मोठी बातमी : माजी आमदारास महिला अत्याचार प्रकरणात बेड्या, अहमदनगरमध्ये एकच खळबळ
Ahmednagar Crime News : श्रीरामपूरच्या माजी आमदारास महिला अत्याचार प्रकरणी अटक करण्यात आली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
राहुरी : अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूरच्या (Shrirampur) माजी आमदारास महिला अत्याचार प्रकरणी अटक करण्यात आली आहे. भानुदास मुरकुटे (Bhanudas Murkute) असे आमदाराचे नाव आहे. राहुरी पोलिसांनी (Rahul Police) सोमवारी मध्यरात्रीच्या दरम्यान मुरकुटे यांना त्यांच्या निवासस्थानावरून ताब्यात घेतले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, राहुरी तालुक्यातील एका महिलेने अत्याचार प्रकरणी सोमवारी संध्याकाळी फिर्याद दाखल केली होती. 2019 पासून मुंबई, दिल्ली तसेच जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार केल्याचा आरोप महिलेने केला आहे. पिडीत महिलेच्या फिर्यादीनंतर पोलीस अॅक्शन मोडवर आले.
माजी आमदारास बेड्या
श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्यावर आयपीसी कलम 376,328,418,506 अन्वये राहुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर पोलीस मुरकुटे यांना ताब्यात घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले. मात्र कामानिमित्त मुंबई येथे गेले होते. ते रात्री उशिरा श्रीरामपूर शहरात दाखल झाले. रात्री साडेअकराच्या दरम्यान राहुरी पोलिसांनी मुरकुटे यांना त्यांच्या निवासस्थानावरून ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. तर या घटनेमुळे अहिल्यानगरमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
अकोलेत दिवसाढवळ्या खून
दरम्यान, अकोले तालुक्यातील बेलापूर बदगी गावात जमिनीच्या आणि पैशाच्या किरकोळ वादातून दिराने भाऊजयांचा निर्घृण खून केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे ही घटना गावातील मुख्य बाजारपेठेच्या चौकापासून काही अंतरावर घडली. दत्तात्रय प्रकाश फापाळे (50) याने सख्खी लहान भावजयी उज्ज्वला अशोक फापाळे (38), चुलत भावजयी वैशाली संदीप फापाळे (40) यांची सोमवारी धारदार कोयत्याने हत्या केली. आरोपी दत्तात्रय फापाळे ऊर्फ बापू हा अविवाहित आहे. लहान भाऊ अशोक याचे लग्न झाले होते. मात्र दोन वर्षांपूर्वी त्याचे निधन झाले. त्याची पत्नी मृत उज्ज्वला आणि दोन मुले आळंदी येथे मोलमजुरीचे काम करत उदरनिर्वाह करतात. फाफळे कुटुंबाची बदगी गावात शेती आहे. त्या शेतीमध्ये दत्तात्रय आणि उज्ज्वला वर्षाआड शेती पीक घ्यायचे. शेतातील सोयाबीन काढण्यासाठी उज्ज्वला आली होती. उज्ज्वला गावाला आल्यापासून दीर दत्तात्रयचे पैशावरून वाद व्हायचे. वैशाली घटनास्थळाशेजारील दवाखान्यात उपचार घेऊन उज्ज्वलाशी गप्पा मारत होती. उज्ज्वलावर पहिला वार होताच ती सोडवायला गेली आणि तिच्यावरही सपासप तीन वार झाले आणि त्यातच दोघींचा जीव गेला.
आणखी वाचा