LIVE UPDATE | उदयनराजेंचं ठरलं, 14 तारखेला मोदी आणि शाहांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश निश्चित

Background
1. बाप्पाच्या निरोपासाठी मुंबई-पुण्यासह नाशिकमध्ये जय्यत तयारी, नैसर्गिक तलावांसह कृत्रिम तलावांचीही सोय, सीसीटीव्ही यंत्रणा, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2. महाराष्ट्रात तूर्तास जुन्या आरटीओ नियमांप्रमाणेच दंड वसुली, परिवहन मंत्री दिवाकर रावतेंची माहिती, गडकरींच्या नव्या कायद्याच्या अंमलबजावणीला महाराष्ट्रातच ब्रेक
3. हर्षवर्धन पाटील यांच्या खांद्यावर भाजपचा झेंडा, मुख्यमंत्र्यांकडून इंदापूरच्या उमेदवारीचे संकेत, तर 48 नगरसेवकांसह गणेश नाईकांचाही भाजपात प्रवेश
4. ओम आणि गाय शब्द उच्चारताच विरोधकांचे कान टवकारतात, मथुरेतील कार्यक्रमात पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर निशाणा, विरोधकांनी देशाला उद्ध्वस्त केल्याची टीका
5. बुलडाण्यात पैनगंगेला पूर, येळगाव धरण ओव्हरफ्लो, तर नागपूर जिल्ह्यातलं तोतलाडोह धरण 94 टक्के भरलं
6. ऐन मोहरममध्ये पाकिस्तानमध्ये दूध पेट्रोलपेक्षा महाग, एक लिटर दुधाची किंमत तब्बल 140 रुपये
























