LIVE BLOG : जम्मू-काश्मीर : पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात एक जवान शहीद तर चार जखमी

Background
राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या बातम्यांच्या आढावा
1. ईडीच्या चौकशीला सामोरं जाणार पण बंद पुकारु नका, राज ठाकरेंचं मनसे कार्यकर्त्य़ांना आवाहन, कर नाही तर डर कशाला, सत्ताधाऱ्यांचा सवाल, विरोधक राज ठाकरेंच्या पाठीशी
2. एक हेक्टरपर्यंतच्या नुकसान झालेल्या पिकांना संपूर्ण कर्जमाफी, कर्ज घेतले नसल्यास भरपाई, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, पडझड झालेली घरं बाधून वरुन एक लाख रुपये देणार
3. दिल्लीत नाना पाटेकरांनी घेतली गृहमंत्री अमित शाहांची भेट, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तर्कवितर्कांना वेग, पूरग्रस्तांसदर्भात चर्चा केल्याचा नानांचा दावा
4. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदींमध्ये काश्मीरच्या मुद्द्यावर चर्चा, तर अमित शाह आणि अजित डोवालांमध्येही काश्मीरबाबत खलबतं
5. जम्मूच्या तावी नदीत अडकलेल्या चौघांची सुटका, दुसऱ्या प्रयत्नात वाचवण्यात यश तर राजस्थानमध्ये पाण्याच्या प्रवाहात तरुणाची स्टंटबाजी
6. पाकिस्तानमधील लग्नात गाणाऱ्या मिका सिंगला उपरती, पूरग्रस्तांना 50 घरं बांधून प्रायश्चित करणार, तर बिग आणि अंबानींकडूनही मदत























