Woman Health : काय सांगता! महिलांची सर्वाधिक एनर्जी 'या' वयात असते, सत्य जाणून पुरुषांनाही बसेल धक्का, काय सांगतो अभ्यास?
Woman Health : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एजिंगनुसार, स्त्रीच्या आयुष्यात अशी वेळ येते, जेव्हा तिची उर्जा पातळी सर्वोच्च असते. पुरुषांना याबद्दल जाणून आश्चर्य वाटेल.
Woman Health : जन्म बाईचा..खूप घाईचा...! बाईपण भारी देवा.. असे अनेक चित्रपट आहेत, जे स्त्रियांचे जीवन अधोरेखित करणारे आहेत. पाहायला गेलं तर.. वाढत्या वयानुसार महिलांमध्ये हार्मोनल बदल दिसून येतात. नोकरी, लग्न, संसार आणि लव्ह लाईफ या सगळ्या गोष्टी स्त्रियांना सांभाळाव्या लागतात. मात्र स्त्रियांच्या आयुष्यात अशी वेळ येते, जेव्हा तिची उर्जा पातळी सर्वोच्च असते. पुरुषांना याबद्दल जाणून आश्चर्य वाटेल. जाणून घ्या..
वाढत्या वयानुसार महिलांमध्ये हार्मोनल बदल
वयाच्या प्रत्येक टप्प्यावर माणसांमध्ये वेगवेगळे बदल दिसून येतात. कधी शारिरीक तर कधी मानसिक दृष्ट्या आपण बऱ्याच गोष्टींतून जातो. कधीकधी नातेसंबंधांमुळे, ऊर्जा पातळी म्हणजेच एनर्जी लेव्हल कधी कमी होते आणि वाढते. वाढत्या वयाबरोबर शरीरात बदल होणे अपरिहार्य असते. नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ एजिंगनुसार हे बदल पुरुष आणि महिलांमध्ये वेगळे असतात, वयानुसार महिलांमध्ये हार्मोनल बदल दिसून येतात. नोकरी, लग्न, कौटुंबिक आणि प्रेम जीवन या सर्व गोष्टी स्त्रियांना सांभाळाव्या लागतात, याचा अर्थ स्त्रीच्या आयुष्यात अशी वेळ येते जेव्हा तिची उर्जा पातळी सर्वोच्च असते. पुरुषांना याबद्दल जाणून आश्चर्य वाटेल.
वयाच्या 'या' वर्षापासून होऊ लागतात बदल
वयाच्या 14 व्या वर्षापासून मुलींच्या शरीरात चमत्कारिक बदल होऊ लागतात. या वयात शरीराचा विकास झपाट्याने होतो. याशिवाय हार्मोन्समध्ये झपाट्याने चढ-उतार होतात, त्यामुळे मानसिक स्थितीवरही परिणाम होतो.
पुरुष-महिलांमध्ये वेगवेगळे बदल
एनआयएच्या बाल्टिमोर लाँगिट्युडिनल स्टडी ऑफ एजिंगच्या अभ्यासानुसार, व्यक्तीच्या जन्मापासून त्याच्या स्नायूंचे द्रव्यमान आणि ताकद सतत वाढते. 30 ते 35 वर्षांच्या वयात ते उच्च असते. यानंतर, स्नायूंची ताकद आणि त्यांच्या अॅक्टीव्हिटीत घट होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे महिलांमध्ये ही घट वयाच्या 65 व्या वर्षी दिसून येते. तर पुरुषांमध्ये वयाच्या 70 नंतर ते झपाट्याने कमी होते.
'या' वयात महिलांमध्ये एनर्जी लेव्हल अधिक असते.
नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ एजिंगच्या मते, नातेसंबंधांमुळे महिलांच्या शरीरात बदल होतात. त्यामुळे त्यांची ऊर्जा पातळी वाढू शकते किंवा कमी होऊ शकते. 18-20 वर्षे वय हा महिलांच्या जीवनातील तो काळ असतो, जेव्हा त्यांच्या जीवनात खूप मोठे बदल होतात. या वयात महिलांची एनर्जी लेव्हल जास्त असते. यावेळी त्यांना सकस आहाराचीही गरज असते. एका अहवालानुसार, वयाच्या 25 व्या वर्षी महिलांच्या शरीरात कोलेजनची कमतरता असते. वयाच्या 30 व्या वर्षी ही घट 10 टक्क्यांपर्यंत सुरू होते. 40 वर्षांनंतर ते 20-25 टक्क्यांपर्यंत पोहोचते. या वयात त्वचेपासून ऊर्जा पातळीपर्यंत सर्व गोष्टींवर परिणाम होतो.
25 ते 35 वर्षे वयोगट सर्वात महत्वाचे
महिलांमध्ये, 25 ते 35 वर्षे वयोगट सर्वात महत्वाचे आहे. या वयात महिला खूप हुशार बनतात. तिच्या आवडीनिवडी आणि सवयींनुसार जोडीदार मिळाल्यास तिला अधिक आनंद होतो. या वयात त्यांचे मनोधैर्य उत्तम असते आणि त्यांची ऊर्जाही उच्च असते. जसजसे वय वाढते तसतसे अनेक महिलांमध्ये बदल दिसून येतात. 40 वर्षांनंतर महिलांच्या ऊर्जा पातळी आणि मानसिक आरोग्यावर अनेक परिणाम होतात. 45 नंतर, महिला रजोनिवृत्तीकडे जातात.
हेही वाचा>>>
Women Health : मासिक पाळी दरम्यान पूजा करावी की नाही? प्रेमानंद महाराजांनी दिले आश्चर्यकारक उत्तर, तर जया किशोरी म्हणतात..
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )