Weight Loss: 'त्या' महिलेची कमालच! चक्क मिठाई खाऊन तब्बल 7 किलो वजन कमी केलं? सीक्रेट रेसिपी केली शेअर, पोटाची चरबी केली गायब
Weight Loss: अलीकडेच, एका फिटनेस फ्रिक महिलेने तिच्या वजन कमी करण्याच्या प्रवासाबद्दल सांगितले. यावर सर्व नेटकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केलंय.
Weight Loss: वाढलेलं वजन कमी करायचं म्हणजेच अनेकांना टेन्शन येतं. कारण वजन कमी करणे सोपे काम नाही. आजकालची बदलती जीवनशैली, खाण्याच्या अयोग्य वेळा, व्यायामाचा अभाव, जंकफूडचे सेवन या गोष्टींमुळे अनेकांना वाढलेल्या वजनाचा सामना करावा लागतोय. विशेषतः पोटावरील चरबी कमी करणे हे सर्वात कठीण काम आहे. अलीकडेच, एका फिटनेस फ्रिक महिलेने तिची वेट लॉस जर्नी म्हणजेच वजन कमी करण्याच्या प्रवासाबद्दल सांगितले, तिने एक विशिष्ट प्रकारची मिठाई खाऊन तब्बल 7 किलो वजन कमी केलंय. याबाबत तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केलीय. ज्यानंतर नेटकऱ्यांकडून आश्चर्य व्यक्त केलं जातंय.
फिटनेस फ्रिक महिलेने चक्क मिठाई खाऊन वजन केलं कमी!
वाढलेल्या वजनाच्या समस्येतून जात असलेल्यांनाच वजन कमी करण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते हे माहीत आहे. तुम्ही अनेकदा ऐकले असेल की वजन कमी करण्यासाठी मिठाई म्हणजेच साखर खाणे टाळण्याचा सल्ला दिला जातो. पण या फिटनेस फ्रिक महिलेने चविष्ट मिठाई म्हणजेच गोड पदार्थ खाऊन अवघ्या 2 महिन्यात 7 किलो वजन कमी केले. पण हे कसं शक्य आहे? कोण आहे ही महिला? असे अनेक प्रश्न तुम्हाला पडत असतील, तर पुढे वाचा...
कोण आहे ही महिला?
या महिलेचे नाव लीना आहे. तिचे इन्स्टाग्राम पेज फिटझीलिफ्ट्स या नावाने आहे. लीना सांगते की, ती वर्षानुवर्षे वजन कमी करण्यासाठी खूप प्रयत्न करत होती पण त्यात यश आले नाही. यानंतर, त्यांनी अशा आरोग्यदायी आणि चवदार, प्रोटीनयुक्त गोड पदार्थाचा शोध लावला, जे खाल्ल्याने त्यांचे वजन सहज कमी झाले. लीना मानते की, वजन कमी करण्यासाठी शरीरातील प्रथिनांचे म्हणजे प्रोटीनचे प्रमाण आवश्यक आहे, प्रथिनांचा सर्वोत्तम स्त्रोत ही मिठाई आहे.
View this post on Instagram
मिठाई कशी फायदेशीर ठरेल?
लीना सांगतात की, वजन कमी करण्यासाठी मिठाई खाण्याऐवजी त्या खाण्यावर मर्यादा घालणे आवश्यक आहे. यासोबतच गोडपणासाठी पांढऱ्या साखरेऐवजी नैसर्गिक साखर निवडणे चांगले. यासाठी पिकलेली केळी खाणे चांगले राहील. पिकलेल्या केळ्यापासून बनवलेली मिठाई खाऊन लीनाने वजनही कमी केले आहे.
सीक्रेट रेसिपी केली शेअर! हा गोड पदार्थ कसा बनवायचा?
लीनाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तिने त्याची रेसिपी शेअर केली आहे, यासाठी तुम्हाला काही पदार्थ हवे आहेत, जसे की- 3 मॅश केलेले गोड केळी, 1 टेबलस्पून बेकिंग पावडर, 150 ग्रॅम मैदा, 200 ग्रॅम सिलिकॉन टोफू आणि 100 ग्रॅम वितळलेले डार्क चॉकलेट. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्यात प्रोटीन पावडरही घालू शकता. हे करण्यासाठी, तुम्हाला एका भांड्यात या सर्व गोष्टी एकत्र कराव्या लागतील. यानंतर, केक पॅन किंवा कोणत्याही मायक्रोवेव्ह सेफ ट्रेमध्ये ठेवा आणि मायक्रोवेव्हमध्ये 180 डिग्री सेल्सिअसवर 30 ते 40 मिनिटे बेक करा. तुमचा हेल्दी आणि टेस्टी प्रोटीन रिच केक तयार आहे.
हेही वाचा>>>
Men Health: काय सांगता! लग्नानंतर पुरुषांचं केवळ खाण्यापिण्यानेच नाही, 'या' गोष्टीमुळे वजन वाढतं?एका संशोधनातून खुलासा! जाणून घ्या..
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )