Sexual Wellness: लैंगिक संबंधांनंतर महिलांनी 'या' 3 गोष्टी नक्की कराव्यात; बॅक्टेरियल इंफेक्शन्सपासून होईल बचाव!
Sexual Wellness : स्त्रियांच्या लैंगिक सुखाबद्दल अनेकदा बोललं जात नाही. तसेच, अनेक स्त्रियांना अनेक गोष्टी माहितीही नसतात. यामुळे महिलांमध्ये याबाबत प्रचंड संभ्रम निर्माण होतो. अनेक स्त्रियांना शारीरिक संबंधांदरम्यान, जळजळ होणं किंवा रक्तस्त्राव होणं, तसेच याशिवाय इतर काही समस्या जाणवतात.
Sexual Wellness : सध्याचं युग हे डिजिटल युग आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आज आपला देश चंद्रावर पोहोचला असला तरी, आजही असे अनेक मुद्दे आहेत, ज्याबाबत आपण उघडपणे बोलत नाही. अशा विषयांपैकी एक विषय म्हणजे, लैंगिक संबंधांबाबत (Sexual Relations). इतरांशी तर सोडाच पण महिला या विषयावर आपल्या जोडीदाराशीही बोलताना टाळाटाळ करतात. या विषयाबाबत अनेक समज गैरसमज आपल्यापैकी अनेकांच्या मनात असतात. त्यामुळे या विषयाबाबत गुप्तता बाळगणं किंवा एखादी समस्या उद्भवल्यास जोडीदाराशी बोलणं टाळणं किंवा लपवून ठेवणं महागात पडू शकतं.
स्त्रियांच्या लैंगिक सुखाबद्दल (Sexual Pleasure) अनेकदा बोललं जात नाही. तसेच, अनेक स्त्रियांना काही गोष्टी माहितीही नसतात. यामुळे महिलांमध्ये (Women Problems) याबाबत प्रचंड संभ्रम निर्माण होतो. अनेक स्त्रियांना शारीरिक संबंधांदरम्यान, जळजळ होणं किंवा रक्तस्त्राव होणं, तसेच याशिवाय इतर काही समस्या जाणवतात.
काही स्त्रिया लैंगिक संबंधांनंतर संक्रमणास बळी पडतात. अशा परिस्थितीत ते कसं टाळावं? याबाबत माहिती नसते. शारीरिक संबंधानंतर, महिलांनी संसर्ग टाळण्यासाठी आणि योनी निरोगी ठेवण्यासाठी 3 गोष्टी करणं आवश्यक आहे. त्या कोणत्या? जाणून घेऊयात सविस्तर...
शारीरिक संबंधांनंतर युरिन पास करणं (Passing Urine After Intercourse)
शारीरिक संबंधांदरम्यान अनेकदा बॅक्टेरिया महिलांच्या योनीमध्ये प्रवेश करतात. हेच बॅक्टेरिया पुढे योनीमार्गात जाण्याची शक्यता अधिक असते. जर योनीमार्गात कोणतेही बॅक्टेरिया पोहोचले असतील तर, युरिन पास करताना जीवाणू बाहेर टाकले जाण्याची शक्यता आहे. याशिवाय STI आणि UTI यांसारख्या समस्या टाळण्यासाठी शारीरिक संबंधांदरम्यानं कंडोम वापरणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
खूप पाणी प्या (Hydratedtion)
शरीर हायड्रेट असणं अत्यंत गरजेचं असतं. तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता असेल तरिदेखील आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात. शारीरिक संबंधांनंतर पुरेसं पाणी पिणं अत्यंत गरजेचं आहे. लैंगिक संबंधांपूर्वी आणि नंतर शरीर हायड्रेट ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे. त्यामुळे थकवा कमी होईल आणि शरीराला ऊर्जाही मिळेल.
योनी स्वच्छ करा (Vaginal Hygiene)
शारिरीक संबंधांनंतर, महिलांनी योनी (योनी कशी स्वच्छ करावी) इंटिमेट वाइपच्या मदतीनं व्यवस्थित स्वच्छ करावी. योनिमार्गाच्या सुरुवातीपासून, इंटिमेट वाइपच्या मदतीनं मागपर्यंत व्यवस्थित स्वच्छ करावा. यामुळे शारीरिक संबंधांदरम्यान संसर्ग टाळण्यास मदत होईल.
महिलांनी लैंगिक स्वच्छतेशी संबंधित या गोष्टींची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. तसेच, लैंगिक आरोग्यासंबंधित कोणत्याही समस्या उद्भवल्यास मनात कोणतीही अढी न ठेवता उघडपणे बोलणं गरजेचं आहे. समस्या वाढल्यास कोणतेही घरगुती उपाय न करता संबंधित डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत फायदेशीर ठरतं.
(टिप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही समस्येवर कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)
महत्त्वाच्या इतर बातम्या :
मासिक पाळीत का होते सतत गोड खाण्याची इच्छा? 'या' क्रेविंगवर नियंत्रण मिळवण्यासाठी काय कराल?
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )