LIVE BLOG | रमजानदरम्यान पहाटे पाच वाजता मतदानाची मागणी निवडणूक आयोगाने फेटाळली

Background
1. राज ठाकरेंच्या सभांचा खर्च मागण्याचा निवडणूक आयोगाला अधिकार नाही, पु. ल. देशपांडेंच्या सभांचा दाखला देत शरद पवारांचा निवडणूक आयोगाला सवाल
2. पाचव्या टप्प्यातल्या मतदानासाठी अमेठी, रायबरेलीतला प्रचार थंडावला, उद्या मतदान, राहुल गांधी, सोनिया गांधी आणि स्मृती इराणींची परीक्षा
3. रोड शो दरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांवर हल्ला, जीपवर चढून केजरीवालांना तरुणाकडून चापट, आप कार्यकर्त्यांनी हल्लेखोराला चोपलं
4. राज ठाकरेंविरोधात आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या इसमाला मनसे कार्यकर्त्यांची मारहाण, अंबरनाथमधला प्रकार, उठाबशा काढतानाचा व्हीडिओ मनसेकडून व्हायरल
5. आजपासून तीन दिवस विदर्भात उष्णतेच्या लाटेचा अंदाज, नागपूरचा पारा 44 अंशांवर, हवामान विभागाचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा
6. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा सनरायझर्स हैदराबादवर चार विकेट्सनी विजय, केन विल्यम्सनची अर्धशतकी झुंज अपयशी























