The Archies : सुहाना, खुशी आणि अगस्त्य; नेपोकिड्सचा फुगा फुटला!
The Archies : सुहाना(Suhana khan), खुशी (khushi kapoor) आणि अगस्त्य (Agastya nanda) या तिन्ही नेपोकिड्सच्या डेब्यूसाठी दिग्दर्शक जोया अख्तरने गुंफलेला 'द आर्चीज' (The Archies) सिनेमा!
जोया अख्तर
अगस्त्य नंदा, सुहाना खान, खुशी कपूर,वेदांग रैना, मिहिर आहूजा, डॉट, युवराज मेंडा
The Archies सिनेमा पाहण्यास कारण की, शाहरुख खानची लेक, दिवंगत श्रीदेवी यांची दुसरी लेक आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे बिग बी अमिताभ बच्चन यांचा नातू. सुहाना(Suhana khan), खुशी (khushi kapoor) आणि अगस्त्य (Agastya nanda) या तिन्ही नेपो किड्सच्या डेब्यू साठी दिग्दर्शक जोया अख्तर ने गुंफलेला 'द आर्चीज' (The Archies) सिनेमा!
सिनेमा Archie Comic च्या कॅरॅक्टर्स वरती आधारित आहे, मात्र हे कॉमिक बुक आपल्यापैकी कोणी वाचलं असल्याची शक्यता फार कमी आहे, मात्र तुम्ही Richie Rich, Scooby-Doo च्या वेगवेगळ्या कार्टून् कॅरेक्टर्सच्या प्रेमात असाल तर कुठेतरी शांतपणे अडीच तास बसून दहा-दहा मिनिटांला येणारी गाणी अर्थात म्युजिकल ड्रामा पाहायला आवडेल. स्वाभाविकच द आर्चीजचं प्रमोशन दणक्यात झालंय त्यामुळे घराघरात असा सिनेमा नेटफ्लिक्सवरती आलाय हे सगळ्यांना समजलं तर आहेच!
सिनेमा Anglo indian community च्या जगण्यावर भाष्य करतो, देशप्रेमात बुडणाऱ्या प्रत्येकाला हेवा वाटावा अश्याच आशयामध्ये सिनेमाचा सगळा प्लॉट 'रिवरडेल' (Riverdale) हिल स्टेशनच्या अवती-भवती गुंडाळला गेलेला आहे, सिनेमाच्या कथेवर बोलण्यापेक्षा या रिव्ह्यूमध्ये महत्वाचं असेल ते स्टार नेपो किड्सचा अभिनय, त्यांच्या डेब्यूबद्दल आखलेली रणनीती यावरचं जास्त लिहण्यासारखं आणि बोलण्यासारखं आहे.
1960चं दशक उभं करताना फक्त कॅरेक्टर्स आणि त्यांचे आउटफिट्सचं महत्वाचे नाहीयेत तर पडद्यावरच्या चारही कोपऱ्या पर्यंत 1960 च्या काळचा माहोल, म्युजिकल कोरिओग्राफी सारं काही उभं करणं हे प्रचंड खर्चिक काम आहे, आणि नेपोकिड्स नसते तर हे सर्व खरंच उभं करायचं धाडस कोणी केलं असतं किंवा असा सिनेमा येऊन गेलाय हे तुम्हा आम्हाला समजलं देखील नसतं.
अभिनयाच्या बाबतीत बोलायचं झालं तर, सुहाना खान, खुशी कपूर आणि अगस्त्य नंदा या नेपोकिड्सचं जसं राहणं, वागणं, बोलणं आहे.अगदी तेच हेरून त्यांना साजेसं कास्टिंग झालं असल्याचा अंदाज सहज बांधता येतो. खरंतर सिनेमा सरसकट सगळ्यांच्यासाठी नसतो, प्रत्येक सिनेमाला एक ठराविक टार्गेट ऑडिअन्स असतो. 'द आर्चीज' (The Archies) देखील काही अपवाद नाहीये, 'Gen Z' मुलांच्या सहज पसंतीला उतरणारा हा सिनेमा आहे, चार पाच मित्रांच्या मैत्रीचा, त्यांच्यातील लव्ह ट्रँगलचा आणि चळवळीचा असला तरी Archie Comic चा टच मात्र हरवल्याचं जाणवलं.
रिवरडेलच्या अँग्लो इंडियन मंडळीमध्ये इंडियन तडका कुठेच दिसला नाही. सिनेमाचा सेकंड हाफ रिवरडेलच्या प्रत्येक नागरिकांनी लावलेल्या झाडांच्या पार्कात उभारलं जाणारं प्लाझाला रिवरडेलच्या थोरा मोठ्यांनी एकत्र येऊन कसा विरोध केला, शिवाय बरेच सुंदर मेसेज दिले गेले आहेत जे संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी महत्वाचे आहेत. हे सगळं पाहताना सिनेमाची गती कुठेच सुटत नाही, संपूर्ण कथा अगदी प्लेन आहे, कलाकारांची हिंदी डायलॉगबाजी पसंतीस नाही पडलं. सिनेमा कलरफूल करण्याच्या नादात सिनेमाचा मुख्य रंग हरवला आहे. गाणी मस्त आहेत त्यांची कोरिओग्राफी सुद्धा सुंदर झालीये. तुम्हाला टाईमपास म्हणून हा सिनेमा पाहायला अजिबातच हरकत नाही.
'द आर्चीज' (The Archies)च्या बेस्ट लॉन्चिंगची जबाबदारी कपूर, खान, बच्चन कुटुंबीयांनी यशस्वी सांभाळली असली तरी सिनेमा नेटफ्लिक्सला महागात पडेल की पैसा वसूल ठरेल हे महत्वाचं नसलं तरी आगामी काळात सुहाना खान, खुशी कपूर आणि अगस्त्य नंदा यांच्या डेब्यू मधून पुढे चाहते तिघांपैकी कोणाला स्वीकारतील? कोणाचं नशीब कसं वळण घेईल हे पाहणं महत्वाचं असेल? जोया अख्तर च्या मेहनतीला दोन आणि नेपोकिड्सच्या म्युजिकलजर्नीसाठी अर्धा, असे मी देतोय अडीच स्टार!