(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Food: नोकरदार महिलांनो..आता डब्ब्याची काळजी नाही, 'या' 5 झटपट होणाऱ्या टिफीन रेसिपी बेस्ट ऑप्शन, जाणून घ्या
Food : नोकरदार महिलांसाठी 5 हेल्दी टिफिन रेसिपी सर्वात योग्य पर्याय आहेत, वेळेची होईल बचत, झटपट लवकर होणारे पदार्थ
Food: नोकरी करणाऱ्या महिलेसाठी हेल्दी डाएट फॉलो करणे खूप कठीण होऊन बसते. कौटुंबिक ते ऑफिसपर्यंतच्या असंख्य जबाबदाऱ्या रोज पार पाडत असताना, नोकरी करणारी स्त्री तिच्या तब्येतीसाठी फारच कमी वेळ देते. पण जर तुम्हाला निरोगी राहून ऑफिसचं काम आणि घरातील जीवन संतुलित करायचे असेल, तर निरोगी आहाराचे पालन करणे फार महत्वाचे आहे. यासाठी तुम्ही दिवसभर जे काही खात आहात त्याच्या पौष्टिकतेवर लक्ष ठेवावे. पण हे आवश्यक नाही की, तुम्ही दररोज हेल्दी लंच तुमच्या टिफिनमध्ये ठेवा.
नोकरदार महिलांनी स्वत:कडे यादी ठेवा
स्त्रिया आपल्या आरोग्याकडे लक्ष न देता स्वत:साठी कोणतीही गोष्ट पटकन तयार करून पॅक करून घेतात. अशा परिस्थितीत नोकरदार महिलांनी त्यांच्याकडे एक यादी तयार ठेवावी, जेणेकरुन दररोज तुम्हाला आज काय करायचे या विचारात वेळ वाया घालवावा लागणार नाही. अशा नोकरदार महिलांसाठी एक यादी तयार करा, जी विविध प्रकारच्या पाककृतींनी परिपूर्ण आहे आणि जी नोकरदार महिलांना तिच्या जेवणाचे नियोजन करण्यास त्वरित मदत करेल.
आरोग्य खूप महत्वाचे
निरोगी जीवनासाठी आणि दिवसभर उत्साही राहण्यासाठी आरोग्य खूप महत्वाचे आहे. सकाळच्या गर्दीत काय करावे या प्रश्नाचे उत्तर शोधणे सर्वात महत्वाचे आहे. विशेषत: जर तुम्ही नोकरी करणारी महिला असाल तर हे आणखी मोठे काम दिसते. अशात आम्ही तुमच्यासाठी अशाच काही अशा रेसिपी आणल्या आहेत ज्या तुम्ही टिफीकसाठी झटपट तयार करू शकता.
कटलेट आणि टिक्की
हा एक अतिशय सोपा आणि तयार खाद्य पर्याय आहे. आदल्या रात्री ते तयार करा आणि कटलेट आणि टिक्कीसाठी मसाले तयार करा आणि फ्रीजमध्ये ठेवा. तुम्ही पोहे टिक्की, मिक्स व्हेज कटलेट, बीटरूट कटलेट, राजमा टिक्की, मटर पनीर टिक्की, साबुदाणा टिक्की, रताळे टिक्की, दही कबाब, ओट्स मूग डाळ टिक्की, पालक कॉर्न चीज कटलेट इत्यादी बनवू शकता. उरलेल्या भातापासून तुम्ही अगदी सहज कटलेट बनवू शकता.
आंबलेले अन्न
इडली, मिनी इडली, व्हेज फ्राईड इडली, उत्तपम, डोसा हे आंबवलेले पदार्थ आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. तुम्ही याची तयारी करून रात्री झोपू शकता.
भात
भात हा जेवणासाठी उत्तम पर्याय आहे. मटर पुलाव, राजमा राइस, लेमन राईस, फ्राईड राईस, जीरा राइस किंवा दही राईस हे झटपट तांदळाचे पर्याय आहेत जे खूप चवदार आहेत.
पराठा
कांदा, बटाटा, पनीर, सत्तू, ब्रोकोली, फ्लॉवर किंवा डाळ पराठा हा जेवणाचा डबा खूप फायदेशीर आहे. रात्रीच त्याचे मिश्रण तयार करून फ्रीजमध्ये ठेवा आणि सकाळी पटकन रोल करून बेक करा. त्याचप्रमाणे थेपला, कचोरी, पुरी सब्जी किंवा व्हेजिटेबल फ्रँकी हा देखील एक उत्तम पर्याय आहे.
पोळा
रवा ओट्स दही पोळा, मूग डाळ पालक पोळा, नाचणी पोळा, मूग आणि लौकी पोळा, ज्वारी पोळा, बथुआ ओट्स पोळा, वाटाणा बेसन पोळा किंवा क्विनोआ पोळा हे अतिशय आरोग्यदायी जेवणाचे पर्याय आहेत.
हेही वाचा>>>
Lifestyle : एखादा पदार्थ तुम्ही एक्सपायरी डेट नंतर खाल्लाय का? आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतो? तज्ज्ञांचे मत जाणून घ्या..
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )