एक्स्प्लोर

Ahmednagar: भंडारदरा धरण परिसरात पर्यटकांची गर्दी; सेल्फी घेताना काळजी घेण्याचं आवाहन

Bhandardara Dam: अहमदनगरच्या अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाजवळ अनेक पर्यटनस्थळं आहेत, वीकेंड असल्याने पर्यटकांनी तिथे गर्दी केली आहे.

अकोले, अहमदनगर : सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटनस्थळांवर पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे, अशातच महाराष्ट्रातील पर्यटनाचं केंद्र असलेल्या भंडारदरा धरण (Bhandardara Dam) परिसरात देखील रविवारी (13 ऑगस्ट) सकाळपासूनच पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्याच्या भंडारदरा धरण परिसरात रंधा धबधबा (Randha Fall), नेकलेस फॉल (Necklace Fall), भंडारदरा धरण (Bhandardara Dam), अम्ब्रेला फॉल (Umbrella Fall) अशी विविध पर्यटनस्थळं आहेत.

धरण ओव्हरफ्लो, पर्यटकांची गर्दी

भंडारदरा धरण परिसरातील पर्यटनस्थळांचा आनंद घेण्यासाठी दरवर्षी पावसाळ्यात मोठी गर्दी होते. त्यातच आता सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे भंडारदरा धरण परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे. दरवर्षी 15 ऑगस्टपूर्वी भंडारदरा धरण ओव्हरफ्लो होण्याची परंपरा याही वर्षी कायम असल्याने निसर्गरम्य परिसराचं रूप आपल्या डोळ्यात टिपण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. 

पर्यटकांसाठी विशेष नियमावली

सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे भंडारदरा धरण परिसरात फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांसाठी विशेष नियमावली बनवण्यात आली आहे. भंडारदरा धरण क्षेत्रातील अनेक रस्त्यांवर एकेरी वाहतूक करण्यात आली आहे. नगर-पुणे मार्गे येणारे पर्यटक वाकी फाटा मार्गे भंडारदरा धरणावर पोहोचू शकतात, तर मुंबईहून येणारे पर्यटक थेट भंडारदरा धरण परिसरात पोहोचू शकतात. पर्यटकांचं मुख्य आकर्षणाचा केंद्र असलेल्या रंधा फॉल (Randha Fall) या ठिकाणी एकेरी वाहतुकीचं नियोजन करण्यात आलं आहे.

सेल्फी काढताना सावधान

रंधा फॉल (Randha Fall) येथे अनेक हिंदी चित्रपटांचं शूटिंग झालं आहे. रंधा धबधबा हे पर्यटकांच्या आकर्षणाचा मुख्य केंद्र आहे, या ठिकाणी पर्यटकांनी मोठी गर्दी केली असून येथील अनेक जागांवर पर्यटक आपल्या जीवावर उदार होत सेल्फी घेताना दिसून येत आहेत. संरक्षण कठडे लावलेले असतानाही संरक्षण कठडे ओलांडून अनेक पर्यटक सेल्फी घेण्यासाठी धबधब्याच्या जवळ जात आहेत. मात्र पर्यटकांनी आपल्या सुरक्षेची काळजी घेत पर्यटन करावं, असंच आवाहन एबीपी माझा सुद्धा करत आहे.

अनेक छोटे-मोठे धबधबे प्रवाहित

भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील घाटघर, रतनवाडी, कोथाळणे परिसरात गेले अनेक दिवस चांगला पाऊस झाला आहे, त्यामुळे भंडारदरा धरणाचा पाणीसाठा 100 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. सततच्या पावसाने परिसर हिरवागार झाला असून परिसरातील अनेक छोटे-मोठे धबधबे प्रवाहित झाले आहेत. तसेच पावसामुळे शेतकरी बांधव भात लागवडीसाठी सज्ज झाले आहेत.

