एक्स्प्लोर

तोंड, स्तन अन् फुफ्फुस.. कर्करोग कशामुळे होतो? या भयंकर आजाराचे प्रकार किती? वेळीच ओळखा लक्षणे, कारण..

World Cancer Day awareness and prevention tips: कर्करोगाचे लवकर निदान झाले तर, त्यावर यशस्वी उपचार करणे शक्य होते.

Cancer prevention awareness by health experts: ४ फेब्रुवारी रोजी जागतिक कर्करोग दिन (World Cancer Day 2026) साजरा केला जातो. कर्करोगाबाबत जनजागृती वाढवणे, लवकर निदानाचे महत्त्व पटवून देणे आणि रुग्णांना मानसिक आधार देणे हा यामागचा मुख्य उद्देश असतो. आज कर्करोग ही केवळ वैद्यकीय समस्या न राहता सामाजासाठी एक मोठे आव्हान ठरत आहे. योग्य माहिती आणि जीवनशैलीमुळे या आजाराविरुद्धचा लढा नक्कीच यशस्वी होऊ शकतो. अनेकांना आपल्या कॅन्सर का आणि कशामुळे होतो? याची माहिती नसते. त्यामुळे कॅन्सरबाबतीत जनजागृती करणे अत्यंत गरजेचं आहे.

कॅन्सर म्हणजे काय?

शरीरातील पेशींची अनियंत्रित वाढ म्हणजे कॅन्सर होय. काही पेशी ठराविक मर्यादेपलीकडे वाढू लागतात आणि त्या शरीरातील इतर अवयवांवर परिणाम करू लागतात. ही प्रक्रिया हळूहळू होते, त्यामुळे सुरुवातीला लक्षणे जाणवत नाहीत. याच कारणामुळे लवकर निदान करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.

कर्करोगाची प्रमुख कारणं कोणती?

तंबाखूचे सेवन, धूम्रपान, असंतुलित आहार, लठ्ठपणा, व्यायामाचा अभाव, अतिमद्यपान, प्रदूषण तसेच दीर्घकालीन ताणतणाव ही कर्करोगाची प्रमुख कारणं आहेत. भारतात तोंडाचा, स्तनाचा, गर्भाशयाचा आणि फुफ्फुसांचा कर्करोग मोठ्या प्रमाणात आढळतो.

बऱ्याचदा विषाणूजन्य संसर्गामुळेही कॅन्सरचा धोका वाढतो. उदाहरणार्थ, एचपीव्ही (ह्युमन पॅपिलोमा व्हायरस) मुळे गर्भाशय ग्रीवेचा कॅन्सर होऊ शकतो, तर हिपॅटायटीस बी व सी संसर्गामुळे यकृताचा कॅन्सर होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे लसीकरण, सुरक्षित लैंगिक संबंध आणि वेळेवर उपचार हे कॅन्सर प्रतिबंधासाठी महत्त्वाचे ठरतात.

प्रतिबंध कसे कराल?

तज्ज्ञांच्या मते, कर्करोगाच्या सुमारे ३० ते ४० टक्के रुग्णसंख्या प्रतिबंधात्मक उपायांनी कमी करता येऊ शकते. तंबाखू आणि गुटख्याच्या व्यसनापासून दूर राहणे, दररोज संतुलित आहाराचे सेवन करणे, नियमित व्यायाम आणि वजन नियंत्रणात राखणे ही कर्करोग प्रतिबंधाची पावले आहेत.

कॅन्सर प्रतिबंधाची सुरुवात लहान वयातच झाली पाहिजे. मुलांमध्ये चुकीच्या खाण्याच्या सवयी, मोबाईल-टीव्हीसमोर बसून राहणे आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे भविष्यात गंभीर आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे पालकांनी लहान वयातच सकस आहार, खेळ आणि शिस्तबद्ध दिनचर्या यांचे महत्त्व मुलांना समजावून सांगणे गरजेचे आहे.

वेळीच तपासणीची गरज

कर्करोग वेळीच ओळखला गेला तर उपचार अधिक परिणामकारक ठरतात. स्तन कर्करोगासाठी मॅमोग्राफी, गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगासाठी पॅप स्मिअर, तसेच तोंडाच्या कर्करोगासाठी नियमित मौखिक तपासणी करणे अत्यंत गरजेचे आहे. चाळीशीनंतर नियमित आरोग्य तपासणी करण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो.

मानसिक आधाराची गरज

कर्करोग हा आजार केवळ शरीरावरच नाही तर रुग्णाच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम करतो. अशा काळात रुग्णांना कुटुंबाचा, समाजाचा आणि आरोग्य व्यवस्थेचा सकारात्मक पाठिंबा मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. योग्य समुपदेशन आणि सकारात्मक दृष्टिकोन उपचार प्रक्रियेला बळ देतो.

