एक्स्प्लोर

A Man Called Otto: 'अ मॅन कॉल्ड ओटो...' एका खडूस माणसाची गोष्ट

'अ मॅन कॉल्ड ओटो' ही गोष्ट एका खतरुड म्हाताऱ्याची आहे. ज्याच्या मनात प्रेम खूप असतं, पण त्याला ते व्यक्त करता येत नाही.

A Man Called Otto: अ मॅन कॉल्ड ओटो.. टॉम हॅक्सनं आपल्याला आपल्याच आयुष्याचं सार दाखवण्याचा केलेला सर्वोत्तम प्रयत्न. मरण्यासाठी हजार बहाणे शोधणारा, आत्महत्येचे चार-पाच प्रयत्न करणाऱ्याला जेव्हा जगण्यासाठी कारण मिळतं, तेव्हाच त्याचा मृत्यू होतो. ज्या खडूसपणामुळे तो एकटा पडला, त्याच खडूसपणामुळे त्याचे आत्महत्येचे प्रयत्न फसतात. खरंच, एखाद्याचा कोणता स्वभाव कसा फायदेशीर ठरेल, याचा काहीही नेम नाही. ही गोष्ट एका खतरुड म्हाताऱ्याची आहे. ज्याच्या मनात प्रेम खूप असतं, पण त्याला ते व्यक्त करता येत नाही. अत्यंत खडूस, शिस्तप्रिय, स्वच्छता प्रिय, आपल्या घरासह सोसायटीवर प्रेम करणारा हा म्हातारा निवृत्तीनंतरच्या पहिल्याच दिवशी आत्महत्येचा पहिला प्रयत्न करतो. हे पाहून मनात एकटेपणा दाटून येतो.

दोन महिन्यांपूर्वी कॅन्सरनं बायकोचा मृत्यू होतो.  बायकोच्या मृत्यूनंतर म्हातारा एकदम एकटा पडतो. त्यात त्याला निवृत्ती घ्यावी लागते.अशा स्थितीत कोणत्याही व्यक्तीला जगण्यासाठी आणि नव्यानं उभं राहण्यासाठी तसेच मोठ्या आधाराची गरज लागतेच. आपल्या देशात कसं, गावात कुणी गेलं तर अख्खं गाव त्या कुटुंबाच्या पाठिशी उभं राहतं. त्यातल्या त्यात जर असं एखादं म्हतारं माणूस असेल तर अख्खं गाव त्याची सोय करतं, त्याची देखभाल करतं. पण, ओटोची गोष्ट अमेरिकेतली आहे. तिथं असं काही होत असले का? तर तिथंही थोड्याफार प्रमाणात का होईना असं दिसून आलं पण, ओटोचा स्वभाव अत्यंत खडूस असल्यानं त्याला कुणाचीही सोबत नसते. म्हणूनच की काय, निवृत्तीच्याच दिवशी हा ओटो आत्महत्येचा निर्णय घेतो.

चित्रपटची सुरुवात एका सुपरमार्केटमध्ये होते. जिथं ओटो 5 फूट दोरीच्या किंमतीवरुन भांडत असतो. त्यावेळी त्या दोरीचा अर्थ लागत नाही. पण, जेव्हा आपल्याच घरात ओटो फाशीचा प्लॅन करतो, तेव्हा ती दोरी दिसते. ओटो फाशी घेण्यासाठी टेबलवर उभा राहतो. गळ्यात फास टाकणार इतक्यात,त्या खडूस म्हाताऱ्याला एक गोष्ट दिसते.  गळफाससोडून त्याचे लक्ष त्या गोष्टीकडे जाते आणि गोष्टीत एका कुटुंबाची एन्ट्री होते. बुडत्याला काडीचा आधार म्हणतात, तसंच या म्हाताऱ्याला एका कुटुंबाचा आधार मिळणार असतो. पण हा खडूस त्यातही अकडून राहतो आणि आत्महत्येचा पहिला प्रयत्न करतो.. आता त्याच नशीब इतकं खराब, की ज्या फूटभर दोरीवरुन तो भांडला, त्याच दोरीनं गळफास घेतो. पण, त्याच वजनानं छताला ठाकलेला खिळा तुटतो आणि तो खाली पडतो.

