एक्स्प्लोर

Health Tips : हातांची त्वचा मऊ आणि चमकदार हवीय? तर 'ही' घरगुती पद्धत फॉलो करा; 10 दिवसांत फरक जाणवेल

Remedy For Hand Wrinkle : जर तुम्हाला तुमच्या हातांची त्वचा मऊ आणि चमकदार हवी असेल तर हे घरगुती उपाय करून पाहा.

Remedy For Hand Wrinkle : आजकालच्या व्यस्त जीवनशैलीत आपल्या शरीराकडे काळजीपूर्वक लक्ष देणं फारसं कोणाला जमत नाही. यामध्ये हातांची काळजी घेणं तर दूरच. पण सुंदर आणि सॉफ्ट हात असावेत ही प्रत्येकाची इच्छा असते. वाढत्या वयाबरोबर हातावर सुरकुत्या येणं ही एक सामान्य बाब आहे, पण या सुरकुत्या आणि त्वचा कोरडी होणं टाळणंही गरजेचं आहे. अनेकदा आपण चेहऱ्याच्या त्वचेची विशेष काळजी घेतो पण हातांच्या त्वचेचा विसर पडतो. हातांची योग्य वेळी काळजी घेतली नाही तर वयानुसार सुरकुत्या वाढत जातात. चला तर मग जाणून घेऊयात काही सोप्या आणि प्रभावी घरगुती उपायांबद्दल जे हात मऊ, लवचिक आणि सुरकुत्या-मुक्त ठेवण्यास मदत करू शकतात.

खोबरेल तेल किंवा बदामाचे तेल :

रोज रात्री झोपण्यापूर्वी खोबरेल तेल किंवा बदामाचे तेल हाताला लावा. यामुळे हातांची त्वचा मऊ आणि चमकदार राहते. खोबरेल तेल आणि बदामाच्या तेलात व्हिटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट्स आढळतात जे हातांच्या त्वचेसाठी फायदेशीर असतात. यामध्ये असलेले चरबीयुक्त घटक हातांच्या त्वचेला आर्द्रता देतात आणि ते हायड्रेटेड ठेवतात. रोज रात्री झोपण्यापूर्वी हातांना खोबरेल किंवा बदामाचे तेल लावल्याने त्वचेचे पोषण होते आणि ती मऊ आणि चमकदार राहते.

कोमट पाण्याने आणि साखरेने हात धुवा

आठवड्यातून 2-3 वेळा कोमट पाणी आणि साखरेने हात धुवा. साखर नैसर्गिक एक्सफोलिएटर म्हणून काम करते आणि मृत त्वचा काढून टाकते. 

कोरफड जेल लावा

हातांवर कोरफड जेल लावल्याने सुरकुत्या कमी होतात आणि हात मऊ राहतात. कोरफडमध्ये आढळणारे अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन ई त्वचा मऊ आणि निरोगी ठेवण्यास मदत करतात. त्यात असलेले एन्झाइम मृत त्वचा काढून टाकतात आणि नवीन त्वचेच्या निर्मितीला प्रोत्साहन देतात. 

बेसन आणि लिंबूचा वापर करा

आठवड्यातून एकदा बेसन आणि लिंबाच्या मिश्रणाने हातांना मसाज करा. बेसनामध्ये व्हिटॅमिन B6, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम आढळते जे त्वचेसाठी फायदेशीर आहे. ते त्वचेला  मऊ ठेवते. हे उपाय जर तुम्ही फॉलो केले तर तुम्हाला काही दिवसांतच फरक जाणवेल.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 

महत्त्वाच्या बातम्या :

Health Tips : तपासल्यावर मशीन प्रत्येक वेळी वेगवेगळे वजन दाखवते? जाणून घ्या वजन तपासण्याची सर्वात योग्य वेळ कोणती? 

महत्त्वाच्या बातम्या

How To Get Rid Of Lizards : भिंतीवर पाल दिसताच अंगावर काटा येतो? मारण्याऐवजी घरातून पळवून लावण्याचे सोपे घरगुती उपाय!
भिंतीवर पाल दिसताच अंगावर काटा येतो? मारण्याऐवजी घरातून पळवून लावण्याचे सोपे घरगुती उपाय!
Shield Multi Cancer Detection: फक्त एका ब्लड टेस्टने होणार 10 प्रकारच्या कॅन्सरचे निदान? भारतात क्रांतिकारी चाचणी लाँच, जाणून घ्या A टू Z माहिती
फक्त एका ब्लड टेस्टने होणार 10 प्रकारच्या कॅन्सरचे निदान? भारतात क्रांतिकारी चाचणी लाँच, जाणून घ्या A टू Z माहिती
Child Health: पालकांनो लक्ष द्या! भारतात लहान वयातच मोतीबिंदू होण्याचं प्रमाण वाढलं! येत्या काही वर्षांत आणखी वाढ? डॉक्टरांचा इशारा...
पालकांनो लक्ष द्या! भारतात लहान वयातच मोतीबिंदू होण्याचं प्रमाण वाढलं! येत्या काही वर्षांत आणखी वाढ? डॉक्टरांचा इशारा...
Health: शरीरावरील पांढऱ्या डागाबद्दलच्या गैरसमजुती आजच दूर करा! योग्य उपचारांनी मिळू शकतो रुग्णांना दिलासा, तज्ज्ञ सांगतात...
शरीरावरील पांढऱ्या डागाबद्दलच्या गैरसमजुती आजच दूर करा! योग्य उपचारांनी मिळू शकतो रुग्णांना दिलासा, तज्ज्ञ सांगतात...

