Winter Health Tips : 'या' लोकांनी हिवाळ्यातही गरम पाण्याने आंघोळ करू नये; 'या' आजारांचा वाढता धोका
Winter Health Tips : खूप गरम पाण्याने त्वचा कोरडी होते. विशेषत: ज्यांना एक्जिमाचा त्रास आहे त्यांनी चुकूनही गरम पाण्याने आंघोळ करू नये.
Winter Health Tips : हिवाळ्यात वाढत्या थंडीपासून शरीराला थोडी ऊब देण्यासाठी गरम पाण्याने (Hot Water) अंघोळ केल्याने दिलासा मिळतो. यासाठी अनेकांना गरम पाण्याने किंवा कोमट पाण्याने आंघोळ करायला आवडते. थंडीत गरम पाण्याने आंघोळ केल्याने थोडं बरं वाटतं. गरम पाण्याने आंघोळ केल्याने रक्ताभिसरण प्रक्रिया सुरळीत राहते. तसेच, हाडांसाठीही हे फायदेशीर आहे. पण, तुम्हाला माहीत आहे का, गरम पाण्याने आंघोळ करण्याचे फायदे तितकेच तोटे आहेत. गरम पाण्यामुळे त्वचेतील ओलावा निघून जातो आणि त्वचा कोरडी होते. तसेच, त्वचेवर पॅचेस देखील दिसू लागतात. हिवाळ्यात (Winter Season) गरम पाण्याने आंगोळ केल्याने कोणत्या रोगांचा वाढतो धोका असतो ते जाणून घेऊयात.
एक्जिमा रोग होऊ शकतो ट्रिगर
खूप गरम पाण्याने आंघोळ केल्याने त्वचा कोरडी होते. विशेषत: ज्यांना एक्जिमाचा त्रास आहे त्यांनी चुकूनही गरम पाण्याने आंघोळ करू नये. गरम पाण्याने आंघोळ केल्याने अंगावर खाज सुटू शकते. एक्जिमा पॅच देखील वाढू लागतात. खाज येण्याच्या समस्येचे ते एक महत्त्वाचे कारण बनते.
सोरायसिस रोगाची भीती
सोरायसिसच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, जर तुम्ही खूप गरम पाण्याने आंघोळ केली तर हा आजार होऊ शकतो. गरम पाण्याने त्वचा कोरडी होऊ शकते. ज्यामुळे चिडचिड देखील होऊ शकते. त्यामुळे त्वचेच्या बाहेरील थरावर असलेल्या केराटीन पेशींना खूप नुकसान होते. त्यामुळे त्वचा कोरडी होऊ लागते. ओलावा नसल्यामुळे सोरायसिसची लक्षणे वाढू लागतात.
उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी गरम पाण्याने आंघोळ करू नये
उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांनी खूप गरम पाण्याने आंघोळ करू नये. त्यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या वाढते. उच्च रक्तदाब आणि हृदयविकार असलेल्या रुग्णांनी कधीही गरम पाण्याने आंघोळ करू नये. अशा लोकांनी सकाळी गरम पाण्याने आंघोळ करणे टाळावे. जेव्हा थंडी वाढते तेव्हा गरम पाण्यात थोडेसे थंड पाणी मिसळून ते सामान्य करा आणि नंतर त्या पाण्याने आंघोळ करा. याचा तुमच्या आरोग्यावर कोणताही वाईट परिणाम होणार नाही. जर या समसयांचा त्रास असलेल्या लोकांनी गरम पाण्याने आंघोळ केली नाही तर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या समस्या उद्भवणार नाहीत.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :
Health Tips : तुमच्या 'या' चांगल्या सवयी तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतात; आजपासूनच त्या बंद करा