पण, गळफास तुटेपर्यंत ओटोचा प्लॅशबॅक आहे. त्यात त्याची प्रियेसी सोनिया त्याच्या आयुष्यात कशी आली हे दिसतं. ती त्याची आत्माच कशी बनली, हेही डोळ्यासमोरुन जातं. त्यामुळेच की काय, सोनियाच्या मृत्यूनंतर ओटो आत्मा नसलेल्या देहाप्रमाणेच रोबोटिक आयुष्य जगत असतो आणि नोकरी गेल्यानंतर हा रोबोट बंद पडणार याच भीतीनं ओटो जगाशी संपर्क तोडण्याचा निर्णय घेतो. त्यावेळी त्याची आत्महत्या सार्थ वाटते. आपणंही त्याच्या निर्णयात सहभागी होतो, आपल्यालाही त्यानं मरावं असंच वाटतं. पण, सुर्यास्तानंतर होणाऱ्या सूर्योदयाप्रमाणेच त्याच्याही आयुष्याच अनपेक्षित सूर्योदय होतो.

पण, ओटोच्या आयुष्यात एकटेपण्याच्या यातना इतक्या वाढल्या होत्या की त्याला त्यापुढे मरणयातानाही कमीच वाटत होत्या. त्यामुळेच आपला ओटो आयुष्य संपवण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न करतो. फाशीनंतर रेल्वेसमोर उडी मारुन मरण्याचा प्लॅन करतो. ज्या रेल्वे स्टेशनच्या फलाटावर त्याला पहिलं प्रेम होतं, त्याच फलाटावरुन त्यांनं रेल्वेसमोर उडी मारण्याचा निर्णय घेतला. तिथं पोहोचला.. पण, त्यानं उडी मारण्याआधीच त्याच्यापेक्षा वयस्कर म्हाताऱ्यानं उडी घेतली. आणि स्थानकांवर गोधळं सुरु झाला. प्रत्येकानं मोबाईलवर त्या म्हाताऱ्याचं शुटिंग सुरु केलं. भावना शून्य गर्दीत आत्महत्येसाठी आलेल्या ओटोला भावनेचा पाझर फुटतो. तोच मरण्यासाठी नाही तर जीव वाचवण्यासाठी रुळावर उडी मारतो. त्या दुसऱ्या म्हाताऱ्याला वाचवतो. अनेक जण हा सगळा प्रकार मोबाईलमध्ये शूट करतात, ओटो सोशल मीडिया स्टार बनतो. पण या म्हाताऱ्याला त्याची काहीही पडलेली नसते. कारण, त्याला फक्त आणि फक्त जगापासून दूर जायचं असते.

पाच-दहा सीनपुरतं एक मांजर चित्रपटात येतं, पण त्याच काही मिनिटांच्या सीन्समुळे ओटोचं आणखी एक चरित्र उलघडतं. हल्ली मुलींच्या प्रेमापोटी मांजरांवर प्रेम करणारे तरुण अनेक ठिकाणी भेटतील. पण, बायकोच्या आठवणींमध्ये जगणाऱ्या ओटोला मांजर आवडण्याचं कारण मात्र वेगळंच आहे. सतत त्रास देणाऱ्या एखाद्या प्राण्याचा जीव घ्यावा इतका त्रास देणाऱ्या मांजरावर ओटोचं प्रेम करु शकतो. हे फक्त इथं पाहायला मिळेल.

'अगर किसी भी चीज को पूरी शिद्दत से चाहो तो सारी कायनात तुम्हें उससे मिलाने में जुट जाती है।’ असं म्हणत शाहरुखनं आपलं प्रेम मिळवलं होतं, पण ओटोला मरणाला मिठी मारता येत नाही. चित्रपटामध्ये ओटो आत्महत्येचे आणखी दोन प्रयत्न करतो. त्यासाठी तुम्ही चित्रपट पाहा. पण, एक गोष्ट नक्की आहे..2तासांच्या चित्रपटामध्ये फक्त मरण्याचं प्लॅनिंग करणाऱ्या ओटोला शेवटच्या काही मिनिंटामध्ये जगण्याचं कारणं मिळतं, पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. ओटो जगापासून कायमचा दूर जातो, जेव्हा त्याला जगायचं असतं. त्याच कारणांमध्ये एक मांजर, एक कुटुंब आणि पिडखोर शेजारी... हे सगळे जण मागे राहतात... ओटो यांना सोडून जातो.. ओटोच्या प्रत्येक प्रत्यत्नांसोबत यातला एक जण त्याच्या आयुष्यात येतो. तो कायमचा राहतो, पण ओटोला हे नको असतं, आणि जेव्हा त्याला हे हवं असतं तेव्हा तो मरतो.

