एक्स्प्लोर

Ahmednagar : 'सुना है दुश्मनों की गली में आज कल मातम है.... बाळासाहेब थोरातांच्या संगमनेरात विखेंची ताबडतोड शेरोशायरी 

Ahmednagar News : संगमेनर (Sangamner) येथील एका कव्वाली कार्यक्रमादरम्यान राधाकृष्ण विखे पाटलांनी चक्क शेरोशायरी करत थोरात यांच्यावर टीका केली. 

अहमदनगर : 'किसी ने मुझे पूछा आपका दोस्त संगमनेर मे है, वहा आपका क्या काम हैं.. मैंने मुस्कुराते हुए जवाब दिया जहा मेरा दोस्त नाकाम है, वही तो मेरा सबसे जादा काम है!' अशा शब्दांत राधाकृष्ण विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांच्या उपरोधिकपणे टीका केली आहे. बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे यांच्यातील राजकीय संघर्ष महाराष्ट्राला (Mharashtra Poltics) नवीन नाही, अनेकदा यांच्या संघर्षामुळे राजकीय समीकरणे बदलल्याची महाराष्ट्राने पाहिली. एका पक्षात असताना या दोन्ही नेत्यांचा जमलं नाही, ते दोन्ही नेते आज परस्परविरोधी पक्षात आहेत. संगमेनर (Sangamner) येथील एका कव्वाली कार्यक्रमादरम्यान राधाकृष्ण विखे पाटलांनी चक्क शेरोशायरी करत थोरात यांच्यावर टीका केली. 

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आणि भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushna Vikhe Patil) कोणे एकेकाळी सोबत काम करत असत. मात्र कालांतराने राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपाची वाट धरली, त्यानंतर दोघांमध्येही चांगलाच वाद रंगू लागला आहे. विरोधी पक्षात असल्याने दोन्ही नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. अशातच संगमनेर शहरात सुरु असलेल्या ख्वाजा पीर मोहम्मद ऊरुस निमित्त राधाकृष्ण विखे पाटील हे बाळासाहेब थोरात यांच्या मतदारसंघात (Ahmednagar) आले होते आणि या उरुस कमिटीने आयोजित केलेल्या कव्वाली कार्यक्रमादरम्यान राधाकृष्ण विखे पाटलांनी चक्क शेरोशायरी करत थोरात यांच्यावर टीका केली आहे. 'किसी ने मुझे पूछा आपका दोस्त संगमनेर में है, वहा आपका क्या काम है.. मैंने मुस्कुराते हुए जवाब दिया जहा मेरा दोस्त नाकाम है, वही तो मेरा सबसे जादा काम है...'

गेल्या तीन दिवसांपासून संगमनेर शहरात ख्वाजा पीर मोहम्मद यांचा उरुस Urus) सुरु आहे. हिंदू मुस्लीम एकतेचा प्रतीक असलेल्या या ठिकाणी अनेक नेत्यांनी दर्ग्यावर हजेरी लावत चादर अर्पण केली. राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुद्धा काल रात्री या ठिकाणी हजेरी लावली. दर्ग्यावर चादर अर्पण केल्यानंतर विखे पाटील मुख्यमंत्री व्हावेत, म्हणून मुस्लीम बांधवांनी प्रार्थनाही केली. यानंतर सुरु असलेल्या कव्वाली कार्यक्रमादरम्यान विखे पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना शेरोशायरीतून थोरात यांच्यावर निशाणा साधला आहे. विखे पाटील यांनी केलेली शेरोशायरी (Shayri) ही संगमनेर शहरासह नगर जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरतेय. मात्र थोरात यांच्यावर साधलेला शेरोशायरीतून हा निशाणा किती जिव्हारी लागणार की थोरात यावर उत्तर देणार हे आगामी काळात स्पष्ट होईल.

सुना है दुश्मनों की गली में...

'सुना है दुश्मनों की गली में आज कल मातम है..लो हम आ गये विकास का सुरज रोशन करेंगे...ये आज का वादा है....जो काम वो कर ना सके व अब मुझे करना है.. ये आप सबको मेरा वादा है...किसी ने मुझे पूछा आपका दोस्त संगमनेर मे है, वहा आपका क्या काम है..... मैंने मुस्कुराते हुए जवाब दिया जहा मेरा दोस्त नाकाम है..वही तो मेरा सबसे जादा काम है... क्योंकी हम यारों के यार, वफादारों के लिए है दिलदार.. हमसे मुकाबला ना कर वरना ढूंढता रह जायेगा दर बदर..नजरवाले को तो हिंदू और मुसलमान दिखता है.. लेकिन मैं अंधा हूं साहब मुझे हर शक्स मे इंसान दिखता है. दुश्मनी का मेरा कोई वास्ता नही. लेकिन मेरे से करोगे तो बचने का कोई रास्ता नही, अशा पद्धतीची ताबडतोड शायरी विखे यांनी आपल्या अंदाजात उपस्थिताना ऐकवली. कव्वालीच्या कार्यक्रमात विखे पाटील यांनी केलेल्या शेरोशायरीला उपस्थित त्यांनीही चांगलीच साथ दिली. 

इतर महत्वाची बातमी : 

Video: जेव्हा मंत्री गुलाबराव पाटलांमधील 'कव्वाल' जागा होतो...! सुरेल आवाजात कव्वाली गायली अन् माहोलच बदलला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सDubai Sheikh Wife Bikini Special Report : पत्नीला बिकिनीत पाहण्यासाठी केला 400 कोटींचा चुराडाPune Metro Inauguration Special Report :दौरा रद्द झाला, मेट्रोचं लोकार्पण रखडलं; पुणकरांना जाम खटकलंChhatrapati Shivaji Maharaj Statue Special Report : पुतळा कुणामुळे कोसळला? आरोपी ठरले! कारवाई कधी?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
Embed widget