एक्स्प्लोर

Independence Day 2022 : ब्रिटिश राजवटीला सुरंग लावणारे स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारक

Freedom fighters across India : स्वातंत्र्य लढ्यात अनेकांनी आपलं योगदान दिले. त्या सर्वांच्या योगदानामुळेच भारताला स्वातंत्र मिळाले.

Freedom fighters across India : 75 वर्षापूर्वी म्हणजेच 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत ब्रिटिश राजवटीपासून मुक्त झाला. 75 स्वातंत्र्यादिनाचं औचित्य साधत भारत (India) यंदा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. केंद्र सरकारने त्यासाठी विविध संकल्पनाही राबवल्या आहेत.  अनेक क्रांतिकारी स्वातंत्र्य सैनिकांच्या प्रयत्नांमुळे भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाले. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील त्यांचे योगदान प्रत्येक भारतीयांच्या मनात कायमस्वरुपी अमर झाले आहे. स्वातंत्र्य लढ्यात अनेकांनी आपलं योगदान दिले. त्या सर्वांच्या योगदानामुळेच भारताला स्वातंत्र मिळाले. पाहूयात स्वातंत्र्य लढ्यातील मोजक्या क्रांतिकारकांबद्दल...  

महात्मा गांधी - 
जगातील सर्वात प्रसिद्ध नेत्यांपैकी एक, मोहनदास करमचंद गांधी, ज्यांना महात्मा गांधी म्हणून ओळखले जाते.  गांधी यांना भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे प्रणेते मानले जाते. त्यांच्या अहिंसावादी मुल्याचा जग आजही सन्मान करते. भारताला गुलामगिरीच्या बंधनातून मुक्त करण्यासाठी महात्मा गांधींनी अहिंसा आणि सत्याचा मार्ग अवलंबला होता.  महात्मा गांधी यांच्या सत्याग्रह आणि दांडी यात्रा यासारख्या आंदोलनाला आजही स्मरण केले जाते. 

भगतसिंह - 
"जिंदगी लंबी नहीं बल्कि बड़ी होनी चाहिए.." हे वाक्य सिनेमातील असलं तर संपूर्ण जीवनाचा सार यातून दिसतो. ज्या कोणी हे अवलंबलं तो अमर झाला. असंच एक व्यक्तिमत्त्व होतं शहीद-ए-आज़म भगत सिंह. तरुणांच्या मनात स्वातंत्र्याची भावना जागृत करणाऱ्या शहीद-ए-आजम भगत सिंह यांचं नाव सुवर्ण अक्षरांत इतिहासाच्या पानात अमर आहे.  भगत सिंह यांचा जन्म 28 सप्टेंबर 1907 मध्ये झाला होता तर 23 मार्च 1931 रोजी भारतमातेचा हा सुपुत्र हसत हसत फासावर गेला. आपल्या जिद्द आणि साहसाच्या जोरावर इंग्रजांना हादरवून टाकणाऱ्या भगत सिंह यांच्या नसा-नसात देशभक्ती आणि क्रांती होती.

स्वातंत्र्यवीर सावरकर -
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी कायम अग्रणी राहिलेला असे जहालमतवादी क्रांतीकारक. 'ने मजसी ने परत मातृभूमीला। सागरा, प्राण तळमळला' सावरकरांच्या या काव्यपंक्तीतून त्यांचं देशाप्रति असलेलं प्रेम प्रतित होतं. दूरदृष्टी, विज्ञानवादी क्रांतीकारक ही सावरकरांच्या व्यक्तिमत्वाची दुसरी बाजू. 23 डिसेंबर 1910 रोजी सावरकरांना 25 वर्षांची पहिली आणि 30 जानेवरी 1911 रोजी त्यांना 25 वर्षाची दुसरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेली. पण, जनरेट्याच्या मागणीपुढं त्यांची अंदमानच्या काळकोठडीच्या कारागृहातून 6 जानेवारी 1924 रोजी सुटका झाली.
 
चंद्रशेखर आझाद -
चंद्रशेखर आझाद यांचा जन्म 23 जुलै 1906 रोजी मध्य प्रदेशातील झाबुआ जिल्ह्यातील भाबरा येथे झाला. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी आझाद यांनी संपूर्ण आयुष्य दिले. त्यांनी जिवंत असताना ब्रिटिश सरकारच्या पकडीखाली न येण्याचे वचन दिले होते. अखेरपर्यंत ते इंग्रजांसोबत लढत राहिले. अल्फ्रेड पार्कमध्ये इंग्रजांशी लढताना त्यांना वीरमरण आले. त्यांनी शेकडो पोलिसांसमोर 20 मिनिटे झुंज दिली. 

बाळ गंगाधर टिळक - 
“स्वराज हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो आम्ही मिळवू.” बाल गंगाधर टिळक जी यांनी प्रथमच हा नारा बोलला. बाळ गंगाधर टिळकांना “भारतीय अशांततेचे जनक” म्हटले गेले.  

सुभाषचंद्र बोस - 
भारतीयांनी नेताजी या पदवीने सन्मानित केलेले सुभाषचंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1897 रोजी कटक (ओरिसा) येथे झाला.  ज्यांनी भारताला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध आझाद हिंद फौजची स्थापना केली. 

तात्या टोपे - 
तांत्या टोपे हे 1857 च्या बंडातील प्रसिद्ध क्रांतिकारकांपैकी एक होते. 1814 मध्ये जन्मलेल्या, त्यांनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध लढण्यासाठी आपल्या सैन्याचे नेतृत्व केले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget