LIVE UPDATE : महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन करणार, नारायण राणेंची माहिती

Background
१. विधानसभेच्या प्रचारासाठी भाजपचे राष्ट्रीय नेते महाराष्ट्रात, अमित शाहांच्या 4 तर योगी आदित्य़नाथ यांच्या 2 प्रचारसभा, मुख्य़मंत्री 6 तर उद्धव ठाकरे 4 सभांना संबोधणार
२. मुंबईतील सांताक्रूझ आणि गोरेगावमध्ये आज राज ठाकरेंची तोफ धडाडणार, ईडी, आघाडीबाबत राज ठाकरेंच्या भाषणाकडे लक्ष, मुसळधार पावसामुळे पुण्यातील कालची सभा रद्द
३. प्रचारासाठी अखेर राहुल गांधींना मुहूर्त मिळाला, 13 ऑक्टोबरला राहुल गांधींची मुंबईत सभा, तर सोनिया गांधींची राष्ट्रवादीसोबत संयुक्त रॅली, सूत्रांची माहिती
४. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीआधीच ऑक्टोबरचा पगार, केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ, लोकलमध्ये वायफायही मिळणार
५. मुंबईत मिलन सबवेजवळ रेल्वे ट्रॅकजवळील कचऱ्याला आग तर वडाळ्यात झोपडीला आग लागून 6 जण गंभीर जखमी, आगरीपाड्यातही इमारतीच्या चौथ्या मजल्यावर अग्नितांडव
६. टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आजपासून दुसरा कसोटी सामना, पुण्यातल्या गहूंजे स्टेडियमवर होणाऱ्या मॅचवर पावसाचं सावट, 3 सामन्यांच्या मालिकेत भारताची 1-0नं सरशी























