LIVE BLOG | राधाकृष्ण विखे पाटील शिवसेनेच्या मंचावर
LIVE
Background
1. वाराणसीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं जोरदार शक्तिप्रदर्शन, भव्य रोड शो नंतर दशाश्वमेध घाटावर गंगाआरतीत सहभागी, आज उमेदवारी अर्ज दाखल करणार
2. अक्षय कुमारने विचारलेल्या आंब्याच्या प्रश्नावरुन राज ठाकरेंचा मोदींना टोला, सत्तेसाठी सेना लाचार झाल्याचाही पुनर्रुच्चार
3. विखे-पाटलांचा विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा स्वीकारला, संगमनेरमधील राहुल गांधींच्या सभेला विखे अनुपस्थित राहणार, उद्या अंतिम निर्णय
4. प्रचाराच्या रणधुमाळीत जगण्यामरण्याचे प्रश्न दुर्लक्षित, त्र्यंबकेश्वरमधील बर्ड्याच्यावाडीत हंडाभर पाण्यासाठी महिलांचा जीवघेणा प्रवास
5. सरन्यायाधिशांविरोधातल्या षडयंत्राच्या दाव्याची चौकशी निवृत्त न्यायमूर्ती ए के पटनायक करणार, सीबीआय, आयबी, दिल्ली पोलीसांना सहकार्याचे कोर्टाचे आदेश
6. चिमुकलीवर बलात्कार-हत्या प्रकरणातील नराधमाची फाशी हायकोर्टाकडून रद्द, कायदेशीर त्रुटींचा फायदा ,ठाणे सत्र न्यायालयाला पुन्हा खटला चालवण्याचे आदेश