(Source: ECI/ABP News/ABP Majha)
LIVE BLOG | जे नाणारचं झालं तेच आरेचं होईल : उद्धव ठाकरे
LIVE
Background
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
1. विधानसभेला युती होईलच, पण गाफील राहू नका, कार्यकर्त्यांच्या मेऴाव्यात उद्धव ठाकरेंचं वक्तव्य, 50-50 च्या फॉर्म्युल्यावर शिवसेना अडून
2.विकासाच्या कामांबाबत आघाडी सरकारच्या काळात उदासिनता, नाव न घेता उदयनराजेंचं पृथ्वीराज चव्हाणांवर टीकास्त्र, मेगागळतीवरून आत्मचिंतन करण्याचा पलटवार
3. भाजपची महाजनादेश यात्रा आज सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात, संध्याकाळी 6 वाजता इचलकरंजीत तर 8 वाजता कोल्हापुरात जाहीर सभा
4. पळपुट्या नेत्यांचा जनताच समाचार घेईल, भाजपमधील मेगाभरतीवर शरद पवारांचा टोला, आज पवार नाशिक दौऱ्यावर
5. जायकवाडी धरणाचे 4 दरवाजे उघ़डले, 1 हजार 57 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरु, तर पालघर, विसाई, विरारलाही पावसानं झोडपलं
6. पबजी गेममुळे कोल्हापुरातील तरुणाचं मानसिक स्वास्थ्य बिघडलं, रुग्णालयात दाखल करण्याची वेळ, तरुण पबजीच्याच भाषेत बोलत असल्याचा धक्कादायक प्रकार