कंपनीने सर्वेक्षणात विचारले,'कोणाला नोकरीचा ताण आहे?', 'यस मॅडम' म्हणताच गमवावा लागला जॉब!
Viral Post News : शार्क टँक इंडियामध्ये नुकताच येऊन गेलेल्या यस मॅडम या होम सलून सर्विस स्टार्टअप (Startup) बद्दल बहुतांश लोकांना कल्पना असेलच. मात्र सध्या येस मॅडम वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत.
Viral Post News : शार्क टँक इंडियामध्ये (Shark Tank India) नुकताच येऊन गेलेल्या यस मॅडम (YesMadam) या होम सलून सर्विस स्टार्टअप (Startup) बद्दल बहुतांश लोकांना कल्पना असेलच. मात्र सध्या येस मॅडम वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. कंपनीवर आरोप आहे की त्यांनी आधी सर्वेक्षण करून नोकरीच्या तणावाचा सामना करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना विचारणा केली.
ज्यामध्ये ज्यांनी ज्यांनी आपण तणावग्रस्त असल्याचे सांगितले त्या सर्वांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे. कंपनीने जवळपास 100 लोकांना नोकरीवरून काढून टाकल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत कंपनीच्या एका माजी कर्मचाऱ्याने कंपनीचा ईमेलही सोशल मीडियावर शेअर केला आहे. जो पाहून सगळे यस मॅडमवर टीका करत आहेत.
नेमकं काय लिहिले आहे पोस्टमध्ये?
कंपनीची माजी कर्मचारी अनुष्का दत्ता हिने लिंक्डइनवर एक पोस्ट शेअर केली आहे. अनुष्का कंपनीत UX कॉपी रायटर म्हणून काम करत होती. त्या पोस्टमध्ये त्यांनी दावा केला आहे की कंपनीने 100 हून अधिक लोकांना कामावरून काढले आहे.
सोबतच असा आरोप केला आहे की, यात अशा लोकांना कामावरून काढून टाकण्यात आले होते की ज्यांनी कंपनीच्या सर्वेक्षणात नोकरीचा ताण येत असल्याचे सांगितले होते. या पोस्टमध्ये अनुष्काने लिहिले आहे की 'येस मॅडममध्ये काय चालले आहे? प्रथम तुम्ही यादृच्छिक सर्वेक्षण करता आणि नंतर आम्हाला रातोरात नौकारीवरून काढून टाकता. ज्याचे कारण काय तर आम्ही तणावग्रस्त आहोत? आणि फक्त मीच नाही तर इतर 100 लोकांनाही त्यांच्या नोकरीतून काढून टाकण्यात आले आहे. असे अनुष्काने म्हटले आहे.
कंपनीचा ईमेल ठरला चर्चेचा विषय
अनुष्काने कंपनीच्या ईमेलचा स्क्रिनशॉटही शेअर केला आहे, ज्यामध्ये असे लिहिले आहे की, जे तणावाखाली आहेत त्यांना कामावरून काढले जात आहे. ईमेलमध्ये लिहिले आहे - नुकतेच तुम्ही एक सर्वेक्षण केले, जेणेकरून आम्हाला कळू शकेल की तुम्हाला कामावर कसे वाटते. तुमच्यापैकी अनेकांनी तुमच्या समस्या शेअर केल्या, ज्याचा आम्ही पूर्ण आदर करतो. आमची कंपनी निरोगी आणि आश्वासक कामाचे वातावरण तयार करण्यासाठी वचनबद्ध आहे, म्हणून आम्ही तुमच्या अभिप्रायाकडे काळजीपूर्वक लक्ष दिले. ईमेलवरूनही असे वाटले की कंपनी सर्व कर्मचाऱ्यांचा तणाव दूर करण्यासाठी काही चांगले पाऊल उचलेल, परंतु नंतर जे लिहिले ते तुम्हाला आश्चर्यचकित करेल. कंपनीचे एचआर मॅनेजर अंशू अरोरा झा यांनी ईमेलमध्ये पुढे लिहिले - 'कामावर कोणीही तणावाखाली राहू नये याची खात्री करण्यासाठी आम्ही त्या कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा कठीण निर्णय घेतला आहे. जे पुढे म्हणाले की त्याला नोकरीचा ताण आहे. ते तात्काळ प्रभावी होईल आणि पुढील माहिती प्रभावित कर्मचाऱ्यांना स्वतंत्रपणे पाठविली जाईल. असेही म्हटले आहे.
https://www.linkedin.com/posts/anushka-dutta-980052195_massfiring-activity-7271753647879811072-QOzR?utm_source=li_share&utm_content=feedcontent&utm_medium=g_dt_web&utm_campaign=copy
सोशल मिडियातून नागरिकांची नाराजी
आता अनुष्काची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यावर लोक भरपूर कमेंट करत आहेत आणि येस मॅडमबद्दल नाराजी व्यक्त करत आहेत. तर एका व्यक्तिने सोशल मिडियावर या प्रकरणी लिहिले आहे की, गरीब माणसाचे डोळे फाडून टाका जेणेकरून त्याला गरिबी दिसू नये. तर एक व्यक्ती म्हणते की, यामुळे ओव्हरशेअरिंग धोकादायक आहे. अनुष्काच्या पोस्टवर सातत्याने कमेंट येत आहेत आणि प्रत्येकजण येस मॅडमवर नाराजी व्यक्त करत आहे.
हे ही वाचा