कॅन्सरविरोधी लढाई ही केवळ डॉक्टरांची किंवा रुग्णांची नाही, तर संपूर्ण समाजाची आहे. जनजागृती मोहीम, मोफत तपासणी शिबिरे, शाळा-महाविद्यालयांतील आरोग्य शिक्षण यामुळे कॅन्सरविषयीची भीती कमी होऊन जागरूकता वाढते. जागतिक कर्करोग दिनानिमित्त एक महत्त्वाचा सल्ला म्हणजे कर्करोगाची वेळीच तपासणी करा, वेळीच निदान, उपचार आणि सकारात्मक जीवनशैलीमुळे कर्करोगावर मात करणे शक्य आहे. उपचारांपेक्षा प्रतिबंध केव्हाही श्रेष्ठ आहे, हे लक्षात ठेवून निरोगी भविष्यासाठी आजच पाऊल उचलूया.

डॉ. उत्कर्ष आजगावकर, सर्जिकल ऑन्कोलॉजी, टीजीएच ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटर

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe On Majha Katta :  सेफ फूड सेफ ड्रग सेफ महाराष्ट्र हे आमचं मिशन, दोन महिन्यात हजारो ठिकाणी छापे, कारवायांच्या मागची भूमिका काय?
सेफ फूड सेफ ड्रग सेफ महाराष्ट्र हे आमचं मिशन, दोन महिन्यात हजारो ठिकाणी छापे, कारवायांच्या मागची भूमिका काय?
Hindu Religion : शिवलिंगासमोर उभं राहून टाळी वाजविणे पुण्य की पाप? जाणून घ्या 3 टाळ्यांमागचं खरं रहस्य
शिवलिंगासमोर उभं राहून टाळी वाजविणे पुण्य की पाप? जाणून घ्या 3 टाळ्यांमागचं खरं रहस्य
Tech-Neck Problem Health News: मान झुकवून फोन, लॅपटॉप पाहिल्यानं येतो 22 किलोंचा भार; मोबाईलच्या अतिवापरामुळे होऊ शकते 'टेकनेक'ची समस्या
मान झुकवून फोन, लॅपटॉप पाहिल्यानं येतो 22 किलोंचा भार; मोबाईलच्या अतिवापरामुळे होऊ शकते 'टेकनेक'ची समस्या
Shravan 2026 : भारतात श्रावण महिना दोन वेगवेगळ्या तारखांना का सुरू होतो? 'श्रावण' नावाची उत्पत्ती कशी झाली? वाचा यामागील काही रंजक गोष्टी
भारतात श्रावण महिना दोन वेगवेगळ्या तारखांना का सुरू होतो? 'श्रावण' नावाची उत्पत्ती कशी झाली? वाचा यामागील काही रंजक गोष्टी

व्हिडीओ

Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Team India Sri Lanka Tour: टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
Khadakwasla Dam : पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
NEET PG 2026: परीक्षा एकाच सत्रात, प्रत्येक प्रश्नासाठी अतिरिक्त वेळ, घराजवळ केंद्र निवडण्याची मुभा; NEET PG 2026 परीक्षेसाठी नियमांमध्ये मोठा बदल
परीक्षा एकाच सत्रात, प्रत्येक प्रश्नासाठी अतिरिक्त वेळ, घराजवळ केंद्र निवडण्याची मुभा; NEET PG 2026 परीक्षेसाठी नियमांमध्ये मोठा बदल
Guhagar Kasturi Cat rare: गुहागरच्या शाळेत जंगलातील दुर्मिळ कस्तुरी मांजर शिरलं, सगळेच अवाक झाले
गुहागरच्या शाळेत जंगलातील दुर्मिळ कस्तुरी मांजर शिरलं, सगळेच अवाक झाले
तमिळनाडू सीएम थलापती विजय यांच्याविरोधात 2031 मध्ये भिडू आत्ताच ठरला? विजय यांच्या ज्योतिषानेच केली भविष्यवाणी! म्हणाले, यांच्यामध्येच थेट टक्कर होणार
तमिळनाडू सीएम थलापती विजय यांच्याविरोधात 2031 मध्ये भिडू आत्ताच ठरला? विजय यांच्या ज्योतिषानेच केली भविष्यवाणी! म्हणाले, यांच्यामध्येच थेट टक्कर होणार
Abhijeet Dipke: 'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
Ambernath Shiv Sena News: 'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली, शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली, शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
Embed widget