मुख्यमंत्री बीड नगरपालिकेच्या भुयारी गटार योजना, शहरातील अंतर्गत रस्ते, पालिकेच्या सभागृहाचे नामकरण, निवाराग्रहाचे लोकार्पण, प्रधानमंत्री घरकुल योजनेचे भूमिपूजन अशा जवळपास साडेतीनशे कोटींच्या कामांचं लोकार्पण करणार आहेत. या कार्यक्रमाचं जिल्ह्यातल्या राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्याला निमंत्रण देण्यात आलं नाही.
2/6
'दुष्मन का दुष्मन अपना दोस्त' या म्हणीप्रमाणेच विनायक मेटेंशी कायम दुरावा ठेवणाऱ्या बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे मात्र जयदत्त क्षीरसागरांसोबत कायम हितगुज करताना पाहायला मिळाल्या. म्हणूनच जयदत्त क्षीरसागरांना राजकीय सहकार्य करण्याची भूमिका मांडणाऱ्या पंकजा मुंडेंनी एका दगडात दोन पक्षी मारले आहेत.
3/6
या कार्यक्रमासाठी स्वतः मुख्यमंत्री आज बीडमध्ये येत आहेत, तर पंकजा मुंडे यांची या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती असणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे बीड जिल्ह्यातल्या भाजपच्या सगळ्या आमदारांना याचं विशेष निमंत्रण देण्यात आलं असून जिल्ह्यातील भाजपच्या सगळ्या आमदारांचे फोटो शहरांमध्ये लावलेल्या बॅनरवर स्पष्टपणे झळकत आहेत.
4/6
बीडमध्ये आज होत असलेला हा कार्यक्रम तसा राष्ट्रवादीचा म्हणजेच राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर, बीड नगरपालिकेचे नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर यांचा. मात्र या कार्यक्रमात एकाही राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्याला स्थान देण्यात आलेलं नाही.
5/6
विशेष म्हणजे या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका किंवा बॅनरवर कुठेही धनंजय मुंडेंचे फोटो किंवा नाव पाहायला मिळत नाही. म्हणूनच क्षीरसागरांनी धनंजय मुंडेंना खुलं आव्हान दिल्याची चर्चा बीडमध्ये रंगत आहे
6/6
राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ उपनेते जयदत्त क्षीरसागर यांनी थेट राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांना खुलं आव्हान दिलं आहे. बीडमध्ये होणाऱ्या जाहीर कार्यक्रमात क्षीरसागर बंधूंच्या व्यासपीठावर प्रमुख पाहुणे मुख्यमंत्री आहेत, तर पंकजा मुंडे यांची विशेष उपस्थिती असणार आहे. म्हणजेच कार्यक्रम राष्ट्रवादीचा, तर उपस्थिती भाजप नेत्यांची.