GST कपातीनंतर आता बुलेट 350 किती हजारांनी स्वस्तात मिळेल? खरेदी करण्यापूर्वी माहिती हवीच!
नवीन जीएसटी सुधारणांनुसार, 260 सीसी पर्यंतच्या स्कूटर आणि बाईक आता स्वस्त झाल्या आहेत, तर 350 सीसी पेक्षा जास्त क्षमतेच्या बाईक महाग होतील.

'गब्बर सिंग टॅक्स' अशी टीका जीएसटीवरून होत राहिल्यानंतर आता केंद्र सरकारने जीएसटी दरांमध्ये सुधारणा केली आहे. दुचाकी आणि चारचाकीवर सारख्याच 28 टक्के जीएसटीने वाहनांच्या किंमती गगनाला भिडल्या होत्या. आता जीएसटी कपात झाल्याने कार आणि मोटारसायकल खरेदी करणे थोडं सोपं होणार आहे. जीएसटी कपातीनंतर दोन्हींच्या किमती कमी होतील.
नवीन जीएसटी सुधारणांनुसार, 260 सीसी पर्यंतच्या स्कूटर आणि बाईक आता स्वस्त झाल्या आहेत, तर 350 सीसी पेक्षा जास्त क्षमतेच्या बाईक महाग होतील. बाईकवरील जीएसटी 28 वरून 18 टक्क्यांपर्यंत कमी होईल. हे जीएसटी दर 22 सप्टेंबरपासून लागू होतील. जर तुम्ही येत्या काळात रॉयल एनफील्ड बुलेट 350 खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की ही बाईक तुम्हाला पूर्वीच्या तुलनेत किती स्वस्त मिळेल?
बाईकची किंमत किती कमी होईल?
रॉयल एनफील्ड बुलेट 350 ला 349 सीसी इंजिन मिळते. बुलेट 350 ची एक्स-शोरूम किंमत 1 लाख 76 हजार रुपये आहे. सध्या या बाईकवर 28 टक्के जीएसटी कर आकारला जातो. अशा परिस्थितीत, जर हा जीएसटी कर 10 टक्के कमी केला तर लोकांना ही बाईक खरेदी करण्यावर 17 हजार 663 रुपयांचा फायदा मिळेल.
रॉयल एनफील्ड 230 ची पॉवर आणि मायलेज
- रॉयल एनफील्ड बुलेट 350 मध्ये सिंगल-सिलेंडर, 4-स्ट्रोक, एअर-ऑइल कूल्ड इंजिन आहे.
- बाईकमधील हे इंजिन 6100 आरपीएमवर 20.2 बीएचपी पॉवर आणि 4000 आरपीएमवर 27 एनएम टॉर्क देते.
- या मोटरसायकलच्या इंजिनसोबत 5-स्पीड कॉन्स्टंट मेश गिअर बॉक्स देखील बसवण्यात आला आहे.
- ही बाईक 35 किमी प्रति लिटर मायलेज देते. या बाईकची इंधन टाकीची क्षमता 13 लिटर आहे.
- टाकी भरल्यानंतर ही मोटरसायकल सुमारे 450 किलोमीटर अंतर कापू शकते.
बाईकची सुरक्षा वैशिष्ट्ये
- रॉयल एनफील्ड बुलेट 350 च्या ब्रेकिंग सिस्टममध्ये समोर डिस्क ब्रेक आणि मागील बाजूस ड्रम ब्रेक आहेत.
- सुरक्षेसाठी, त्यात ABS प्रणाली देण्यात आली आहे. मिलिटरी व्हेरियंटमध्ये सिंगल चॅनेल ABS उपलब्ध आहे आणि ब्लॅक गोल्ड व्हेरियंटमध्ये ड्युअल चॅनेल ABS उपलब्ध आहे.
- बुलेट 350 च्या रंग पर्यायांमध्ये मिलिटरी रेड, ब्लॅक, स्टँडर्ड मरून आणि ब्लॅक गोल्ड यांचा समावेश आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
























