मचाऱ्याकडून तोडफोड झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सहाय्यक अभियंत्याने (Assistant Engineer) महावितरण विभागीय कार्यालयाची तोडफोड केली आहे. या सहाय्यक अभियंत्याचे नाव प्रल्हाद टाक (Prahlad Tak) असल्याची माहिती मिळत आहे. वरिष्ठ कार्यालयाकडून कारवाईचे पत्र (Letter) मिळाल्यानंतर संतप्त झालेल्या टाक यांनी जामखेड (Jamkhed) येथील महावितरण विभागीय कार्यालयाची (Mahavidran Divisional Office) तोडफोड केल्याची चर्चा आहे. या घटनेमुळे महावितरणच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महावितरण कंपनीच्या उप कार्यकारी अभियंता कार्यालयाच्या केबीनची महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याने शुक्रवारी लाकडी दांडक्याने तोडफोड केली. यावेळी उपअभियंता शरद चेचर उपस्थित नव्हते. परंतु काही कर्मचारी त्या ठिकाणी उपस्थित होते.
लाकडी दांडक्याने केली तोडफोड
जामखेड येथील महावितरण कार्यालयातील (Jamkhed Mahavitaran Office) उपअभियंता शरद चेचर यांची केबीनची महावितरणच्या कर्मचाऱ्याने लाकडी दांडक्याने तोडफोड केल्याने कार्यालयात काचांचा खच पडला होता. तोडफोड करताना एका कर्मचाऱ्याने टाक यांना रोखण्याचा प्रयत्न केला होता. मात्र टाक यांनी त्या कर्मचाऱ्यास देखील मारहाण केल्याचे समजते.
निलंबनचा प्रस्ताव पाठवल्यामुळे हा प्रकार घडल्याची चर्चा
याबाबत महावितरणच्या वरिष्ठ अधिकारी यांना माहिती समजताच त्यांनी प्रत्यक्षदर्शनी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना फिर्याद देण्यास सांगितले होते. परंतु रात्री उशिरापर्यंत फिर्याद दाखल झाली नाही. उपअभियंत्याने फोडतोड करणाऱ्या कर्मचाऱ्याचा निलंबनचा (Suspension) प्रस्ताव पाठवल्यामुळे हा प्रकार घडल्याची चर्चा आहे.
वरिष्ठ काय भूमिका घेणार?
दरम्यान या घटनेबाबत कार्यालयातील महावितरण (Mahavitaran) कर्मचारी हे गुन्हा दाखल करण्यासाठी जामखेड पोलीस ठाण्यात (jamkhed Police Station) गेले होते. मात्र या घटनेत ज्या कर्मचाऱ्याला मारहाण झाली. त्या कर्मचाऱ्याने गुन्हा दाखल करावा की कार्यालय प्रमुखाने गुन्हा दाखल करावा याबाबत एकमत झाले नाही. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. त्यातच या घटनेबाबत माहिती घेण्यासाठी कार्यालय प्रमुखांना दूरध्वनीवरून संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.या घटनेने महावितरण विभागाच्या वर्तुळात चर्चेला उधाण आले असून याबाबत वरिष्ठ काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)