हार्मोनल संतुलनासाठी योग ठरतो वरदान! उज्जाई प्राणायाम कसं बदलू शकतं तुमचं आरोग्य?
Thyroid Health Tips:हार्मोनल संतुलन राखण्यासाठी काही विशिष्ट योगासन आणि प्राणायाम अत्यंत प्रभावी मानले जातात.

Thyroid Health Tips:आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीमुळे थायरॉईड ही समस्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. विशेषतः पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये थायरॉईडचे प्रमाण अधिक आढळते. थायरॉईड ग्रंथी शरीरातील मेटाबॉलिझम, ऊर्जा पातळी आणि वजन नियंत्रणासाठी महत्त्वाची भूमिका बजावते. मात्र, या ग्रंथीचे कार्य बिघडल्यास वजन वाढणे, सतत थकवा जाणवणे, तणाव आणि मानसिक अस्वस्थता अशा अनेक समस्या उद्भवतात.
पतंजली आयुर्वेदच्या मते, योग्य योगसाधना आणि नैसर्गिक उपचारांच्या मदतीने थायरॉईडसारख्या समस्यांवर नियंत्रण मिळवता येऊ शकते. हार्मोनल संतुलन राखण्यासाठी काही विशिष्ट योगासन आणि प्राणायाम अत्यंत प्रभावी मानले जातात.
उज्जाई प्राणायाम
उज्जाई प्राणायाम हा थायरॉईडसाठी अत्यंत उपयुक्त मानला जातो. या प्राणायामात घसा किंचित आकुंचित करून श्वास घेतला जातो. यामुळे थायरॉईड ग्रंथीवर थेट परिणाम होतो आणि तिची कार्यक्षमता सुधारण्यास मदत मिळते.
सर्वांगासन आणि हलासन
हे दोन्ही आसन गळ्याच्या भागातील रक्ताभिसरण वाढवतात. यामुळे थायरॉईड ग्रंथी सक्रिय होते आणि हार्मोन स्रावात संतुलन निर्माण होण्यास मदत होते.
सिंहासन
सिंहासन केल्याने गळ्याच्या स्नायूंना बळकटी मिळते तसेच तणाव कमी होतो. हे आसन थायरॉईडसाठी विशेष फायदेशीर मानले जाते.
मत्स्यासन
मत्स्यासनामुळे मानेच्या भागात योग्य ताण निर्माण होतो. यामुळे थायरॉईड हार्मोनच्या स्रावाचे संतुलन राखण्यास मदत मिळते.
आयुर्वेद आणि आहाराचं महत्त्व
योगासोबत योग्य आहार आणि आयुर्वेदिक औषधी घेतल्यास रिकव्हरीचा वेग वाढतो. पतंजली आयुर्वेदानुसार त्रिकटू चूर्ण आणि कांचनार गुग्गुळ या औषधी थायरॉईडच्या उपचारात उपयुक्त ठरू शकतात.
तसेच धन्याच्या बियांचं पाणी हा एक प्रभावी घरगुती उपाय मानला जातो. रात्री दोन चमचे सुके धन्याचे दाणे एका ग्लास पाण्यात भिजत ठेवा. सकाळी ते पाणी उकळून गाळून प्या. यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत होते.
जीवनशैलीत बदल आवश्यक
थायरॉईड ही केवळ शारीरिक नव्हे, तर जीवनशैलीशी निगडित समस्या आहे. पुरेशी झोप, जंक फूड आणि जास्त साखरेपासून दूर राहणं, नियमित व्यायाम आणि योगसाधना यांचा दैनंदिन जीवनात समावेश करणं अत्यावश्यक आहे. योग आणि नैसर्गिक उपचारांमुळे हार्मोनल संतुलन तर साध्य होतंच, शिवाय मानसिक शांतताही मिळते.























