एक्स्प्लोर
छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या सोनी टीव्हीची दिलगिरी, शिवप्रेमींच्या संतापानंतर जाग
केबीसी या शोमध्ये अमिताभ बच्चन यांनी शिवरायांचा एकेरी उल्लेख केल्यानं सोशल मीडियावर संतापाची लाट उठलीये. केबीसीमध्ये एका प्रश्नासाठी 4 ऑप्शन दिले जातात, यावेळी शिवरायांच्या नावासमोर छत्रपती किंवा महाराज असा उल्लेखही करण्यात आलेला नव्हता, शिवाय अमिताभ बच्चन यांनीही तसा आदरार्थी उल्लेख केला नाही.
मुंबई : कौन बनेगा करोडपती'चा 11 वा सीजन वादात अडकला आहे. केबीसीमध्ये विचारण्यात आलेल्या एका प्रश्नामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करण्यात आला. सोशल मीडियातून केबीसी आणि सोनी टीव्हीवर पूर्णपणे बहिष्कार टाकण्याची मागणी नेटिझन्सकडून केली जात असताना अखेर आपली चूक मान्य करत सोनी टीव्हीने वादावर पडदा टाकला आहे.
केबीसी या शोमध्ये अमिताभ बच्चन यांनी शिवराजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्यानं सोशल मीडियावर संतापाची लाट उठली होती. यावर आता सोनी टीव्हीने ट्विट करत माफी मागितली आहे. बुधवारी प्रसारित झालेल्या केबीसीच्या भागात छत्रपती शिवाजी महाराजांचा संदर्भ देताना अनावधानानं त्यांच्या नावाचा उल्लेख एकेरी शब्दात झाला. अनावधानानं प्रेक्षकांच्या भावना दुखवल्याबद्दल आम्ही प्रेक्षकांची माफी मागतो असं वाहिनीनं आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. सोनी टीव्हीच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. कालच्या एपिसोडमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात अनावधानानं जी चूक झाली त्याबद्दल आम्ही प्रेक्षकांची माफी मागतो, असा माफीचा स्क्रोल येणाऱ्या एपिसोडमध्ये चालवला आहे.
केबीसी या शोमध्ये अमिताभ बच्चन यांनी शिवरायांचा एकेरी उल्लेख केल्यानं सोशल मीडियावर संतापाची लाट उठलीये. केबीसीमध्ये एका प्रश्नासाठी 4 ऑप्शन दिले जातात, यावेळी शिवरायांच्या नावासमोर छत्रपती किंवा महाराज असा उल्लेखही करण्यात आलेला नव्हता, शिवाय अमिताभ बच्चन यांनीही तसा आदरार्थी उल्लेख केला नाही. त्यामुळे सोशल मीडियावर अमिताभ बच्चनविरोधात टीकेची झोड उठली आहे. तसंच बायकॉट केबीसी, बायकॉट सोनी टीव्ही असे हॅशटॅगही ट्रेंड होत आहे. सोनी टीव्हीने जाहीर माफी मागितली असली मात्र अमिताभ बच्चन यांनी या संदर्भात मौन बाळगणे पसंत केले आहे. KBC | ‘केबीसी 11’मध्ये शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख, बिग बींवर सोशल मीडियातून टीका | ABP MajhaThere was an inaccurate reference to Chhatrapati Shivaji Maharaj during Wednesday’s KBC episode, due to inadvertence. We deeply regret the same and being mindful of the sentiments of our viewers have carried a scroll expressing regret during our episode yesterday. #KBC11 pic.twitter.com/FLtSAt9HuN
— Sony TV (@SonyTV) November 8, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement