LIVE BLOG | गोडसेबाबत वक्तव्याप्रकरणी साध्वी प्रज्ञासिंहचा माफीनामा

Background
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
1. एक्झिट पोलशी संबंधीत ट्वीट काढण्याचे निवडणूक आयोगाचे ट्विटरला आदेश, एक्झिट पोलशी निगडीत ट्विट हटवले जाण्याची शक्यता
2. पश्चिम बंगालमधील प्रचार आजच थांबणार, कोलकाता हिंसाचारानंतर निवडणूक आयोगाचा अभूतपूर्व निर्णय, तर ममता बॅनर्जींची जोरदार रॅली
3. लोकसभा निकालानंतर राज्यात मोठ्या फेरबदलाची शक्यता, राधाकृष्ण विखे, विजयसिंह मोहिते आणि जयदत्त क्षीरसागरांना भाजप-सेनेकडून मोठी खाती
4. आसामच्या गुवाहाटीत मॉलबाहेर स्फोट, सहा जण जखमी, ग्रेनेड स्फोट असल्याचा पोलिसांचा संशय
5. मान्सून 6 जूनला केरळमध्ये दाखल होणार, स्कायमेटनंतर भारतीय हवामान खात्याचा अंदाज, महाराष्ट्रातही पावसाचं आगमन उशिराने होणार असल्यानं बळीराजा चिंतेत
6. चंद्राचा आकार 50 मीटरनं कमी झाल्याची नासाची माहिती, टायडल फोर्समुळे चंद्र पृथ्वीपासून दूर जात असल्याचाही दावा