हेही वाचा:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शुभमन गिल, सारा तेंडुलकरच्या डेटिंग रूमर्समध्ये व्हेकेशन PHOTOS झालेत Viral? क्रूझवर स्पेंड केला क्वॉलिटी टाईम
शुभमन गिल, सारा तेंडुलकरच्या डेटिंग रूमर्समध्ये व्हेकेशन PHOTOS झालेत Viral? क्रूझवर स्पेंड केला क्वॉलिटी टाईम
वाल्मिक कराडांमुळे कोंडी अन् राजीनाम्याचा दबाव ? धनंजय मुंडे परळीत वैजनाथाच्या दर्शनाला
वाल्मिक कराडांमुळे कोंडी अन् राजीनाम्याचा दबाव? धनंजय मुंडे परळीत वैजनाथाच्या दर्शनाला
मोठी बातमी! मुंबई, पुण्यासह राज्यभरात 'धुरळा' उडणार; महापालिका, ZP निवडणुका एप्रिलमध्ये होणार?
मोठी बातमी! मुंबई, पुण्यासह राज्यभरात 'धुरळा' उडणार; महापालिका, ZP निवडणुका एप्रिलमध्ये होणार?
Stock Market : सचिन तेंडुलकरची गुंतवणूक असलेल्या कंपनीला 960 कोटींची ऑर्डर, अपडेट येताच शेअर बनला रॉकेट
960 कोटींची ऑर्डर मिळताच शेअर बनला रॉकेट, सचिन तेंडुलकरनं देखील केलीय गुंतवणूक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Munde Vaijnath Mandir : धनंजय मुंडे परळी वैजनाथ मंदिरात, वैजनाथाची विधीवत पूजाBajrang Sonawane Full PC : 'ही' उत्तरं पंकजा मुंडेंकडून अपेक्षित नाही, बीड प्रकरणावरुन हल्लाबोल!Saif Ali Khan Attacked : सैफवरील हल्ल्यानंतरचा पहिला मोठा व्हिडीओ, पाहा EXCLUSIVE CLIPSaif Ali Khan Attacked : सैफवर प्राणघातक हल्ला, मानेवर 10 सेंटीमीटरची जखम,पाठीतही वार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शुभमन गिल, सारा तेंडुलकरच्या डेटिंग रूमर्समध्ये व्हेकेशन PHOTOS झालेत Viral? क्रूझवर स्पेंड केला क्वॉलिटी टाईम
शुभमन गिल, सारा तेंडुलकरच्या डेटिंग रूमर्समध्ये व्हेकेशन PHOTOS झालेत Viral? क्रूझवर स्पेंड केला क्वॉलिटी टाईम
वाल्मिक कराडांमुळे कोंडी अन् राजीनाम्याचा दबाव ? धनंजय मुंडे परळीत वैजनाथाच्या दर्शनाला
वाल्मिक कराडांमुळे कोंडी अन् राजीनाम्याचा दबाव? धनंजय मुंडे परळीत वैजनाथाच्या दर्शनाला
मोठी बातमी! मुंबई, पुण्यासह राज्यभरात 'धुरळा' उडणार; महापालिका, ZP निवडणुका एप्रिलमध्ये होणार?
मोठी बातमी! मुंबई, पुण्यासह राज्यभरात 'धुरळा' उडणार; महापालिका, ZP निवडणुका एप्रिलमध्ये होणार?
Stock Market : सचिन तेंडुलकरची गुंतवणूक असलेल्या कंपनीला 960 कोटींची ऑर्डर, अपडेट येताच शेअर बनला रॉकेट
960 कोटींची ऑर्डर मिळताच शेअर बनला रॉकेट, सचिन तेंडुलकरनं देखील केलीय गुंतवणूक
Shiv Sena UBT : स्वबळाची घोषणा दिलेल्या नागपुरातूनच नाराजीचा सूर; जिल्हाप्रमुख म्हणाले, पक्ष उद्धवसाहेब चालवतात की संजय राऊत?
स्वबळाची घोषणा दिलेल्या नागपुरातूनच नाराजीचा सूर; जिल्हाप्रमुख म्हणाले, पक्ष उद्धवसाहेब चालवतात की संजय राऊत?
Lamborghini in Mantralaya : मंत्रालयातील 'त्या' लॅम्बोर्गिनीबाबत मंत्री विखे पाटील पहिल्यांदाच बोलले; रोहित पवारांवर जोरदार पलटवार
मंत्रालयातील 'त्या' लॅम्बोर्गिनीबाबत मंत्री विखे पाटील पहिल्यांदाच बोलले; रोहित पवारांवर जोरदार पलटवार
Pankaja Munde: 'बीडचा विकास बारामतीसारखा करणार...', पंकजा मुंडेंकडून अजितदादांचं तोंडभरून कौतुक
'बीडचा विकास बारामतीसारखा करणार...', पंकजा मुंडेंकडून अजितदादांचं तोंडभरून कौतुक
Mutual Fund : एकाचवेळी 500000 गुंतवल्यास दीड कोटींचा कॉर्पस कसा तयार होईल? जाणून घ्या समीकरण
एकाचवेळी 500000 गुंतवल्यास दीड कोटींचा कॉर्पस कसा तयार होईल? जाणून घ्या समीकरण
Embed widget