एक्स्प्लोर
Advertisement
कष्टाची तयारी ठेवा, रेशीम शेती हुकमी पैसा देईल!
बीडच्या शेतकऱ्यांनी निसर्गाच्या परिणामाला फाटा देत, हुकमी भाव देणारं रेशमी शेतीची कास धरली.
बीड: निसर्गाचा लहरीपणा आणि हमीभावाचा न सुटणारा तिढा यामुळे दिवसेंदिवस शेती करणे अवघड बनत चाललं आहे. पण बीडच्या शेतकऱ्यांनी निसर्गाच्या परिणामाला फाटा देत, हुकमी भाव देणारं रेशमी शेतीची कास धरली.
बीडजवळच्या नागापूरच्या ध्येयवेड्या शेतकऱ्याने सतरा वर्षापूर्वी पहिल्यांदा आपल्या शेतात तुतीची पहिली काडी रोवली. तोपर्यंत असा काही व्यवसाय असतो हे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना माहीत नव्हतं. सुरुवातीला या रेशीम कोशाच्या अळ्या बघून या शेतकऱ्याला लोक नाव ठेवायचे. मात्र आज हेच नागापूर रेशीम कोश उत्पादानात राज्यात आव्व्ल आहे.
एकट्या नागापूरमध्ये 65 एकरवर तुती ची लागवड आहे. रेशीम शेती आता इथल्या शेतकऱ्यांचा पारंपारिक व्यवसाय बनला आहे. याच रेशीम कोश उत्पादनात बीड राज्यात अव्वल आहे.
ग्रीनबेल्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मांजरा पट्ट्यातील युसूफ वडगाव. या गावातील शेतकरी ऊस आणि सोयाबीन ऐवजी रेशीमची गट शेती करू लागले आहेत.
कोष बनविण्याची प्रक्रिया 4 ते 5 दिवसात पूर्ण होते. कोषावर आलेली अळी जवळपास 1000 ते 1200 मीटर लांबीचा धाग सोडते. एका प्लास्टीक चंद्रिकेवर 400 ते 500 कोष तयार होतात. एका कोषाचे वजन साधारणतः 1.5 ते 2.5 ग्रॅम असते.
कोषामध्ये रेषीमाचं प्रमाण साधारणतः
18 ते 22 टक्के असते. एका महिन्यात 250 ते 300 किलोपर्यंत कोष मिळतात. याला रामनगरच्या बाजारात 300 ते 550 रुपये किलोचा दर मिळातो. साधारणपणे एक उत्पादन घ्यायला अडीच महिन्याचा कालावधी लागतो. एकरी वीस हजाराचा खर्च वजा जाता अडीच लाखांचं उत्पन्न यातून मिळतं.
महाराष्ट्रात रेशीम कोषाची स्थिर भाव देणारी बाजारपेठ उपलब्ध नाही. मात्र बेंगलोर जवळच्या रामनगर मार्केटमध्ये रेशीम कोषाचा सगळ्यात मोठा बाजार भरतो. याच मार्केटमध्ये हे शेतकरी कोष विक्रीसाठी नेतात.
आज घडीला बीड जिल्ह्यात एक हजारापेक्षा जास्त एकरावर तुतीची लागवड आहे. पारंपारिक पिकांना फाटा देत नगदी पिक म्हणून शेतकरी रेशीम शेतीला पसंती देत आहेत.
रेशीम कोष निर्मिती प्रक्रिया
रेशीम अळीचे अंडीपुंजातून बाहेर आल्यानंतर, पाच अवस्थेपासून संक्रमण करुन साधारणत: 26 ते 27 दिवसानंतर पाला खाण्याचे प्रमाण कमी करते आणि तोंडावाटे सिल्क धागा सोडण्यास सुरुवात करते. या अळया कोष निर्मितीकरिता प्लास्टीकच्या चंद्रिकेवर सोडण्यात येतात. रेषीम अळी स्वतःभोवती धागा गुंडाळते आणि कोष बनविण्याची प्रक्रिया 4 ते 5 दिवसात पूर्ण होते. कोषावर आलेली अळी जवळपास 1000 ते 1200 मीटर लांबीचा धाग सोडते. एका प्लास्टीक चंद्रिकेवर 400 ते 500 कोष तयार होऊ शकतात. एका कोषाचे वजन साधारणतः 1.5 ते 2.5 ग्रॅम असते.
तुमच्याकडे पाणी आहे?
साधारणपणे एक एकर तुतीची लागवड केल्यानंतर 60 बाय 20 च्या एका शेड मध्ये 250 ते 300 अंडपुंज ठेवली जातात. एका महिन्यात 250 ते 300 किलोपर्यंत कोष मिळतात. याला रामनगरच्या बाजारात 300 ते 550 रुपये किलोला भाव मिळातो. साधारणपणे एक उत्पादन घ्यायला अडीच महिन्याचा कालावधी लागतो. सिझनेबल पाणी असणाऱ्यांना किमान तीन बॅच घेता येतात. एकरी वीस हजाराचा खर्च वजा जाता अडीच लाखाचे उत्पान्न यातून मिळते.
राज्यात बीड अव्वल
राज्यात रेशीम उत्पादनात बीड जिल्ह्याचा प्रथम क्रमांक आहे. रेशीम उद्योग हा जोडधंदा शाश्वत उत्पन्न देणारा आहे. राज्यात तब्बल 10,586 एकरावर तुतीची लागवड केली जाते. यातील केवळ बीड जिल्ह्याचा वाटा 1,155 एकराचा आहे.
संपूर्ण राज्यात 7 लाख 63 हजार 694 किलो रेशीम कोषाचं उत्पादन होतं. त्यात फक्त बीड जिल्ह्यात 2 लाख 57 हजार 450 किलो रेशीम कोष तयार होतात.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्राईम
राजकारण
व्यापार-उद्योग
Advertisement