Women Health: 'गर्भनिरोधक गोळ्या खाणाऱ्या महिलांनो...हो तुम्हीच..आताच व्हा सावधान!' अतिसेवनाने होऊ शकतो मानसिक आजार? जाणून घ्या..
Women Health: आजकाल, नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी महिला गर्भनिरोधक गोळ्या घेतात, कारण हा एक सोपा उपाय मानला जातो. पण हाच उपाय तुम्हाला मानसिक आजाराकडे घेऊन जाऊ शकतो. जाणून घ्या..
Women Health: आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक महिलांवर विविध जबाबदाऱ्यांचं ओझं असतं. अशात करिअरमुळे किंवा इतर काही वैयक्तिक कारणांमुळे त्यांना लवकर मूल नको हवं असतं. ज्यामुळे आजकाल महिला नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी अधिकाधिक गर्भनिरोधक गोळ्या घेतात कारण हा एक सोपा उपाय मानला जातो. साधारणपणे, गर्भनिरोधक गोळ्यांचे कोणतेही मोठे दुष्परिणाम नसतात, ज्यामुळे तुमच्या आरोग्याला कोणतेही नुकसान होत नाही. पण तुम्हाला माहित आहे का, या गोळ्या तुम्ही जास्त वेळ घेतल्यास तुम्हाला अनेक शारीरिक आणि मानसिक आजार होऊ शकतात. आज आम्ही तुम्हाला गर्भनिरोधक गोळ्या खाण्याचे तोटे सांगणार आहोत. हार्मोनल बदलांमुळे या गोळ्यांचे सेवन केल्याने महिलांच्या मानसिक स्थितीवर परिणाम होतो, ज्यामुळे तुम्हाला विविध समस्यांना सामोरे जावे लागते. जाणून घेऊया-
गर्भनिरोधक गोळ्या हानिकारक कशा ठरतात?
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, ज्या स्त्रिया नियमितपणे गर्भनिरोधक गोळ्या घेतात, त्यांच्या हायपोथालेमसचा आकार संकुचित होऊन लहान होतो. हायपोथालेमस हा मेंदूचा एक भाग आहे, जो तुमच्या शरीराचे तापमान राखतो. यासोबतच, ते तुमची भूक, मूड आणि लैंगिक शक्ती नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त आहे. इतकंच नाही तर तुमची झोप नियंत्रित करण्यात हायपोथॅलेमसचीही मोठी भूमिका असते. तुमचे जैविक घड्याळ नियंत्रित करणारे बहुतेक हार्मोन्स हायपोथालेमसद्वारे सोडले जातात.
गर्भनिरोधक गोळ्यांमुळे कोणत्या समस्या उद्भवू शकतात?
- या गोळ्या दीर्घकाळ घेतल्यास अनेक शारीरिक आणि मानसिक आजार होऊ शकतात.
- यामुळे तुमची झोप आणि भूक प्रभावित होते, यामुळे तुम्हाला अनेक आजार होण्याची शक्यता असते.
- या गोळ्यांचे वाईट परिणाम तुमच्या भावनिक आरोग्यावरही दिसू शकतात.
- यामुळे राग येणे, चिडचिडेपणा वाढणे, विनाकारण रडण्याची इच्छा आणि तणाव इत्यादी
- गर्भनिरोधक गोळ्यांचे जास्त सेवन केल्याने तुमची स्मरणशक्तीही कमकुवत होऊ शकते.
गर्भनिरोधक गोळ्यांचे दुष्परिणाम आपण कसे कमी करू शकतो?
गर्भनिरोधक गोळ्यांचे दुष्परिणाम कमी करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्या घेण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे.
हेही वाचा>>>
Women Health: पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये हिमोग्लोबीनची कमतरता अधिक? अशक्तपणाही अधिक? कारणं आणि उपाय जाणून घ्या
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )