एक्स्प्लोर

Amol Kolhe : तो गट म्हणजे अजित पवार मित्र मंडळ; अमोल कोल्हेंचा जोरदार हल्लाबोल

Amol Kolhe News : खा. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचा 'अजित पवार मित्र मंडळ' असा उल्लेख केला आहे. तसेच खा. सुजय विखेंवर देखील त्यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

Amol Kolhe अहमदनगर : येथील पिंपळगाव माळवी येथे विविध विकासकामांचा शुभारंभ शुकृवारी खासदार अमोल कोल्हे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी खा. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचा (NCP Ajit Pawar Group) अजित पवार मित्र मंडळ असा उल्लेख केला आहे. तसेच खा. सुजय विखेंवर (Sujay Vikhe-Patil) देखील अमोल कोल्हे यांनी जोरदार टीका केली आहे. 

महाराष्ट्राचे 48 खासदार आहेत, त्यापैकी उद्धव ठाकरे गटाचे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नऊ खासदार आहेत. बाकीचे भाजपचे, शिंदे गटाचे आणि अजित पवार मित्र मंडळाचे 39 खासदार आहेत. हे 39 खासदार कांदा निर्यात बंदीवर का बोलले नाही? असा सवाल अमोल कोल्हे यांनी विचारला. अद्याप निवडणूक आयोगाचा (Election Commission) निकाल लागलेला नाही त्यामुळे पक्षाचे नाव घेता येणार नाही. त्यांना मित्रमंडळच म्हणावे लागेल, असा टोला त्यांनी अजित पवार गटाला लगावला आहे. 

सुजय विखेंवर जोरदार हल्लाबोल

अयोध्यामध्ये प्रभू श्रीरामांचे मंदिर होतंय म्हणून तुमच्या भागातील लोकप्रतिनिधी साखर वाटत आहेत. मात्र ते ज्या वेळेला साखर वाटायला येतात तेव्हा त्यांना आधी हा प्रश्न विचारा की , केवळ साखर देऊन आमची तोंड बंद करण्यापेक्षा जेव्हा कांद्याची निर्यात बंदी सरकारने लादली तेव्हा तुमचं तोंड संसदेत का उघडलं नाही? असं म्हणत खासदार अमोल कोल्हे यांनी भाजप खासदार सुजय विखे यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

त्यांनी करोडोंची साखर वाटली का?

एकीकडे मागच्या आठ ते दहा महिन्यांमध्ये दुधाचे दर पाडून त्यांनी शेतकऱ्यांच्या खिशातून करोडो रुपये काढून घेतले. आता काय त्यांनी करोडोंची साखर वाटली का? असा सवाल करत खा. अमोल कोल्हे यांनी हिशोब मांडत खा. सुजय विखेंना चिमटा काढला आहे.

अशा लोकांना श्रीराम कसे पावतील?

दरम्यान, खासदार अमोल कोल्हे यांनी गुरुवारी शिर्डी येथे झालेल्या राष्ट्रवादीच्या शिबिरात त्यांनी अजित पवार आणि भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले की, “प्रभू श्रीराम हे आमचे दैवत आहेत. ते मर्यादा पुरुषोत्तम आहेत. प्रभू श्रीरामांनी वडिलांच्या वचनाची पूर्तता करण्यासाठी वनवास पत्करला होता. आज मात्र पितृतुल्य गुरुंना वनवासात जाण्याचा, निवृत्ती घेण्याचा सल्ला दिला जातो. अशा लोकांना श्रीराम कसे पावतील? जनता सूज्ञ आहे, असा हल्लाबोल त्यांनी अजित पवारांवर केला. 

भाजपवर हल्लाबोल

प्रभू श्रीराम हे जनतेच्या मनात आहेत. प्रत्येकाच्या हृदयात आहेत. चार खांद्यावर जातानाही जय राम श्रीराम जय जय राम असे म्हटले जाते. दोन माणसे भेटतात तेव्हा राम राम म्हणतात. माणसे जोडणारा राम भारताच्या मनात आहे. कुठल्याही राजकीय पक्षाने अधिकार सांगण्याचा प्रयत्न केला तर रामभक्त ते मान्य करणार नाहीत, असा टोला त्यांनी भाजपला लगावला.

इतर महत्वाच्या बातम्या

Amol Kolhe Speech : निवडणुकीच्या आधी वचनं, मग चुनावी जुमला सांगून टाळायचं, प्रभू श्रीराम कसे पावतील?; अमोल कोल्हेंचा बाण

Nashik News : दुर्दैवी! नाशिकमधील 'त्या' गॅस गळतीत जखमी झालेल्या दोघांचा मृत्यू; चार दिवस मृत्यूशी झुंज अपयशी

