एक्स्प्लोर

नांदेडमध्ये मॉर्निंग वॉक गेलेल्या सोनूला संपवलं, हत्येचं कारण समोर; प्रेमसंबंधाची किनार, वडिलांची फिर्याद

सोनू कल्याणकर याचे वडील यांच्या फिर्यादीवरुन गोलू मंगनाळे आणि त्याचे वडील चंद्रविजय मंगनाळे यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नांदेड: शहरात आज सकाळी मॉर्निक वॉकसाठी गेलेल्या युवकावर चार जणांनी अचानक प्राणघातक हल्ला केला. त्यामध्ये, सोनू कल्याणकर मानक तरुणाचा मृत्यू झाला असून जुन्या वादातूनच हे हत्याकांड झाल्याची प्राथमिक माहिती होती. याप्रकरणी, पोलिसांनी (Police) आरोपींचा पाठलाग करत असताना आरोपींकडून पोलिसांवर देखील गोळीबार करण्यात आला होता. त्यामध्ये, प्रमुख आरोपीच्या पायाला पोलिसांकडून गोळी लागली, त्यानंतर त्यास रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आता, याप्रकरणी मयत सोनू कल्याणकर (Nanded) याच्या वडिलांनी फिर्याद दिली असून आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यामध्ये, 

मृत सोनू कल्याणकर याच्या वडिलांच्या फिर्यादीनुसार, गोलू मंगनाळे आणि त्याचे वडील चंद्रविजय मंगनाळे यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनू कल्याणकर यांनी मंगनाळे यांच्या मुलीचे लग्न मोडल्याचा खोटा आरोप करत हा वाद झाल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. अनिकेत उर्फ सोनू कल्याणकर याचे दहा-बारा वर्षापासून मंगनाळे यांच्या मुलीसोबत प्रेम संबंध होते, त्यांच्या या प्रेमसंबंधाला मंगनाळे पिता पुत्राचा विरोध होता. त्यानंतर मंगनाळे यांनी आपल्या मुलीचा विवाह दुसरीकडे ठरवला होता, तो विवाह सुद्धा सोनू कल्याणकर यांनी मोडलं होता, असा आरोप करत 2020 मध्ये विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये आमच्या मुलाविरुद्ध खोटा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर, 2021 मध्ये गोलू मंगनाळे यांनी सोनू कल्याणकर याच्या घरी येत गोळीबार करत त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हापासून माझ्या मुलाला मारण्यासाठी मंगनाळे पिता-पुत्र डोळा ठेवून होते, अशी अशोक कल्याणकर यांनी फिर्यादीत म्हटले आहे. 

10-12 दिवसापूर्वी जंगमवाडी परिसरात सोनू कल्याणकर याला अडवून अंकुश गंधमवाड, पियु शिंदे, रोहित लोट आणि मधु जोगदंड यांनी तुझे दिवस भरले आहेत, नीट रहा असे म्हणत धमकावले होते. त्यावेळी सोनू कल्याणकरच्या वडिलांनी आपण पोलिसात तक्रार दाखल करू असं सोनूला सांगत होते. मात्र, सोनू यांनी तक्रार द्यायला विरोध केला, गोलू मंगनाळेची हा कुठल्या दहशतवादी हरविंदर सिंग रिंदाचा माणूस आहे, त्याच्याविरोधात जर आपण तक्रार दिली तर ते मला नक्की मारतील म्हणून आपण तक्रार दाखल करायची नाही असं सोनच्या वडिलांनी फिर्यादीमध्ये सांगितले. 

दरम्यान, आज सकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान सोनू कल्याणकर मॉर्निक वॉकला गेला असता त्याला गाठून पाठीवर, पोटावर खंजिराचे वार करत त्याची निर्घुण हत्या करण्यात आली. याप्रकरणी भाग्यनगर पोलीस स्टेशनमध्ये चंद्रविजय मंगनाळे मुक्तेश्वर उर्फ गोलू मंगनाळे, पियु शिंदे, मधू जोगदंड व मुख्य आरोपी अंकुश गंधमवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी, पोलीस अधिक तपास करत आहेत. 

हेही वाचा

मोगरा फुलला.... पुण्यातील दगडूशेठ गणेश मंदिरात 51 लाख फुलाची सजावट, बाप्पांचे मनमोहक रुप

मी गेल्या 2 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणीला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणीला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक

व्हिडीओ

Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Embed widget