Ulajh Review: ताकदीचे कलाकार, कमकुवत पटकथा; चित्रपट खिळवून ठेवण्यास अपयशी
Ulajh Review: चित्रपटाची कथा खिळवून ठेवत नसल्याने हा चित्रपट नावाला जागत नाही, असे वाटू शकते.
Sudhanshu Saria
जान्हवी कपूर, गुलशन देवैया, रोशन मॅथ्यू, राजेश तैलंग, आदिल हुसैन, जितेंद्र जोशी
Ulajh Review: चित्रपटाचे नाव उलझ आहे पण तो खिळवून ठेवत नाही. चित्रपटाची कथा सरळ आहे. चित्रपटाची कथा खिळवून ठेवत नसल्याने हा चित्रपट नावाला जागत नाही, असे प्रेक्षकांना वाटते.
चित्रपटाची कथा काय?
जान्हवी कपूर म्हणजेच सुहाना भाटियाला भारतीय मुत्सद्देगिरीत मोठे पोस्ट मिळाली आहे. कुटुंबात अनेक मोठे डिप्लोमेसी आहे. त्यामुळे घराणेशाहीचा आरोप होऊ लागतो. बरं यानंतर त्यांचा MMS तयार होतो आणि मग पाकिस्तानच्या एजंटकडून ब्लॅकमेल करण्याचा खेळ सुरू होतो आणि मग देशाला वाचवण्याची हीच कहाणी आपण अनेकदा ऐकली आहे, पाहिली आहे.
कसा आहे चित्रपट?
हा चित्रपट नेमका कसा आहे, हे मला समजण्यास वेळ लागला. हा चित्रपट एक एमएमएस लीक आहे, एका स्पाय थ्रिलर आहे की आणखी काय आहे? हेच कळत नाही. चित्रपटाची सुरुवात संथ आहे, त्यानंतर एक एमएमएसचा ट्वीस्ट येतो. त्यानंतर चित्रपट कधी रंजक होणार? याची प्रतीक्षा तुम्ही करता. चित्रपट कंटाळवाणा होतो, जो तुम्हाला सहन होत नाही. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मैत्री-शत्रुत्वचा प्लॉट दिसतो. अशा प्रकारचा अत्याचार कधीपर्यंत सहन करायचा असा प्रश्न मनात निर्माण होतो. चित्रपटाचा शेवट काय होणार, याचा अंदाज तुम्ही सहजपणे बांधू शकता. जान्हवीसाठी चित्रपटाची निर्मिती केलीय तर ती अखेर जिंकते.
अभिनय कसा आहे?
जान्हवीने चांगला प्रयत्न केला आहे. मात्र, तिची व्यक्तीरेखा फारशी चांगल्याप्रकारे लिहिली गेली नाही. डिप्लोमेट्स आहेत, तर काहीही कसे करू शकता? या चित्रपटात जान्हवीने विविध शेड्सच्या भूमिका चांगल्या प्रकारने वठवल्या आहेत. तिने असाच प्रयत्न कायम ठेवल्यास ती कमालीची ताकदीची अभिनेत्री होईल. अभिनेता गुलशन देवैया या चित्रपटाचा प्राण आहे. त्याने वठवलेली भूमिका कमालीची चांगली झाली आहे. या चित्रपटानंतर गुलशवकडे खलनायकी भूमिकेच्या ऑफर्स येण्याची शक्यताही अधिक आहे. सिनेइंडस्ट्रीला देखील खलनायकी भूमिका चांगल्या प्रकारे वठवणारा अभिनेता मिळाला आहे. आदिल हुसैन तर कमालीचा अभिनेता आहे. राजेश तैलंगने कमालीचा अभिनय केला आहे. त्यांच्या भूमिकेतील शेड्स बदलता, त्यातून राजेश तैलंग हे किती ताकदीचे अभिनेते आहेत, हे दिसून येते.
चित्रपटाचे दिग्दर्शन कसे आहे?
सुधांशू सरिया यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. त्यांनी इतक्या चांगल्या कलाकारांचा वापर योग्य प्रकारे केला नसल्याचे दिसून येते. त्यांनीच परवेज शेख यांच्यासोबत चित्रपटाचे लेखन केले आहे. सध्याचा प्रेक्षक हुशार आहे, त्याला कळतंय की चित्रपट कसा आहे. एकूणच हा चित्रपट हा सरासरी आहे. तुमच्याकडे मोकळा वेळ असेल तर नक्की पाहा.