LIVE BLOG | सातारा : बिग बॉस स्पर्धक अभिजीत बिचुकलेच्या जामिनावर 27 जूनला सुनावणी
LIVE
Background
1. येत्या तीन दिवसात कोकणात मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज, मुंबईतही मान्सून आजच दाखल होण्याची शक्यता
2. मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान मुंबई महापालिकेच्या डिफॉल्टर यादीत, इतर अनेक मंत्र्यांचीही 8 कोटींची थकबाकी, माहिती अधिकार कार्यकर्त्याचा दावा
3. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सायंकाळी भाजप-शिवसेनेची संयुक्त बैठक, आमदारांमध्ये समन्वय निर्माण करण्याचा प्रयत्न, उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांचीही उपस्थिती
4. काळ्या पैशांबाबत संसदेच्या दोन्ही सभागृहात महत्वपूर्ण अहवाल सादर होणार, अहवालात देशविदेशातल्या काळ्या पैशाबाबत विस्तृत माहिती
5. ताडोबाच्या जंगलात बछड्यांना शिकार शिकवणारी माया वाघीण पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद, रानगवा थोडक्यात बचावला
6. पाकिस्तानचा दक्षिण आफ्रिकेवर 49 धावांनी विजय, आफ्रिकेचं विश्वचषकातलं आव्हान संपुष्टात, आज अफगाणिस्तान आणि बांगलादेशमध्ये लढत