LIVE BLOG | सनी देओल उद्धव ठाकरेंच्या भेटीला 'मातोश्री'वर
LIVE
Background
राज्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा संंक्षिप्त आढावा
1. भोपाळ आणि पाटण्यात ईदचा चंद्र दिसला, आज देशभरात ईद साजरी होणार, देशभरातील मशिदींवर आकर्षक विद्यूत रोषणाई
2. उरणच्या पुलावर दहशतवाद्यांशी संबंधित मजकूर आणि कोडवर्ड आढळल्यानं मोठी खळबळ, पुलाच्या खांबावर मोठी जहाजं, विमानतळ, पेट्रोल पंप उडवण्याचे निर्देश
3. विधानसभा जागावाटपाच्या फॉर्म्यूल्यावर शिवसेना नाराज, 144 जागांसाठी शिवसेना आग्रही असल्याची चर्चा, तर सर्वकाही आलबेल असल्याचा आदित्य ठाकरेंचा दावा
4. लोकसभेतील दारुण पराभवानंतर उत्तर प्रदेशात सपा-बसपाची युती तुटली, मायावतींची घोषणा, सुधारणा झाल्यास पुन्हा एकत्र येण्याचे संकेत
5.विराट कोहलीची टीम इंडिया विश्वचषकाच्या पहिल्या आव्हानासाठी सज्ज; आज सलामीच्या सामन्यात भारताचा मुकाबला दक्षिण आफ्रिकेशी
6. डेल स्टेनची खांद्याच्या दुखापतीमुळे विश्वचषकातून माघार; स्टेनचा खांदा उपचारांना साथ देईना, दक्षिण आफ्रिकी शिलेदाराची कारकिर्दही धोक्यात