एक्स्प्लोर

Ahmednagar Crime : मुस्लीम मुलीशी लग्नानंतर महिनाभराने अपहरण झालेल्या भोकरमधील तरुणाचा खून, आरोपींची कबुली

Ahmednagar Crime : अहमदनगर जिल्ह्याच्या श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथील अपहरण झालेल्या तरुणाचा खून झाल्याचं समोर आलं आहे. मुस्लीम तरुणीशी विवाह केल्यानंतर महिनाभराने या तरुणाचं अपहरण झालं होतं.

Ahmednagar Crime : अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्याच्या श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथील अपहरण झालेल्या तरुणाचा खून झाल्याचं समोर आलं आहे. अटकेत असलेल्या आरोपींनीच खून केल्याची कबुली दिली आहे. दीपक बर्डे असं या तरुणाचं नाव आहे. मुस्लीम तरुणीशी विवाह केल्यानंतर महिनाभराने या तरुणाचं अपहरण झालं होतं. मित्रासोबत नोकरी शोधण्यासाठी पुण्यात जातो असं सांगून 30 ऑगस्ट रोजी घराबाहेर पडलेला दीपक बर्डे हा नंतर परतलाच नाही. 

पत्नीला भेटण्याआधीच तिच्या मामाने गाठलं आणि अपहरण केलं 
श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथे राहणाऱ्या दीपक बर्डे या आदिवासी भिल्ल समाजाच्या तरुणाचे मुस्लीम मुलीशी प्रेम जुळलेले होते. या संबंधांना मुलीच्या घरच्यांचा मात्र तीव्र विरोध होता. दोघेही सज्ञान असल्याने घरच्यांच्या अपरोक्ष दोघांनी महिन्यापूर्वी लग्नगाठ बांधली आणी आयुष्यभर सोबत राहण्याच्या आणाभाकाही घेतल्या. मात्र मुलीच्या घरच्यांनी दीपकला मारहाण आणि दमदाटी करत तिला परत घरी नेले होते. आपली पत्नी पुण्यात तिच्या मामाच्या घरी असल्याचं कळल्यानंतर, 30 ऑगस्ट रोजी दीपकने घरच्यांना आपण मित्रासोबत नोकरी शोधायला पुण्याला जात असल्याचं सांगत पुणे गाठले. परंतु पत्नीला भेटण्याच्या आतच दीपकला मुलीच्या मामाने गाठले आणि त्याला मारहाण करत त्याचे अपहरण केले, असं दीपकच्या सोबत असलेल्या मित्राने सांगितलं.

पोलिसांकडून गोदावरी नदीपात्रात मृतदेहाचा शोध सुरु
आपला मुलगा बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबियांनी घातपाताचा संशय व्यक्त केला. वडिलांच्याया फिर्यादीनंतर श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. पोलिायांनी या प्रकरणी सात जणांना अटक केली. आता या आरोपींनी दीपक बर्डेचा खून केल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे पोलिसांनी गोदावरी नदीपात्रात मृतदेह शोधण्यासाठी शोधमोहीम सुरु केली आहे. महत्त्वाचं म्हणजे भाजपचे आमदार नितेश राणे यांनी दोन दिवसांपूर्वीच अपहृत दीपक बर्डेच्या शोधासाठी मोर्चा काढला होता.

