Winter Travel: हिवाळ्यात चुकूनही 'या' ठिकाणी फिरायचा प्लॅन बनवू नका! अन्यथा होईल पश्चाताप, जाणून घ्या..
Winter Travel: हिवाळ्यात भारतातील काही ठिकाणी प्रवास करताना समस्या उद्भवू शकतात. मुसळधार बर्फवृष्टी, प्रचंड थंडी आणि प्रतिकूल हवामानामुळे या ठिकाणी प्रवास करणे धोकादायक ठरू शकते.
Winter Travel: हिवाळा हा असा एक ऋतू आहे. जो अनेकांना आवडतो. गुलाबी थंडी, हिरवागार निसर्ग, आल्हाददायक वातावरण सर्वांनाच आवडते. बहुतेक लोक हिवाळ्यात कुठेतरी बाहेर फिरण्याचा प्लॅन करतात. हिवाळ्याच्या ऋतूत हिमवर्षाव आणि थंडीचा आनंद अनुभवण्यासाठी लोकांना विविध हिल स्टेशन्सला जायला आवडते. पण अशी काही ठिकाणं आहेत, जिथे हिवाळ्यात प्रवास करणे अडचणीचे ठरू शकते. मुसळधार बर्फवृष्टी, प्रचंड थंडी आणि प्रतिकूल हवामानामुळे या ठिकाणी प्रवास करणे धोकादायक ठरू शकते. आज आम्ही तुम्हाला भारतातील काही ठिकाणांबद्दल सांगणार आहोत जिथे तुम्ही जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात भेट देऊ नये, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही.
लेह-लडाख - बहुतांश रस्ते बंद
जर हिवाळ्यात तुम्ही लेह-लडाखला जाण्याचा प्लॅन करत असाल, तर आम्ही तुम्हाला सांगतो, लेह-लडाख हे भारतातील सर्वात सुंदर पर्वतीय ठिकाणांपैकी एक आहे. लेह-लडाखमधील उंच तलाव आणि बर्फाच्छादित पर्वत सर्वांना आकर्षित करतात. लेह-लडाखमध्ये वर्षभर थंड वातावरण असते. लेह-लडाख: जानेवारी महिन्यात लेहमधील तापमान -15 अंश सेल्सिअस आणि कधी कधी -30 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचते. मुसळधार बर्फवृष्टीमुळे बहुतांश रस्ते बंद आहेत. तसेच, ऑक्सिजनची कमतरता आणि आरोग्याशी संबंधित समस्या असू शकतात.
केदारनाथ मंदिर - नोव्हेंबर ते एप्रिल मे महिन्यात बंद होते
प्रत्येक भारतीयाचं स्वप्न असते, भगवान भोलेनाथांच्या केदारनाथला एकदा तरी जावं. यासाठी लोक प्लॅनिंगही करतात. मात्र जर तुम्ही हाच प्लॅन हिवाळ्यात करत असाल तर उत्तराखंडमधील चारधाम यात्रेला जाणाऱ्या लोकांनी या ऋतूत जाऊ नये. येथील प्रसिद्ध केदारनाथ मंदिर दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात बंद होते आणि एप्रिल-मेमध्ये उघडते. प्रचंड बर्फवृष्टी आणि खराब हवामानामुळे या भागात प्रवास करता येत नाही. हिवाळ्याच्या काळात येथे आरोग्य सेवा आणि राहण्याची ठिकाणे उपलब्ध नाहीत. तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
अमरनाथ - प्रवासासाठी जानेवारी महिना धोक्याचा
जानेवारी महिन्यात जम्मू-काश्मीरमध्ये खूप थंडी असते. अमरनाथ गुहा येथे आहे. अमरनाथ गुहेकडे जाणारा रस्ता जानेवारीत पूर्णपणे बर्फाने झाकलेला असतो. हिवाळ्यात येथील तापमान खूपच कमी होत असल्याने हा महिना धोक्याचा असू शकतो. अमरनाथला जाण्यासाठी सर्वोत्तम महिना जून ते ऑगस्ट असतो.
हेही वाचा>>>
Mahakumbh 2025: कुंभमेळ्याला जाणाऱ्यांसाठी भारतीय रेल्वेकडून खास संधी! विशेष गाड्यांचे वेळापत्रक, सर्व माहिती येथे जाणून घ्या
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )