LIVE BLOG | आज दिवसभरात... 14 फेब्रुवारी 2019

Background
1. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर मुंबईत राजकीय बैठकांचं सत्र, शरद पवारांकडून राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठकीचं आयोजन तर मातोश्रीवर उद्धव ठाकरेंचं शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांना बोलावणं
2. राज ठाकरे-अजित पवारांमध्ये गुप्त बैठक, मनसेला महाआघाडीत घेण्याबाबत राष्ट्रवादी सकारात्मक, मात्र निर्णयाचा चेंडू काँग्रेसच्या कोर्टात
3. नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान व्हावेत, लोकसभेत मुलायम सिंह यादवांच्या वक्तव्यामुळे महागठबंधनमधील पक्षांना घाम फुटला, मोदींकडूनही मुलायम यांचे आभार
4. 16 व्या लोकसभेच्या शेवटच्या भाषणात मोदींकडून विरोधकांचा समाचार, राहुल गांधींच्या भूकंपाच्या वक्तव्याची खिल्ली, तर गळाभेट आणि डोळ्यांच्या इशाऱ्यांना टोला
5. मुंबईसह पुणे, नाशिक आणि औरंगाबादेत म्हाडाची लवकरच लॉटरी, पुण्यात 4 हजार तर नाशिकमध्ये 1 हजार घरं
6. 'चला हवा येऊ द्या'मध्ये अलिबागची अवहेलना झाल्याच्या गैरसमजातून अलिबागकरांचा संताप, मात्र आलेपाक शब्द वापरल्याच्या स्पष्टीकरणानंतर वाद निवळला























