एक्स्प्लोर

CEC Impeachment Row : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळला, विरोधकांचा संताप

Parliament News : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना हटवण्यासाठी विरोधकांनी राज्यसभा सभापती आणि लोकसभा अध्यक्षांकडे महाभियोगाचा प्रस्ताव दिला होता.

नवी दिल्ली : देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार (Gyanesh Kumar) यांच्याविरोधात विरोधकांनी दिलेल्या महाभियोग प्रस्तावाला मोठा धक्का बसला आहे. राज्यसभा सभापती आणि लोकसभा अध्यक्षांनी हा प्रस्ताव फेटाळत पुढील प्रक्रिया रोखली आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून राजकीय वाद आणखी तीव्र होण्याची चिन्हं दिसत आहेत. 

12 मार्च रोजी 193 खासदारांनी (लोकसभेतील 130 आणि राज्यसभेतील 63) या प्रस्तावावर स्वाक्षऱ्या करून राज्यसभा सभापती आणि लोकसभा अध्यक्षांकडे महाभियोगाची नोटीस सादर केली होती. स्वातंत्र्यानंतर प्रथमच एखाद्या मुख्य निवडणूक आयुक्ताविरोधात असा महाभियोग प्रस्ताव मांडण्यात आला होता. परंतु आता तो फेटाळण्यात आला आहे.

Impeachment Notice Against Gyanesh Kumar  : 193 खासदारांचा प्रस्ताव फेटाळला

हा प्रस्ताव संविधानातील अनुच्छेद 324(5) आणि 124(4) तसेच Chief Election Commissioner and Other Election Commissioners Act, 2023 आणि Judges (Inquiry) Act, 1968 अंतर्गत देण्यात आला होता. मात्र, सभापतींनी सर्व बाबींचा सविस्तर आढावा घेतल्यानंतर या प्रस्तावाला कोणताही ठोस आधार नसल्याचं नमूद करत तो फेटाळला. लोकसभा अध्यक्षांनीही याच भूमिकेवर शिक्कामोर्तब केलं.

Opposition Allegations : मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप

विरोधकांनी ज्ञानेश कुमार यांच्यावर एकूण सात गंभीर आरोप केले होते. यात पक्षपाती वर्तन, निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप, मतदार यादी पुनरावलोकनात (SIR) अनियमितता, तसेच मताधिकारापासून नागरिकांना वंचित ठेवण्याचे आरोप होते. 

विशेषतः बिहारमधील मतदार यादीच्या विशेष गहन पुनरावलोकन प्रक्रियेवर(SIR) विरोधकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. काही राजकीय पक्षांना फायदा व्हावा यासाठी काम केल्याचा आरोपही करण्यात आला होता.

Derek O’Brien Reaction : ‘लोकशाहीचा अपमान’

या निर्णयावर विरोधी खासदार डेरेक ओब्रायन (Derek O'Brien) यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं की, मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्याची याचिका कोणतंही कारण न देता फेटाळली गेली. ही संसदेला चेष्टा बनवण्यासारखी बाब आहे. संसदेत हा मुद्दा पूर्णपणे दुर्लक्षित करण्यात आला. हा लोकशाहीचा अपमान आहे, अशी टीका त्यांनी केली.

Political Impact : वाद वाढण्याची शक्यता

या निर्णयानंतर केंद्र सरकार आणि विरोधकांमध्ये संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. महाभियोग प्रक्रिया थांबवण्यात आल्यामुळे विरोधकांकडून पुढील रणनीती आखली जाणार असल्याचे संकेत आहेत.

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत
Sanjay Raut on Bankipur By-election Result: कुत्रा-मांजराला उभे केले तरी लोक निवडून देतील, हा अहंकार लोकांनी मोडून काढला; बांकीपूर पोटनिवडणुकीवरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात
कुत्रा-मांजराला उभे केले तरी लोक निवडून देतील, हा अहंकार लोकांनी मोडून काढला; बांकीपूर पोटनिवडणुकीवरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात

व्हिडीओ

Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका

Embed widget