तरुणाच्या खुनामुळे प्रकरण आणखी तापणार?
दरम्यान, लव्ह जिहादमुळे नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुका आधीच चर्चेत आला आहे. आता त्यात या नवा प्रकरणाची भर पडली आहे. मुस्लीम तरुणीशी महिनाभरापूर्वी विवाह करणारा तरुण बेपत्ता झाल्याने कुटुंबियांनी आधीच घातपातचा संशय व्यक्त केला होता. त्यात अटकेतील आरोपींनी खुनाची कबुली दिल्याने हे प्रकरण आणखीच तापण्याची चिन्हं आहेत. दोषींवर कारवाई केली नाही तर हिंदू संघटना तीव्र आंदोलन छेडण्याची शक्यता आहे. त्यामुळे लव्ह जिहादच्या मुद्यावरुन बदनाम होणारं श्रीरामपूर यातून कधी बाहेर पडणार असा प्रश्न आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापुजा संपन्न, विठुनामाच्या गजरात पंढरी दुमदुमली
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापुजा संपन्न, विठुनामाच्या गजरात पंढरी दुमदुमली
Dombivli : मित्रांसोबत मस्करी करताना महिलेचा तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू, डोंबिवलीतील धक्कादायक घटना
मित्रांसोबत मस्करी करताना महिलेचा तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू, डोंबिवलीतील धक्कादायक घटना
Ashadhi Ekadashi Wishes Photos : आषाढी एकादशीनिमित्त प्रियजनांना पाठवा 'हे' खास शुभेच्छा संदेश, आठवा विठ्ठ्लाचं रुप
PHOTOS : आषाढी एकादशीनिमित्त प्रियजनांना पाठवा 'हे' खास शुभेच्छा संदेश, आठवा विठ्ठ्लाचं रुप
Ashadhi Ekadashi Captions : आषाढी एकादशीच्या फोटोंना द्या 'हे' सुंदर कॅप्शन्स; खुलवा तुमच्या फोटोंचं सौंदर्य, वाचा हटके कॅप्शन्सची लिस्ट
आषाढी एकादशीच्या फोटोंना द्या 'हे' सुंदर कॅप्शन्स; खुलवा तुमच्या फोटोंचं सौंदर्य, वाचा हटके कॅप्शन्सची लिस्ट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Vitthal Majhi Wari :  विठुरायासाठी खास रेशमी पोशाखShankaracharya Special Report : शंकराचार्यांच्या प्रतिक्रियेवर कुणाचं काय मत?Narayan Survey Special Report : नारायण सुर्वेंचा फोटो पाहताच चोराचा माफीनामाTop 25 : टॉप 25 न्यूज : 10 PM : 16 July 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापुजा संपन्न, विठुनामाच्या गजरात पंढरी दुमदुमली
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापुजा संपन्न, विठुनामाच्या गजरात पंढरी दुमदुमली
Dombivli : मित्रांसोबत मस्करी करताना महिलेचा तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू, डोंबिवलीतील धक्कादायक घटना
मित्रांसोबत मस्करी करताना महिलेचा तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू, डोंबिवलीतील धक्कादायक घटना
Ashadhi Ekadashi Wishes Photos : आषाढी एकादशीनिमित्त प्रियजनांना पाठवा 'हे' खास शुभेच्छा संदेश, आठवा विठ्ठ्लाचं रुप
PHOTOS : आषाढी एकादशीनिमित्त प्रियजनांना पाठवा 'हे' खास शुभेच्छा संदेश, आठवा विठ्ठ्लाचं रुप
Ashadhi Ekadashi Captions : आषाढी एकादशीच्या फोटोंना द्या 'हे' सुंदर कॅप्शन्स; खुलवा तुमच्या फोटोंचं सौंदर्य, वाचा हटके कॅप्शन्सची लिस्ट
आषाढी एकादशीच्या फोटोंना द्या 'हे' सुंदर कॅप्शन्स; खुलवा तुमच्या फोटोंचं सौंदर्य, वाचा हटके कॅप्शन्सची लिस्ट
Kim Kardashian : श्रीगणेशाच्या मूर्तीसोबत किम कार्दाशियनचं फोटोशूट, फोटो व्हायरल होताच नेटकरी संतापले
श्रीगणेशाच्या मूर्तीसोबत किम कार्दाशियनचं फोटोशूट, फोटो व्हायरल होताच नेटकरी संतापले
Kamathipura : कामाठीपुरातील 100 वर्षे जुन्या इमारतीवर हातोडा पाडण्यास हायकोर्टाची परवानगी, भाडेकरुंना दिलासा देण्यास नकार
कामाठीपुरातील 100 वर्षे जुन्या इमारतीवर हातोडा पाडण्यास हायकोर्टाची परवानगी, भाडेकरुंना दिलासा देण्यास नकार
वरळी अपघातातील  मिहीर शाहाला व्हीआयपी ट्रीटमेंट, कोर्टात आणण्यासाठी खासगी कार; पोलीस एवढी मेहरबान का?
वरळी अपघातातील मिहीर शाहाला व्हीआयपी ट्रीटमेंट, कोर्टात आणण्यासाठी खासगी कार; पोलीस एवढी मेहरबान का?
Video : माझा राजा रं... विशाळगडावर शाहू महाराजांनी अंगावरील जॅकेट काढलं, पावसात भिजणाऱ्या चिमुकलीला घातलं; लाखोंचं मन जिंकलं
Video : माझा राजा रं... विशाळगडावर शाहू महाराजांनी अंगावरील जॅकेट काढलं, पावसात भिजणाऱ्या चिमुकलीला घातलं; लाखोंचं मन जिंकलं
Embed widget