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Accident: विसर्जन मिरवणुकीत विजेच्या तारांना स्पर्श झाला, भाईंदरमध्ये तरुणाचा जागेवर मृत्यू, दुसरा तरुण थोडक्यात बचावला
विसर्जन मिरवणुकीत विजेच्या तारांना स्पर्श झाला, भाईंदरमध्ये तरुणाचा जागेवर मृत्यू, दुसरा तरुण थोडक्यात बचावला
Omraje Nimbalkar VS Ranajagjitsinha Patil: नादी लागू नको माझ्या तूला चांगलाच रडवीन...; गणेश विसर्जन मिरवणुकीत खासदार ओमराजे अन् आमदार राणाजगजितसिंह पाटलांचे पुत्र आमनेसामने
नादी लागू नको माझ्या तूला चांगलाच रडवीन...; गणेश विसर्जन मिरवणुकीत खासदार ओमराजे अन् आमदार राणाजगजितसिंह पाटलांचे पुत्र आमनेसामने
Maratha Reservation Devendra Fadnavis: आरक्षणाचे जनक... देवेंद्र बाहुबली! सुरेश धसांच्या मतदारसंघातील बॅनर्सने चर्चांना उधाण
आरक्षणाचे जनक... देवेंद्र बाहुबली! सुरेश धसांच्या मतदारसंघातील बॅनर्सने चर्चांना उधाण
GST कपातीनंतर आता बुलेट 350 किती हजारांनी स्वस्तात मिळेल? खरेदी करण्यापूर्वी माहिती हवीच!
GST कपातीनंतर आता बुलेट 350 किती हजारांनी स्वस्तात मिळेल? खरेदी करण्यापूर्वी माहिती हवीच!
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Eknath Shinde : जरांगेंना शिंदेंचं कौतुक, फडणवीसांचा राग का? माझाच्या न्यूजरुममध्ये DCM एकनाथ शिंदे
Nagpur Police Security : ईद-ए-मिलाद आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागूपरात कडेकोट बंदोबस्त
Nagpur Police Security : ईद-ए-मिलाद आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागूपरात कडेकोट बंदोबस्त
Raj Kundra Shilpa Shetty Notice : राज कुंद्रा, शिल्पा शेट्टीला मोठा धक्का; लुकआऊट नोटीस जारी होणार?
Thackeray Brothers Alliance | मुंबईत ठाकरे बंधूंचाच महापौर होणार, राऊतांचे विरोधकांना आव्हान!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Accident: विसर्जन मिरवणुकीत विजेच्या तारांना स्पर्श झाला, भाईंदरमध्ये तरुणाचा जागेवर मृत्यू, दुसरा तरुण थोडक्यात बचावला
विसर्जन मिरवणुकीत विजेच्या तारांना स्पर्श झाला, भाईंदरमध्ये तरुणाचा जागेवर मृत्यू, दुसरा तरुण थोडक्यात बचावला
Omraje Nimbalkar VS Ranajagjitsinha Patil: नादी लागू नको माझ्या तूला चांगलाच रडवीन...; गणेश विसर्जन मिरवणुकीत खासदार ओमराजे अन् आमदार राणाजगजितसिंह पाटलांचे पुत्र आमनेसामने
नादी लागू नको माझ्या तूला चांगलाच रडवीन...; गणेश विसर्जन मिरवणुकीत खासदार ओमराजे अन् आमदार राणाजगजितसिंह पाटलांचे पुत्र आमनेसामने
Maratha Reservation Devendra Fadnavis: आरक्षणाचे जनक... देवेंद्र बाहुबली! सुरेश धसांच्या मतदारसंघातील बॅनर्सने चर्चांना उधाण
आरक्षणाचे जनक... देवेंद्र बाहुबली! सुरेश धसांच्या मतदारसंघातील बॅनर्सने चर्चांना उधाण
GST कपातीनंतर आता बुलेट 350 किती हजारांनी स्वस्तात मिळेल? खरेदी करण्यापूर्वी माहिती हवीच!
GST कपातीनंतर आता बुलेट 350 किती हजारांनी स्वस्तात मिळेल? खरेदी करण्यापूर्वी माहिती हवीच!
Nashik Crime : कर्ज घेतलं, काही रक्कम परत करूनही सावकारांकडून वसुलीसाठी तगादा, नाशिकमध्ये कामगाराने विष पिऊन आयुष्य संपवलं!
कर्ज घेतलं, काही रक्कम परत करूनही सावकारांकडून वसुलीसाठी तगादा, नाशिकमध्ये कामगाराने विष पिऊन आयुष्य संपवलं!
Rohit Pawar: 'देवाभाऊ' म्हणत कोट्यवधींच्या निनावी जाहिराती नेमक्या कोणी दिल्या? रोहित पवारांनी उगम शोधून काढला! म्हणाले, मंत्र्यानेच दिल्या, पण...
'देवाभाऊ' म्हणत कोट्यवधींच्या निनावी जाहिराती नेमक्या कोणी दिल्या? रोहित पवारांनी उगम शोधून काढला! म्हणाले, मंत्र्यानेच दिल्या, पण...
Nanded Ganesh Visarjan 2025 : नांदेडमध्ये गणेश विसर्जनासाठी गेले अन् आक्रीत घडलं, पाय घसरल्याने तिघे पाण्यात बुडाले; एक बचावला, दोघांचा शोध सुरु
नांदेडमध्ये गणेश विसर्जनासाठी गेले अन् आक्रीत घडलं, पाय घसरल्याने तिघे पाण्यात बुडाले; एक बचावला, दोघांचा शोध सुरु
Election Commission: राहुल गांधींच्या दणक्यानंतर निवडणूक आयोगाला अखेर जाग आली, अखेर पहिला निर्णय घेतला!
राहुल गांधींच्या दणक्यानंतर निवडणूक आयोगाला अखेर जाग आली, अखेर पहिला निर्णय घेतला!
Embed widget