The Trial Review: काजोलची जबरदस्त भूमिका असलेली 'द ट्रायल' वेब सीरिज कशी आहे? वाचा रिव्ह्यू
द ट्रायल (The Trial) वेब सीरिज कशी आहे? याबाबात जाणून घेऊयात...
सुपर्ण वर्मा
काजोल, कुबरा सैत, अली खान, आमिर अली, गौरव पांडे
The Trial Review: गेल्या काही दिवसांपासून अनेक बॉलिवूड स्टार हे ओटीटीच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. काजोलची 'द ट्रायल' (The Trial) ही वेब सीरिज डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाली आहे. पराग देसाई, दीपक धर, राजेश चढ्ढा यांच्यासह काजोलचा पती अजय देवगणने या वेब सीरिजची निर्मिती केली आहे. कशी आहे द ट्रायल वेब सीरिज? याबाबात जाणून घेऊयात...
द ट्रायल वेब सीरिजची कथा
ही कथा नयोनिका सेनगुप्ताची आहे. नयोनिका ही भूमिका काजोलनं साकारली आहे.नयोनिका ही वकील असते पण घर सांभाळण्यासाठी ती काम सोडते.पण नयोनिकाच्या आयुष्यात मोठी संकट येतं, जेव्हा तिच्या पतीवर लोकांचा गैरफायदा घेतल्याचा आरोप करण्यात येतो. त्यानंतर नयोनिका एका लॉ फर्ममध्ये काम करायला सुरुवात करते. त्यानंतर नयोनिकाकडे अनेक केस येतात. पुढे नयोनिकाच्या आयुष्यात काय घडते? हे तुम्ही या सीरिजमध्ये पाहू शकता. द ट्रायल या वेब सीरिजची कथा रॉबर्ट किंग आणि मिशेल किंग यांच्या "द गुड वाईफ" या प्रसिद्ध अमेरिकन शो वरून प्रेरित आहे.
कशी आहे सीरिज?
कोर्ट रुम ड्रामा या विषयावर आधीच बऱ्याच वेब सीरिज आणि चित्रपट आहेत, परंतु तरीही या वेब सीरिजचा प्रत्येक एपिसोड हा प्रेक्षकांच्या नजरा खिळवणारा आहे. या सीरिजमधील न्यायाधीश आणि वकिलांचे संभाषण चांगल्या पद्धतीनं दाखवण्यात आलं आहे.काही सीन्स तर पचनी पडत नाहीत. अजून चांगले होऊ शकले असते असे दिसते पण असे सीन्स फार कमी आहेत.
काजोलने अप्रतिम काम केले आहे. वकील, आई, पत्नी या जबाबदाऱ्या पार पडणारी नयोनिका तुमचे लक्ष वेधते. काजोलसोबत जिशू सेनगुप्ता, कुब्रा सैत, अली खान,आमिर अली आणि गौरव पांडे यांनीही चांगले काम केले आहे.
सुपर्ण वर्माचे दिग्दर्शन चांगले आहे. फॅमिली मॅन आणि राणा नायडू यांसारख्या सीरिज त्यांनी केल्या आहेत. त्यांची ही सीरिज देखील चांगली आहे. पटकथा लेखन थोडं चांगलं असतं तर ही वेब सीरिज अधिक चांगली झाली असती.
अजय देवगण आणि पराग देसाई या जोडीने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.द ट्रायल सीरिजच्या माध्यमातून पराग पहिल्यांदाच PR मधून निर्माती क्षेत्रात आला आहे. पराग पुढे चांगला कंटेन्ट प्रेक्षकांच्या भेटीस आणेल, अशी आशा आहे.