एक्स्प्लोर

Naseeruddin Shah : दाक्षिणात्य चित्रपटांचं व्हिजन नेहमीच स्पष्ट असतं; नसीरुद्दीन शाह यांचं रोखठोक मत

Naseeruddin Shah On South Films : हिंदी चित्रपटसृष्टीतील दमदार अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी दक्षिण चित्रपटसृष्टीबद्दल आपलं मत मांडलं आहे.

Naseeruddin Shah On South Films : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते नसीरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) हे नेहमीच अनेक कारणांनी चर्चेत असतात. अनेक घडामोडींवर ते आपलं मत व्यक्त करतात. नुकतंच नसीरूद्दीन शाह यांनी दाक्षिणात्य चित्रपटांबद्दल आपलं मत मांडलं आहे. 'साऊथच्या चित्रपटांची कल्पना वेगळी असू शकते, पण त्यांचं व्हिजन नेहमीच स्पष्ट असतं' असं मत नसीरूद्दीन शाह यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केलं आहे. 

नसीरुद्दीन शाह यांनी साऊथ सिनेमांवर भाष्य केलं

इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत नसीरुद्दीन शाह यांनी साऊथ सिनेमांबद्दल आपलं मत मांडलं आहे. नसीरुद्दीन शाह यांनी म्हटलं आहे की, 'दक्षिणात्य चित्रपट अर्थातच काल्पनिक असतात, तुम्हाला त्यांची कल्पना विचित्र वाटू शकते. पण हे चित्रपट मूळ आणि निःपक्षपाती असतात. यामुळेच ते इतर चित्रपटांपेक्षा वेगळे ठरतात आणि लोकांचं लक्ष वेधून घेतात. दाक्षिणात्य चित्रपटांच्या मागे हिंदी चित्रपटांपेक्षा जास्त मेहनत घेतली जाते आणि त्याचा परिणाम चित्रपट रिलीज झाल्यानंतर स्पष्टपणे दिसतो.' असं मत नसीरूद्दीन शाह यांनी फिल्म इंडस्ट्रीबद्दल मांडलं आहे. यापूर्वीही आपण पाहिलं आहे की, पुष्पा, KGF 2 आणि RRR यांसारख्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर हिंदी चित्रपटांनाही मागे टाकलं आहे. 

हिंदी चित्रपटसृष्टीवर नसीरुद्दीन शाह यांची संतप्त प्रतिक्रिया 

अलीकडेच जश्न-ए-रेख्तामध्ये नसीरुद्दीन शाह यांनी हिंदी चित्रपटसृष्टीवर आपली भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. ते म्हणाले की, 'हिंदी चित्रपटांमध्ये नेहमीच धर्मांची खिल्ली उडवली जाते. अनेक चित्रपटांमध्ये आपण पाहिलं आहे की, मुस्लिम व्यक्ती मित्राची भूमिका साकारते आणि चित्रपटाच्या शेवटी मरतो. तसेच, शीख आणि पारशी लोक हे नेहमीच विनोदाचे पात्र राहिले आहेत. हे आपण वर्षानुवर्ष पाहात आलो आहोत'. असं म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला आहे. 

नसीरूद्दीन शाह यांच्या वर्क फ्रंटबद्दल 

नसीरूद्दीन शाह यांच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, येत्या 3 मार्चला 'ताज डिव्हायडेड बाय ब्लड'  ही वेब सीरिज झी-5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होणार आहे. या वेब सीरिजमध्ये नसिरुद्दीन शाह हे या सीरिजमध्ये अकबरची भूमिका साकारणार आहेत. तसेच, धर्मेंद्र, अदिती राव हैदरी आणि आशीम गुलाटी, ताहा शाह, शुभम कुमार मेहरा, राहुल बोस यांच्याही मुख्य भूमिका आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या : 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Nz Final T20 World Cup 2026 : न्यूझीलंडविरुद्ध फायनलमध्ये कशी असणार टीम इंडियाची प्लेइंग-11?, टीम इंडियाचा विश्वविजेता खेळाडू स्पष्ट बोलला...
न्यूझीलंडविरुद्ध फायनलमध्ये कशी असणार टीम इंडियाची प्लेइंग-11?, टीम इंडियाचा विश्वविजेता खेळाडू स्पष्ट बोलला...
Devendra Fadnavis on Loan Waiver: कर्जमाफीसाठी कोणते शेतकरी पात्र ठरणार? देवेंद्र फडणवीसांनी एका वाक्यात निकष स्पष्टच सांगितले, म्हणाले...
कर्जमाफीसाठी कोणते शेतकरी पात्र ठरणार? देवेंद्र फडणवीसांनी एका वाक्यात निकष स्पष्टच सांगितले, म्हणाले...
Mumbai Feriwala attack on BMC workers: मुंबईत फेरीवाल्यांचा BMC अधिकाऱ्यांवर हल्ला, पळवून पळवून मारलं, कांदिवलीत धडकी भरवणारं दृश्य
मुंबईत फेरीवाल्यांचा BMC अधिकाऱ्यांवर हल्ला, पळवून पळवून मारलं, कांदिवलीत धडकी भरवणारं दृश्य
Surya Shani Yuti 2026: पुढच्या 7 दिवसात 5 राशी खरं सुख पाहतील! सूर्य-शुक्राचं संक्रमण भाग्य उजळवणार, पैसा, नोकरी, प्रेम जीवनात जबरदस्त लाभ
पुढच्या 7 दिवसात 5 राशी खरं सुख पाहतील! सूर्य-शुक्राचं संक्रमण भाग्य उजळवणार, पैसा, नोकरी, प्रेम जीवनात जबरदस्त लाभ