आज प्रत्येकाच्या आयुष्याच नैराश्य येण्यासाठी फार कारणं लागत नाहीत. छोट्या छोट्या कारणांनीही आपल्या भावना दुखावल्या जातात, त्या इतक्या तीव्र झाल्यात की आपल्याला त्यावर नियंत्रण मिळताच येत नाही. त्यामुळेच प्रेरणादायी व्हिडीओज आणि रील्सचा सुळसुळाट सोशल मीडियात दिसतो. पण, एका खडूस म्हाताऱ्याच्या काठीचा आधार घेत दिग्दर्शकांनं याच नकारात्मकतेवर नियंत्रण मिळवणं किती सोपं आहे, की काही गोष्टी तुमच्या डोळ्यासमोर असतात, ज्यामुळे तुमच्यातली सो कॉल्ड निगेटिव्हिटी संपवता येईल.

सध्या तरी नेटफ्किल्सवर हा चित्रपट आहे. तो नक्की पाहा.. आणि हा चित्रपटात एक सीन आहे, जो पाहून तुम्ही एकटेही असाल तरीही पोट धरुन हसाल... तो सीन कोणता तुम्ही मला सांगा!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
UPSC CSE Exam 2025 : यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
Sharad Pawar: पुण्यात दूर्मीळ GBS रोगाचे संकट;  शरद पवारांकडून राज्य सरकारला सूचना, दाहकता लक्षात घ्या
पुण्यात दूर्मीळ GBS रोगाचे संकट; शरद पवारांकडून राज्य सरकारला सूचना, दाहकता लक्षात घ्या
Saif Ali khan: सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Deshmukh : पंकजा मुंडेंनी व्हिडीओ कॉल केला, धनंजय मुंडेंनी फोनही केला नाही!Walmik Karad Judicial Custody : वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, पुढे काय?ABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 22 January 2025 सकाळी ११ च्या हेडलाईन्सPune Reverse Car Accident : पुण्यात रिव्हर्स गिअरने अनर्थ, कार पहिल्या मजल्यावरुन कोसळली

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
UPSC CSE Exam 2025 : यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
Sharad Pawar: पुण्यात दूर्मीळ GBS रोगाचे संकट;  शरद पवारांकडून राज्य सरकारला सूचना, दाहकता लक्षात घ्या
पुण्यात दूर्मीळ GBS रोगाचे संकट; शरद पवारांकडून राज्य सरकारला सूचना, दाहकता लक्षात घ्या
Saif Ali khan: सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
मोठी बातमी! खाजगी बालवाड्या सरकारच्या नियंत्रणाखाली आणण्याच्या हलचाली,  प्ले ग्रूपला लागू होणार सरकारची नियमावली
मोठी बातमी! खाजगी बालवाड्या सरकारच्या नियंत्रणाखाली आणण्याच्या हलचाली, प्ले ग्रूपला लागू होणार सरकारची नियमावली
धनंजय मुंडे मोठं मोठं बोलतायत, पण आता तरी राजीनामा द्यावा; वाल्मिकच्या CCTV फुटेजनंतर संभाजीराजे कडाडले
धनंजय मुंडे मोठं मोठं बोलतायत, पण आता तरी राजीनामा द्यावा; वाल्मिकच्या CCTV फुटेजनंतर संभाजीराजे कडाडले
पहाटेच्या सुमारास भीषण अपघात, 14 ठार; तीर्थयात्रेवर निघालेल्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू
पहाटेच्या सुमारास भीषण अपघात, 14 ठार; तीर्थयात्रेवर निघालेल्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू
Anjali Damania: धनंजय मुंडेंचं मंत्रिपद सोडा, आमदारकीच धोक्यात; अंजली दमानियांनी निर्वाणीचं अस्त्रं बाहेर काढलं
धनंजय मुंडेंचं मंत्रिपद सोडा, आमदारकीच धोक्यात; अंजली दमानियांनी निर्वाणीचं अस्त्रं बाहेर काढलं
Embed widget