व्हिडीओ

Maval Visapur Patan Landslide : आनंद देणाऱ्या निसर्गाचा प्रकोप; मावळच्या 'पाटण'वर काळाची झडप
Anandache Paan : तीस लेखिका तीस संघर्ष, अनवट पुस्तकावर गप्पा, पाहा आनंदाचे पान
Jawhar Waterfall | 'मिनी महाबळेश्वर'चं मनमोहक रूप; धबधबे, धुकं अन् काचेचा व्ह्यूइंग ब्रिज - ABP Majha
Uddhav Thackeray | राम मंदिर देणगी प्रकरणावर ठाकरे आक्रमक; फडणवीसांचा जोरदार पलटवार | Special Report
Mumbai Rain Tree Fall | मुंबईच्या रस्त्यांवर मृत्यूच्या झाडांचं 'जाळं' | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis on Rain: मुंबईत महिनाभराचा पाऊस 4 दिवसांत पडला, अभूतपूर्व पावसामुळे मिसिंग लिंकवर 100 टन मातीचा ढिगारा: देवेंद्र फडणवीस
मुंबईत महिनाभराचा पाऊस 4 दिवसांत पडला, अभूतपूर्व पावसामुळे मिसिंग लिंकवर 100 टन मातीचा ढिगारा: देवेंद्र फडणवीस
Missing Link Landslide: देवेंद्र फडणवीसांनी मिसिंग लिंकचा प्रत्यक्ष आढावा घ्यायला विश्वासू शिलेदार पाठवला, शिवेेंद्रराजे भोसले यांच्याकडून वाहतुकीसंदर्भात महत्त्वाची अपडेट
फडणवीसांचा विश्वासू शिलेदार मिसिंग लिंकवर पोहोचला,शिवेेंद्रराजे भोसले यांच्याकडून वाहतुकीसंदर्भात महत्त्वाची अपडेट
धुळ्यात ST बस अन् ट्रेलरची धडक, ड्रायव्हर फरार; सुदैवाने प्रवासी बचावले, बसचालक गंभीर जखमी
धुळ्यात ST बस अन् ट्रेलरची धडक, ड्रायव्हर फरार; सुदैवाने प्रवासी बचावले, बसचालक गंभीर जखमी
Kolhapur Crime: अश्लील व्हिडीओ असल्याचा धाक दाखवत अल्पवयीन शाळकरी मुलीवर सामूहिक अत्याचार; इचलकरंजीमधील घटनेनं खळबळ
अश्लील व्हिडीओ असल्याचा धाक दाखवत अल्पवयीन शाळकरी मुलीवर सामूहिक अत्याचार; इचलकरंजीमधील घटनेनं खळबळ
Devendra Fadnavis: मुंबईच्या समुद्रात मोठी भरती, नाशिकमध्ये ढगफुटी; पावसाचा रेट अलर्ट, मुख्यमंत्र्यांचं वारकऱ्यांनाही महत्त्वाचं आवाहन
मुंबईच्या समुद्रात मोठी भरती, नाशिकमध्ये ढगफुटी; पावसाचा रेट अलर्ट, मुख्यमंत्र्यांचं वारकऱ्यांनाही महत्त्वाचं आवाहन
Jamun Rain: मुंबईच्या पावसात जांभळाचंही झाड पडलं; सोशल मीडियातही ट्रेंड, जांभळाच्या नावाने व्हायरल होतायत मिम्स
मुंबईच्या पावसात जांभळाचंही झाड पडलं; सोशल मीडियातही ट्रेंड, जांभळाच्या नावाने व्हायरल होतायत मिम्स
Mumbai Pune Missing Link Land Slide: 13. 3 किमी रस्त्यांसाठी 7120 कोटींचा चुराडा; अरे प्रतिदिन 100 कोटींप्रमाणे किमान 70 दिवस तरी काढायचे होते; मिंसिंग लिंकला भगदाड पडताच सुषमा अंधारेंनी गणित मांडलं
13. 3 किमी रस्त्यांसाठी 7120 कोटींचा चुराडा; अरे प्रतिदिन 100 कोटींप्रमाणे किमान 70 दिवस तरी काढायचे होते; मिंसिंग लिंकला भगदाड पडताच सुषमा अंधारेंनी गणित मांडलं
Pune Visapur Landslide: पहाटे 4 वाजता दिसलं, पण 4.05 वाजता घर ढासळलेल्या मातीच्या ढिगाऱ्यात आढळलं; विसापुरमध्ये निसर्गाचा प्रकोप, अंगावर काटा आणणारे 10 फोटो
पहाटे 4 वाजता दिसलं, पण 4.05 वाजता घर ढासळलेल्या मातीच्या ढिगाऱ्यात आढळलं; विसापुरमध्ये निसर्गाचा प्रकोप, अंगावर काटा आणणारे 10 फोटो
Embed widget