व्हिडीओ

Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report
Shetkari KarjMafi : कर्जमाफी मिळणार, कधी, कशी आणि किती? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: थेट व्हाईट हाऊसमध्ये हे काय सुरुय? ट्रम्प खूर्चीवर डोळं मिटून बसले अन् सुटाबुटात आलेल्यांचा एकाचा हात डोक्यावर एकाचा पाठीवर अन्...!
Video: थेट व्हाईट हाऊसमध्ये हे काय सुरुय? ट्रम्प खूर्चीवर डोळं मिटून बसले अन् सुटाबुटात आलेल्यांचा एकाचा हात डोक्यावर एकाचा पाठीवर अन्...!
Accident News : पुणे बेंगलोर हायवेवर विचित्र अपघात; एसटी महामंडळाच्या हिरकणी बसचा टायर फुटला अन् बस थेट दुभाजकावर आदळली
पुणे बेंगलोर हायवेवर विचित्र अपघात; एसटी महामंडळाच्या हिरकणी बसचा टायर फुटला अन् बस थेट दुभाजकावर आदळली
सावधान! पुढील 2 दिवस राज्यभर उष्णतेचा हायअलर्ट, कमाल तापमान चाळीशी गाठणार ! हवामान विभागाचा अंदाज काय?
सावधान! पुढील 2 दिवस राज्यभर उष्णतेचा हायअलर्ट, कमाल तापमान चाळीशी गाठणार ! हवामान विभागाचा अंदाज काय?
Iranian Ship IRIS Lavan: अमेरिका-इस्रायलने इराणच्या 32 युद्धनौका समुद्रात बुडवल्या, पण 'ते' एक जहाज भारतामुळे सुरक्षित राहिलं, नेमकं काय घडलं?
अमेरिका-इस्रायलने इराणच्या 32 युद्धनौका समुद्रात बुडवल्या, पण 'ते' एक जहाज भारतामुळे सुरक्षित राहिलं, नेमकं काय घडलं?
Ameria Israel Iran War live Update: अमेरिका-इस्रायल-इराण युद्ध आठव्या दिवशीही सुरूच; 5 हजारांवर बॉम्ब फेकले, 1200 हून अधिक ठार; युद्धखोर मानवी क्रौर्याची परिसीमा गाठणारे 15 फोटो
अमेरिका-इस्रायल-इराण युद्ध आठव्या दिवशीही सुरूच; 5 हजारांवर बॉम्ब फेकले, 1200 हून अधिक ठार; युद्धखोर मानवी क्रौर्याची परिसीमा गाठणारे 15 फोटो
Ameria Israel Iran War live Update: युद्धाचे आठ दिवस होऊन चिवट इराण शरण येईना; इकडं आज रात्री अमेरिकेची आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या हल्ल्याची थेट धमकी, तिकडं इराणी मिसाईलींचा नवा लाॅट इस्त्रायलच्या दिशेनं डागला
युद्धाचे आठ दिवस होऊन चिवट इराण शरण येईना; इकडं आज रात्री अमेरिकेची आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या हल्ल्याची थेट धमकी, तिकडं इराणी मिसाईलींचा नवा लाॅट इस्त्रायलच्या दिशेनं डागला
Harshwardhan Sapkal and PM Modi: पंतप्रधान मोदी आणि सावरकरांचा AI फोटो, काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळांची बोचरी टीका, फोटो व्हायरल
शाब्बास…तुम्ही परंपरा जपली! काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळांची पंतप्रधान मोदींवर बोचरी टीका
Mumbai Feriwala attack on BMC workers: मुंबईत फेरीवाल्यांचा BMC अधिकाऱ्यांवर हल्ला, पळवून पळवून मारलं, कांदिवलीत धडकी भरवणारं दृश्य
मुंबईत फेरीवाल्यांचा BMC अधिकाऱ्यांवर हल्ला, पळवून पळवून मारलं, कांदिवलीत धडकी भरवणारं दृश्य
Embed widget