The Gray Man Review : बिग स्टार कास्ट असणारा बोरिंग सिनेमा
The Gray Man Review : 'द ग्रे मॅन' म्हणजे बिग स्टार कास्ट असणारा बोरिंग सिनेमा
रुसो ब्रदर्स
क्रिस इवांस, रयान गोसलिंग, ॲना डे अर्मास, धनुष
The Gray Man Review : रुसो ब्रदर्स (Russo brothers) हे नाव हॉलिवूडच्या धमाकेदार MCU सीरिज म्हणजेच Marval Studio's च्या कॅप्टन अमेरिका, Avengers या सीरिजची दिग्दर्शक जोडी म्हणून जगभर प्रसिद्ध आहे, त्यांचे सिनेमे जसे खर्चिक, भव्य दिव्य Sci-fi असतात अगदी तसाच 'द ग्रे मॅन' चित्रपट देखील आहे, अशी चर्चा सुरु होती. नेटफ्लिक्स चा सर्वात महागडा चित्रपट म्हणून ग्रे मॅन कडे पाहिलं गेलं. भारतात या मुख्य चित्रपटाचं ग्रे मॅन चं पहिलं मुख्य आकर्षण हे रुसो ब्रदर्स, दुसरं आकर्षण तमाम चाहत्यांच्या गळ्यातला ताईत कॅप्टन क्रिस, आणि तिसरं मुख्य आकर्षण आपला 'मारी' कोलावरी डी फेम धनुष हेच होतं, ट्रेलर्स, टिझर्स सिनेमाचे पोस्टर्स काहीतरी भन्नाट रसायन असणार अशी आशा देत होते आणि अखेर सिनेमा 22 जुलै 2022 ला नेटफ्लिक्स वर रिलीज झाला. भारतात धनुषच्या चाहत्यांनी या हॉलिवूडपटाला अक्षरशः डोक्यावर घेतलेलं पाहायला मिळालं. मग लुंगीमध्ये भारतातल्या प्रीमियर शोला दिसलेला धनुष हा सिनेमा रिलीज झाल्यावर ट्विटर वर ट्रेंडिंग पाहायला मिळाला. कदाचित भारतातील बॉक्सऑफिस पाहता मुद्दाम धनुषला सिनेमात घेतलं असावं अशा चर्चा देखील ऐकाला मिळत होती. मात्र, खरंच असं असेल तर यापूढे देखील येणाऱ्या हॉलिवूडपटामध्ये मोठमोठ्या स्टार्स सोबत आपले अभिनेते दिसायला लागले तर वावगं वाटायला नको.
स्पॉइलर अलर्ट
द ग्रे मॅन या सिनेमाच्या नावामधील 'ग्रे मॅन' म्हणजे काळ्या पांढऱ्याच्या मध्ये असलेली अदृश्य भूमिका हा या चित्रपटाचा मुख्य नायकाची भूमिका रायन गोसलिंगने साकारली आहे. आपल्या वडिलांच्या खुनाचा आरोपी म्हणून एका कारागृहात कैद असतो, मात्र त्याचा चांगुलपणा पाहून CIA संस्था त्याला एक नवं आयुष्य जगण्याची संधी देते आणि त्यातच त्याचं बारसं होतं आणि 'सियरा 6' असं त्याचं नाव ठरतं, Underground राहून त्यावर एक मिशन सोपवलं जातं ते पूर्णत्वास घेऊन जाताना सिनेमाचं कथानक गती घेऊ लागतं, अवघड असणारं हे मिशन पूर्ण करण्यासाठी 'सियरा 6' ची निवड करण्यात आली असते. इथपर्यंत लक्षात आलं असेलच की हा सिनेमा टॉम क्रूझच्या मिशन इम्पॉसिबल किंवा रॉ एजंट, MIB सारख्या पट्टीतला असेल आणि जवळपास पुढील संपूर्ण कथाच तुमच्या लक्षात येते, तुम्ही सहज सांगू शकाल की पुढं काय होणार आहे, एक टिपिकल स्टोरी असल्याचं पाहायला मिळते.
