(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Women Health : महिलांसाठी मद्यपान करणं किती सुरक्षित आहे? मद्यपान करण्यात स्त्रियाही अव्वल, परिणाम जाणून व्हाल थक्क
Women Health : पुरुषांप्रमाणेच मद्यपानाची सर्वाधिक क्रेझ महिलांमध्येही दिसून येते, जाणून घेऊया महिलांसाठी दारू पिणे किती सुरक्षित आहे?
Women Health : मद्यपान करण्याची क्रेझ केवळ पुरुषांमध्येच नाही तर महिलांमध्येही मोठ्या प्रमाणात दिसून येते. स्त्रिया देखील मोठ्या प्रमाणात दारूचे सेवन करतात, जे त्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. दारू योग्य प्रमाणात घेतल्यास त्याचा आरोग्यावर चांगला परिणाम होतो, मात्र अमर्याद प्रमाणात दारू पिणाऱ्यांना त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. आज आपण आरोग्य तज्ज्ञांच्या माहितीनुसार जाणून घेणार आहोत, की महिलांसाठी दारू पिणे किती सुरक्षित आहे? जाणून घ्या..
महिलांसाठी दारू पिणे सुरक्षित आहे का?
आरोग्य तज्ज्ञांच्या मते महिलांसाठी दारू पिणे अजिबात सुरक्षित मानले जात नाही. कारण जेव्हा महिला दारू पितात, तेव्हा त्यांना अनेक आरोग्य धोक्यांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे महिलांसाठी दारू कधीही सुरक्षित नसते. दारू पिल्याने महिलांच्या आरोग्यावर कोणता परिणाम होतो?
स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढू शकतो
बदलत्या काळानुसार महिलांनी सर्वाधिक दारू पिण्यास सुरुवात केली आहे. अशा परिस्थितीत दारू पिणाऱ्या महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचा धोका सर्वाधिक असतो. अमेरिकन मेडिकल असोसिएशनच्या जर्नलमध्ये प्रकाशित नुकत्याच झालेल्या अभ्यासानुसार, जेव्हा महिला आठवड्यातून किमान तीन ते सहा वेळेस अल्कोहोलिक ड्रिंक घेतात, तेव्हा स्तनाच्या कर्करोगाचा धोका सर्वात जास्त वाढू शकतो.
लठ्ठपणाची समस्या
महिलांनी मद्यपान केल्याने लठ्ठपणा येऊ शकतो. महिलांनी दारू प्यायल्यास तुमच्या लठ्ठपणाची समस्या वाढू शकते. म्हणून, नेहमी मर्यादित प्रमाणातच अल्कोहोलचे सेवन करा.
मधुमेह वाढू शकतो
मद्यपान करणाऱ्या महिलांना मधुमेहाचा धोका सर्वाधिक असतो. जर तुम्ही आधीच मधुमेहाचे रुग्ण असाल तर दारू तुमच्यासाठी विषासारखी आहे. अशा स्थितीत दारू पिणाऱ्या महिलांना मधुमेह आणि मानसिक तणाव दोन्ही असू शकतात.
गर्भपात होण्याचा धोका
दारू पिणाऱ्या महिलांमध्ये गर्भपाताचा धोका सर्वाधिक असतो. गर्भधारणेदरम्यान एखाद्या महिलेने दारूचे सेवन केले तर त्याचा तिच्या गर्भातील मुलावर वाईट परिणाम होतो आणि काही वेळा गर्भपात होऊ शकतो.
हेही वाचा>>>
Women Health : मासिक पाळी दरम्यान पूजा करावी की नाही? प्रेमानंद महाराजांनी दिले आश्चर्यकारक उत्तर, तर जया किशोरी म्हणतात..
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )