एक्स्प्लोर

Women Health : महिलांनो.. गरोदरपणी पपई खावीशी वाटतेय? पण बाळाला धोका तर नाही ना? तुमच्या प्रश्नाचं योग्य उत्तर जाणून घ्या

Women Health : महिलांनो... गरोदरपणात पपई खाण्याबाबतच्या माहितीचे सत्य जाणून घ्यायचंय? तर  तुमच्या प्रश्नाचं योग्य उत्तर जाणून घ्या

Women Health : महिलांनो गरोदरपणात अनेक गोष्टी खाव्याशा वाटतात. पण कोणता पदार्थ गरोदरपणात खाणं योग्य ठरेल, तो पदार्थ खाऊ की नये? असे अनेक प्रश्न होणाऱ्या आईच्या मनात असतात. गर्भवती महिलांनी पपई खाऊ नये असे तुम्ही ऐकले असेल आणि कदाचित विश्वासही असेल. पण खरंच गरोदरात पपई खावी की नाही? याचा तुमच्या बाळाला काही धोका तर नाही ना? असे अनेक प्रश्न तुमच्या मनात असतील तर आरोग्य तज्ज्ञ काय सांगतात ते जाणून घ्या... ( Pregnant Woman Can Eat Papaya During Pregnancy?) 

आरोग्य तज्ज्ञ काय सांगतात?

आपण अनेकदा ऐकतो, गरोदर महिलांनी पपई खाऊ नये आणि बऱ्याच जणांचा कदाचित यावर विश्वासही असेल. गरोदर महिलांना कच्ची आणि पिकलेली पपई खाण्यास मनाई केली जाते. तर काही लोक असेही म्हणतात की, पपई खाणे पूर्णपणे सुरक्षित आहे. तसं पाहायला गेलं तर पपईला पोषक तत्वांचे भांडार म्हणतात. यामध्ये असलेले व्हिटॅमिन ए, सी, पेपिन, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स आरोग्यासाठी अनेक फायदे देतात. सामान्यतः गर्भवती महिलांना गरोदरपणात पपई खाण्यास मनाई केली जाते. पण गर्भधारणेदरम्यान ते खरोखर हानिकारक असू शकते? हे बरोबर की अयोग्य हे डॉक्टरांकडून जाणून घेऊया. गरोदरपणात पपई खाण्याबाबत माहितीचे सत्य जाणून घेण्यासाठी एका वृत्तसंस्थेने घेतलेल्या मुलाखतीनुसार दिल्लीचे डॉ. मनीषा अरोरा यांनी काय सांगितले ते जाणून घेऊया. 

गरोदरपणात पपई खावी का?

डॉ. अरोरा यांनी सांगितले की, पपईमध्ये लेटेक्स असते, ज्यामुळे गर्भाशयात आकुंचन होण्याचा धोका असतो. यामुळे गर्भपात किंवा मुदतपूर्व प्रसूतीचा धोका असतो. याव्यतिरिक्त, पपईमध्ये पेपिन देखील असते, त्यामुळे गर्भाला इजा होण्याची शक्यता असते. आरोग्य तज्ज्ञांच्या माहितीनुसार, पपई हे अत्यंत पौष्टिक फळ आहे. यामध्ये अनेक प्रकारची जीवनसत्त्वे, खनिजे आणि एन्झाइम्स आढळतात, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात.  मात्र हे देखील लक्षात घेण्यासारखे आहे की, पपई पिकण्यास सुरवात होते. तेव्हा त्यात लेटेकचे प्रमाण कमी होते. त्यामुळे गरोदर महिलांनी आठवड्यातून एक किंवा दोनदा पिकलेली पपई मर्यादित प्रमाणात खाल्ल्याने कोणत्याही प्रकारच्या हानीचा धोका कमी होतो. कच्ची पपई खाणे टाळावे. पण पिकलेली पपई गरोदरपणात काही प्रमाणात खाऊ शकतो.

पपई खाण्यास किती सुरक्षित आहे?

नॅशनल हेल्थ सर्व्हिस (NHS) नुसार, गरोदरपणात कच्ची पपई जास्त प्रमाणात खाऊ नये. पण 2018 मध्ये Obs and Gyne Journal मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार पपई खाल्ल्याने गर्भधारणेला कोणताही हानी होत नाही. तसेच, अन्न आणि कृषी संघटनेच्या (एफएओ) मते, गरोदरपणात खाल्ल्या जाणाऱ्या फळांमध्ये पपईचाही समावेश होतो. त्यामुळे त्यांच्या मते पपई खाणे पूर्णपणे सुरक्षित असल्याचे डॉ.अरोरा यांनी सांगितले. पण ते मर्यादित प्रमाणातच खावे. आठवड्यातून एक किंवा दोनदा पपई खाऊ शकता. मात्र, पपई खाल्ल्यानंतर तुम्हाला अस्वस्थ वाटत असल्यास, ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा. तुमच्या गरोदरपणात कोणतीही समस्या असली तरीही त्याबद्दल तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

हेही वाचा>>>

Women Health : काय सांगता..आता किशोरवयीन मुलींनाही 'ब्रेस्ट कॅन्सरचा' धोका? काय आहे कारण? स्त्रीरोगतज्ज्ञ सांगतात...

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MIDC Manhole Death Special Report : धोधो पावसात मॅनहोलने घेतला बळी, जबाबदार  कोण?Zero Hour Sanjay Raut : 'तो' आरोप राऊतांना महाग पडला? दुसरी जेलवारी थोडक्यात टळली?Zero Hour Malvan Statue : मालवणमधील शिवरायांचा पुतळा कसा कोसळला? कारणं काय? आरोपी नेमकं कोण?Zero Hour Case Guest Center : संजय राऊतांवर अब्रुनुकसाना खटला दाखल करण्याची गरज होतीच - दमानिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
Embed widget