CIA संस्थेचे काही प्रमुख एकत्रित देशाची सुरक्षेसाठी प्रयत्नशील असतात मात्र काही गद्दार लोकांविरुद्ध चा महत्वाचा पुरावा CIA साठी एका मिशन वर असताना सियरा 6 च्या हाती लागतो जो सगळ्यांची पोलखोल आणि पितळ उघडं पडणारा ठरू शकतो आणि इथेच रायन म्हणजेच 'सियरा 6' सुदधा त्या महत्वाच्या पुराव्याचं गुपित उकलण्यासाठी त्याचं वेगळं मिशन सुरू करतो, यावर पुन्हा CIA ही सियरा च्या मागावर लागते आणि सियरा ला तोड देण्यासाठी नियुक्ती करते आणि एन्ट्री होते मुख्य व्हिलन मिशिवाला कॅप्टन क्रिस म्हणजेच 'लॉयड हैसन'ची.
जो CIA चाच आधीचा बदनाम एजंट असतो जो वास्तविक खलनायक नाही तर सायकोपॅथिक व्हिलनच आहे, लॉयड तो पुरावा मिळवण्यासाठी सियरा 6 च्या पाठी त्याचं सैन्य, टोळ्या पाठवतो आणि शेवटी कोणीही हे काम फत्ते करू शकत नसल्याचं पाहून तो त्याचा तामिळ मित्र धनुषला हे काम करण्यास सांगतो. त्यानंतर धनुष आणि रायनची फाईट होते.
हॉस्पिटलमध्ये काही मिनिटांचा अॅक्शन सिनमध्ये धनुष तो पुरावा रायन ला हरवून मिळवतो देखील मात्र लॉयड हा शब्द पाळत नसल्याने तो पुरावा पुन्हा रायनकडे सोपवतो आणि निघून जातो, एवढाच काय ते धनुषचं दर्शन होतं, सगळ्या अॅक्शन मध्ये एक महत्वाची एजंट मिरांडा म्हणजेच Ana De Armas ही सियरा 6 ला साथ देताना जबरदस्त स्टंटस करताना पाहायला मिळते. तर टॉम अँड जेरी चा खेळ असाच सुरू असतो खरंतर सिनेमाची सुरुवात एक वेगळ्या विचारधारेला घेऊन पुढे जात असते पण अचानक ते सगळं भलतीकडेच जात राहतं आणि दोन तासाच्या या गोष्टीमधला अॅक्शन पार्ट काढून टाकला तर काहीच उरत नाही, आणि याचमुळे 'द ग्रे मॅन' आणि रुसो ब्रदर्स यांचा हा बार फुसका ठरला, एकंदरीतच ग्रे मॅनचं मिशन लॉयड सोबतचं जुनं वैर आणि CIA ने घालून ठेवलेला गोंधळ हा सिनेमा पाहून तुमच्या लक्षात येईलच.
थोडक्यात
एकंदरीतच बहुचर्चित la la land चा Best Actor असलेला Ryan Gosling फारसा भावाला नाही पण त्याने कथेच्या मुख्य नायकाला उत्तम न्याय दिलाय असं म्हणता येईल, मात्र खलनायक रायन पुढं जास्तच तगडा दिसला. संपूर्ण चित्रपटात साहसी दृश्य, वेगवेगळी भन्नाट लोकेशन्स, क्लासिक अॅक्शन सिन्स, दोन तगड्या स्टार्सची लढाई, गाड्या, ट्राम ट्रेन सगळं दर्जा आहे, दोन्ही स्टार्समध्ये खरी अॅक्शन स्टार Ana De Armas ठरली...असं म्हणू शकतो कारण सियरा 6 हा मिरांडा शिवाय नैय्या पार करू शकला नसता. सोबतच MCU चा तगडा कॅप्टन Chris Evans हा प्रचंड लक्षात राहील कारण त्याच्या मिशिवाल्या अंदाजाने मात्र मनात असलेली कॅप्टनची छाप मिटवून टाकतं.
धनुष चं पात्र निरर्थक आणि 'कबाब मे हड्डी' ठरलं त्यात रायन जो क्रिस सारख्या तगड्या व्यक्तीला टक्कर देतो यांच्या मध्ये उगाचच धनुषला ताकदवान दाखवलं गेलंय हे जरा खटकतं. कथानकात धनुषची गरज होती का? हाच प्रश्न घेऊन शेवटी चर्चेला उरतो. कदाचित रुसो ब्रदर्सच्या या चित्रपटाचा दुसरा पार्ट आलाच तर त्यात महत्वाची भूमिका घेऊन धनुष साकारेल का? हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल..