Sexual Wellness: महिलांच्या लैंगिक आरोग्यावर 'या' गोष्टींचा होतो सर्वाधिक परिणाम; काय कराल उपाय?
Sexual Wellness: आजच्या पुढारलेल्या समाजात स्त्रियांशी संबंधित सामान्य समस्यांबाबत बोलणं कठीण होत आहे, त्यातल्या त्यात स्त्रियांच्या लैंगिक आरोग्याबाबत उघडपणे बोलणंही थोडंस कठीण होत आहे.
Sexual Wellness: सध्या आपला समाज पुढारला आहे, मानवानं थेट चंद्रापर्यंत भरारी घेतली आहे. पण, आजही महिलांना (Womens) समाजातील एक वर्ग कमी लेखतो. त्यांच्या इच्छा, त्यांच्या भावना, त्यांची स्वप्न आणि त्यांच्या आयुष्याकडून असलेल्या अपेक्षा यावर तसं आजही कमीच बोललं जातं. तसेच, महिलांच्या लैंगिक आयुष्याबाबतही (Sexual Wellness of Womens) फारच कमी बोललं जातं.
आजच्या पुढारलेल्या समाजात स्त्रियांशी संबंधित सामान्य समस्यांबाबत बोलणं कठीण होत आहे, त्यातल्या त्यात स्त्रियांच्या (Womens Health) लैंगिक आरोग्याबाबत उघडपणे बोलणंही थोडंस कठीण होत आहे. खरं तर यावर खुली चर्चा व्हायला हवी. पण अजुनही या विषयार दबक्या आवाजात चर्चा होतात. अनेक गोष्टी स्त्रियांच्या लैंगिक आरोग्यावर परिणाम करतात, ज्याबद्दल बोलणं महत्त्वाचं आहे. स्त्रिया स्वतः अनेकदा त्यांच्या लैंगिक आरोग्याशी संबंधित गोष्टींबद्दल अनभिज्ञ असतात आणि यामुळे त्यांना अनेक वेळा छोट्या मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागतं. इथे आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टींबद्दल सांगत आहोत, ज्यांचा महिलांच्या लैंगिक आरोग्यावर परिणाम होतो.
हार्मोनल इनबॅलन्स (Hormonal Imbalance)
मासिक पाळी, गर्भधारणा, प्रसूती आणि रजोनिवृत्ती यासह अनेक कारणांमुळे महिलांच्या शरीरात हार्मोन्समध्ये चढ-उतार होऊ शकतात. या असंतुलनामुळे कामवासना कमी होणं, योनीमार्गात कोरडेपणा आणि मूड बदलणं होऊ शकते. याचा थेट परिणाम महिलांच्या लैंगिक इच्छा आणि आनंदावर होतो.
मानसिक आरोग्य (Mental Health)
याकडे बऱ्याचदा दुर्लक्ष केलं जातं, परंतु लैंगिक आरोग्य देखील मानसिक आरोग्याशी संबंधित आहे. तणाव, चिंता, नैराश्य आणि इतर अनेक कारणांमुळे शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा कमी होऊ शकते. त्यामुळे याकडेही लक्ष देणं गरजेचं आहे.
फिजिकल कंडीशन्स (Physical Condition)
PCOS (पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम), PID (पेल्विक इन्फ्लेमेटरी डिसीज) आणि लैंगिक संक्रमित संसर्ग (STIs) यांसारख्या स्त्रियांमधील अनेक वैद्यकीय स्थिती स्त्रियांच्या लैंगिक आरोग्यावर परिणाम करतात.
लाईफस्टाईल फॅक्टर्स (Lifestyle Factors)
चुकीच्या खाण्याच्या सवयी, झोप न लागणं आणि जीवनशैलीशी संबंधित इतर कारणांमुळे महिलांच्या लैंगिक आरोग्यावरही परिणाम होतो. यामुळे थकवा, अशक्तपणा आणि कामवासना कमी होऊ शकते. म्हणून, हे देखील समजून घेणे महत्वाचे आहे.
(टिप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही समस्येवर कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )