(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ahmednagar Politics: "श्रीरामपूर जिल्हा झालाच पाहिजे", वेगळ्या जिल्ह्यासाठी श्रीरामपूरकर आग्रही; आज शहर कडकडीत बंद
आठ दिवसांपासून विविध आंदोलनाच्या माध्यमातून सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न श्रीरामपूर जिल्हा कृती समितीच्या वतीने करण्यात येतोय. याच मागणीसाठी आज श्रीरामपूर शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले आहे.
अहमदनगर : राज्यातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा म्हणून अहमदनगर जिल्हा (Ahmednagar News) ओळखला जातो. गेल्या 40 वर्षांपासून जिल्हा विभाजनाची मागणी प्रलंबित आहे. 15 ऑगस्टपूर्वी अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन करून श्रीरामपूर (Shrirampur) जिल्हा मुख्यालय करावं ही मागणी आता जोर धरू लागली आहे. गेल्या आठ दिवसांपासून विविध आंदोलनाच्या माध्यमातून सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न श्रीरामपूर जिल्हा कृती समितीच्या वतीने करण्यात येतोय. याच मागणीसाठी आज श्रीरामपूर शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले आहे.
शरद पवार मुख्यमंत्री असताना जिल्ह्याची घोषणा त्यांनी सोनई येथील एका कार्यक्रमात केली होती. तेव्हापासूनच जिल्हा विभाजनाची मागणी जोर धरू लागली. श्रीरामपूर पाठोपाठ संगमनेर तालुक्याने सुद्धा मुख्यालयाची मागणी केली आहे तर शिर्डीकर सुद्धा जिल्हा मुख्यालय होण्यासाठी आग्रही आहेत. याचमुळे गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा विभाजनाचा प्रश्न शासन दरबारी प्रलंबीत असून हे जिल्हा विभाजन होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलय. 15 ऑगस्ट पूर्वी जिल्हा विभाजन केलं नाही तर मंत्र्यांना तालुक्यात फिरू देणार नाही असा इशारा जिल्हा कृती समितीने दिलाय आहे.
श्रीरामपूरकर मुख्यलयासाठी आग्रही
ज्याही वेळी या ना त्या कारणाने जिल्हा विभाजनाचा विषय चर्चेत येतो, त्यावेळेस जिल्हा मुख्यालयासाठी आग्रही असलेले तालुक्यातील सर्वपक्षीय नेते आणि जनता आक्रमक होतात. जिल्हा विभाजनाचा विषय फार पूर्वीचा आहे. यात श्रीरामपूर शहरातील नागरिक सर्वाधिक आग्रही राहिले आहेत. उत्तर नगर जिल्ह्यात अकोले, संगमनेर, राहाता, कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासे हे तालुके येतात. यात भौगोलिक मध्य हा श्रीरामपूर तालुका येतो.
सरकार जिल्हा विभाजनाचा निर्णय घेणार?
अहमदनगर (Ahmednagar) जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा. 17412 चौ. किमी असलेला हा जिल्हा तसा दोन भागात विभागाला आहे. उत्तर नगर जिल्हा आणि दक्षिण नगर जिल्हा. मागच्या वर्षांपासून राजकारण रंगत आहे, तसंच ते जिल्हा विभाजनावरुन (Division) देखील रंगत आहे. गोवा राज्यापेक्षा पाचपट क्षेत्रफळ असलेला अहमदनगर जिल्हा आहे. आगामी काळात सरकार जिल्हा विभाजनाचा निर्णय घेणार का हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
हे ही वाचा :
लग्नाळू शेतकरीपुत्रांची लाखो रुपयांना फसवणूक, 8 महिन्यांत 9 मुलांसोबत 'सिमरन'चे लग्न; इथं फसला डाव